आपले कोण व परके कोण यात तफावत न करता प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावणारे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे कौतुक करावे तेवढे थोडेच~ शरद राव नवले पाटील

बेलापूर प्रतिनिधी- आपले कोण परके कोण यात तफावत न करता प्रामाणिक पणे न्यायाची बाजू मांडणाऱ्या महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ गेल्या तीस वर्षापासून कार्य करीत असून पत्रकार संघाचे अध्यक्ष बरकत अली यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रभर पत्रकार संघाचा विस्तार झाला असून जनतेत पत्रकार संघाची चांगली छबी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन बेलापूर येथील जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील यांनी केले

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक 14/7/2022 रोजी दुपारी तीन वाजता बेलापूर येथील नगर रोड लगत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली पत्रकार संघाचे प्रदेश सचिव अभयजी बाफना, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन सय्यद, पत्रकार दायमा, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, सिन्नर तालुका अध्यक्ष मधुकर मुठाळ, राहता तालुका अध्यक्ष विजय खरात, राहता तालुका सचिव राहुल कोळगे, पाटोदा कार्याध्यक्ष दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, पुणतांबा शहराध्यक्ष मयूर मलठणकर, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार कासम शेख यांनी केले यावेळी बेलापूर शाखा कार्यालयाची फित कापून शरद नवले पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार देऊन बेलापूर शाखा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला 


आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद  नवले पाटील पुढे म्हणाले की एक वर्षापूर्वी बेलापूर गावात पत्रकार संघाची स्थापना करण्यात आलि असून येथील नवोदित पत्रकारांच्या खांद्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यानुसार या शाखेच्या पत्रकारांनी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करून पत्रकार संघाचे नावलौकिक वाढविले आहे त्यांनी गावातील बातम्यांचा पाठपुरावा करूनच बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत याच बरोबर कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या गावातील नेते, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे, पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्यप्रणाली बद्दल येथील अधिकारी व पोलिसांचा सत्कार केला, दिवाळीच्या काळात जाती एकता दृढ होण्याच्या उद्देशाने राम गड येथे फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशा विविध क्षेत्रामध्ये पत्रकारांनी उत्कृष्ट असे काम केले आहे त्यांच्या कामाचे व विशेष म्हणजे पत्रकार संघाचे आपण जि. प. सदस्य या नात्याने कौतुक करीत आहोत असे ते म्हणाले


आपल्या प्रमुख भाषणात पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली म्हणाले की आपण गेल्या तीस वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून नवोदित पत्रकार घडविण्याचे व त्यांना पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले असून याच उद्देशाने बेलापूर येथील पत्रकारांना पत्रकार संघ बरोबर काम करण्याची संधी प्राप्त करून दिली ती उपयोगी ठरली असून आज या ठिकाणी बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व शाखा कार्यालयाचे उद्घाटन करताना आपल्याला स्वाभिमान वाटत आहे पत्रकारांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्याअगोदर बातमीची सत्यता पडताळून पहावी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारावर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम पत्रकार संघाने आजवर केले आहे यापुढेही करणार आहे त्यामुळे पत्रकारांनी निर्भीडपणे व प्रामाणिकपणे काम करीत राहावे असे शेख यांनी सांगितले पत्रकार संघाचा तीस वर्षाचा प्रवास पूर्ण झाला असल्याने येत्या ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आपण पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले


यावेळी अभयजी बाफना, सुखदेव केदारे, मधुकर मुठाळ, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, मुसा भाई सय्यद, सुभाष राव गायकवाड आदींनी शुभेच्छा पर भाषणे केली कार्यक्रमास  राहुरी येथील पत्रकार गणेश पवार, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सार्थक साळुंके, इमरान शेख, अकबर भाई शेख यांच्यासमवेत इतर पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार एजाज सय्यद यांनी मानले

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget