Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी - जिल्ह्यातील आपेगाव (ता.कोपरगाव) येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीसांना संयुक्त पथकाला यश आले आहे. अजय छंदु काळे (वय १९, रा. पढेगांव, ता. कोपरगांव), अमित कागद चव्हाण (वय २०, रा. हिंगणी हल्ली रा. पढेगांव, ता. कोपरगांव), जंतेश छंदु काळे ( वय २२ रा. पढेगाव ता. कोपरगाव) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेले माहिती अशी की, नोकरी निमित्ता कुटूबिंयासह पुणे येथे राहतात. दि. ३० मे २२ ते दि.१ जून २२ रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी रात्रीचे वेळी घराचे छतावर प्रवेश करुन झोपेत असलेली आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५) व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय ७५) अशा दोघांची अज्ञात हत्याराने खून करुन, घरातील कपाटाची उचकापाचक करून १ लाख ९० हजार रु. किंचे सोन्याचे दागिने खुनासह जबरी चोरी करुन चोरुन नेले होते. या घटनेबाबत जालिंदर दत्तात्रय भुजाडे ( वय ४०, रा. आपेगांव, ता. कोपरगांव हल्ली रा. संतोषनगर (बाकी), ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९९७ /२०२२ भादविक ३०२, ३९७, ३९४ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटना ठिकाणास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.त्याप्रमाणे पोनि श्री. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असतांना पथकास माहिती मिळाली. गुन्हा हा अजय काळे (रा. पढेगांव, ता. कोपरगांव) याने त्याचे साथीदारासह केला असून तो त्याचे राहते घरी आहे, कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोलिस पथक तात्काळ पढेगांव येथे जाऊन आरोपी अजय काळे याचे वास्तव्याबाबत माहिती घेत असतांना एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळन जाऊ लागला पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय छंदु काळे (वय १९, रा. पढेगांव, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पोलिसांनी त्याला पोलिस खाक्या दाखविताच गुन्हा हा त्याचा साथीदार अमित कागद चव्हाण (वय २०, रा. हिंगणी हल्ली रा. पढेगांव, ता. कोपरगांव), जंतेश छंदु काळे (वय २२ रा. पढेगाव ता. कोपरगाव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली.माहिती नुसार आरोपी अमित चव्हाण व जंतेश काळे यांचा त्यांचे राहते घरी जावून शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास कोपरगांव तालुका पोलीस करीत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, सफौ बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके, सचिन आडवल, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, पोकाॅ सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे व चापोना भरत बुधवंत आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोनि दौलतराव जाधव, सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉ ईरफान शेख आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

शिर्डीत मुस्लिम समाज वधू वरांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

शिर्डी प्रतिनिधी-सामुदायिक विवाह ही काळाची गरज असुन अशा विवाह सोहळ्याच्या आयोजनाने अनेक गोर गरीब गरजुवंत कुटुंबाला आधार मिळत असुन हा विवाह सोहळा अनेकांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पार पडलेल्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्था शिर्डी शहराच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी केले. महरुम हाजी असगरअली सय्यद यांच्या स्मरणार्थ संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात चार जोडपे विवाहबद्ध झाले. संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून या विवाह सोहळ्याचे आयोजन होत असुन शिर्डीतील उर्दू शाळेत विविध क्षेत्रातील मान्यवर व मौलाना यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्यात संस्थेच्या वतीने कपाट पलंग व संसार उपयोगी वस्तू कन्यादान म्हणून भेट देण्यात

आल्या आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेमूदभाई सय्यद यांनी या विवाहासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन उपस्थित राहिलेले शिर्डी मतदार संघाचे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा संस्थेच्या व मुस्लिम समाजबांधवाच्या वतीने यावेळी सत्कार केला. तर या सोहळ्यास कमलाकर कोते , निलेश कोते , जगन्नाथ गोंदकर , दत्ताञय कोते , विजयराव कोते,हाजीमुन्नाभाई शाह,अशोक गोंदकर, अरुणशेठ गायकवाड़,शिराज देशमुख, हाजी रज्जाकभाई, अज्मोद्दीनभाई शेख,दत्ता गोविदराव कोते,नितिन दादा शेळके, सलीम मुल्ला जी, खलील शेख,हाजीअयूबभाईपठान,फिरोज भाई शेख,एकबाल कालूभाई,अशफ़ाक तंबोली, हाजीसिकंदर पठान,आदीसह शिर्डीतील सर्वपक्षीय नेते ग्रामस्थ उपस्थित होते.  हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी हाजी शमसुद्दीनभाई ,महेमूदभाई सय्यद, अशरफभाई सय्यद, जावेदभाई शाह, सरदार भाई पठान,मुक्तारभाई सय्यद, गुलामरसूलभाई शेख ,दादाभाई ईनामदार ,अखलाक खान, साजिदभाई शेख ,सफीकभाई शेख,अयूब भाई शाह ,बरकत सय्यद,हैदर सय्यद,अर्शद शाह ,मुज्जुभाई मौ.असगरली, सलीमभाई शेख,रोशन पठान ,नदीम भाई शेख, मतीन सय्यद,जावेद इनामदार, अकरम सय्यद, व सर्व कार्यकारणी सदस्यांनी प्रयत्न केले.

कर्जत प्रतिनिधी - खूनप्रकरणातील पाच वर्षे फरार असणारे आरोपी पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. विजय लक्षम मोडळे (वय 29, रा.मोढळे वस्ती, राशीन ) असे पकडण्यात आलेल्याची आरोपीचे नाव आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सफौ तुळशीदास सातपुते, हेकॉ अण्णासाहेब चव्हाण, पोना संभाजी वाबळे, पोकॉ भाऊसाहेब काळे,अर्जुन पोकळे,देविदास पळसे, संपत शिंदे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मोढळेवस्ती, राशीन येथे जागरण गोंधळाचे कार्यक्रमात पैसे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपीत मजकूर यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमा करून फिर्यादीचा भाऊ आप्पा दगडू मोढळे व वडील दगडू महादेव मोढळे यांना तलवारीने, कुर्‍हाडीने,काठयाने मारहाण केली त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ आप्पा मोढळे हा गंभीर जखमी होऊन फिर्यादीचे वडील दगडू महादेव मोढळे हे मयत झाल्याने फिर्यादी अशोक दगडू मोढळे (रा. मोढळे वस्ती,राशीन ता कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 63/2016 भादवि कलम 302,307, 324,143,147, 148,149,504, 506 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी विजय लक्षम मोडळे (वय 29, रा. मोढळे वस्ती, राशीन) हा खेड भागात आल्याची गुप्त बातमी कर्जत पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ कर्जत पोलिस टीम रवाना करून आरोपीला बातमी मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेऊन अटक केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-अल्पवयीन विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून त्रास देणार्‍या तरूणास जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.बेलापूर परिसरात राहणार्‍या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा आरोपी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याने पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून छेड काढत त्रास दिला. त्याबाबत विद्यार्थीनीने झालेला प्रकार वडिलांना सांगितला. वडील संबंधित तरुणाला जाब विचारण्यास गेले असता त्याने विद्यार्थीनीच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विद्यार्थीनीच्या आईला ढकलून दिले व विद्यार्थीनीला पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला.याप्रकरणी मुलीचे आई-वडील व अल्पवयीन विद्यार्थीनीने थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354 ड, 341, 323, 504, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पोक्सो कायदा 2012 चे कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करुन विलास भगत याला अटक केली. पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक बोर्से हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी-पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात बेकायदेशीररित्या गॅस रिफील करणार्‍या अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत 39 गॅस टाक्यांसह 80 हजार 820 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरूण पोपट वरखडे (वय 36, रा. वरखडेवस्ती, निघोज) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई मयूर गायकवाड यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने एलसीबीचे पथक पारनेर तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान निघोजच्या वरखडेमळा परिसरात अरूण वरखडे बेकायदेशिररित्या गॅस रिफील करत असल्याची माहिती सहायक निरीक्षक दिनकर मुंढे यांना मिळाली होती.माहितीच्या आधारे एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता आरोपी वरखडे घराच्या आडोशाला गॅसच्या एका टाकीतून दुसर्‍या टाकीत गॅस रिफील करताना आढळून आला. त्याच्याकडे परवानासंदर्भात चौकशी केला असता तो विनापरवाना गॅस रिफील करत असल्याचे निर्दशनास आले.निरीक्षक कटके यांच्या सुचनांप्रमाणे सहायक निरीक्षक मुंढे, अंमलदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, राहुल साळुंके, सागर ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



नाशिक प्रतिनिधी -शहरात गेल्या महिनाभरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरु आहे. त्यात कालच झालेल्या आनंदवली येथील पाइपलाइन रोडजवळ कॅनॉलरोडलगत पवन पगारे याच्यावर चाकुने वार होऊन त्याची हत्या झाली. हा आरोपी अतुल अजय सिंग हा खून करुन हातात रक्ताने माखलेला धारदार चाकू घेऊन युवक पळत होता. त्याचवेळी गंगापुर पोलिस ठाण्यात कर्तव्यदक्ष महिला पोलीस सरला खैरनार यांनी पाठलाग करुन संशयिताकडून चाकू हिसकावत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.या कामगिरीबद्दल खैरनार यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे. प्रभागाचे नगरसेवक व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी खैरनार यांचे अभिनंदन करताना प्रशंसोद्गार काढले. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख, बागुल, संकेत घोलप, राजू सिद्धू, राहुल उन्हाळे, अनिल पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.भाजपच्या वतीने आ. सीमा हिरे यांनी खैरनार यांना शाबासकीची थाप आणि पैठणी देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सरला खैरनार यांचे पती विजय खैरनार व संपूर्ण परिवार उपस्थित होता. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरिक्षक रियाज शेख, माजी नगरसेविका हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश हिरे, भगवान काकड, नारायण जाधव, पुर्वा सावजी, रामहरी संभेराव, रोहिणी नायडू, अनिल भालेराव आदींसह महिला व पुरुष पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तंबाखू विरोधी दिन निमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न  श्रीरामपूर प्रतिनिधी - आनंदी जीवन जगण्यासाठी व्यक्तीने व्यसनाला जवळ न करता त्याचा त्याग करायला हवा. तंबाखू युक्त पदार्थांचे सेवन हे कुटुंबापासून स्वतःला खूप लवकर दूर नेण्याचे साधन असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.  इंडियन मेडिकल असोसिएशन,श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन,माहेश्वरी हरियाली मंच व सार्थक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे या जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर स्पर्धेचा परितोषिक सोहळा लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला,त्यात प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रशांत पाटील बोलत

होते.मंचावर डॉ.संकेत मुंदडा,डॉ.रविंद्र कुटे, डॉ. दिलीप शेज्वळ,डॉ. मोनिका संचेती, उमेश तांबडे,रमाताई पोफळे आदी उपस्थित होते.

प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणात व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी वैद्यकीय संघटना या सामाजिक क्षेत्रातील संघटनांना सोबत घेवून काम करत असल्याचे बघून अभिमान वाटत असल्याचे म्हटले.कोविड काळातील सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांनी केलेले सहकार्य वाखाणण्याजोगे होते.    

 कुटुंबावर खरा प्रेम करणारा व्यक्ती कधीही तंबाखू सारख्या संसार उद्ध्वस्त करणाऱ्या बाबींना जवळ करत नाही.समाजात कुटुंबावर खोटी प्रेम करणारी अर्थात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी अनेक मंडळी दिसून येतात.खुल्या पोस्टर स्पर्धेतून सहभागी स्पर्धकांनी खूपच बोलकी चित्रे काढली.समाजाने त्यातून बोध घेण्याचे आवाहन करताना कुटुंबासाठी अधिकाधिक वेळ खर्च करण्याची विनंती देखील प्रशांत पाटील यांनी केली.याप्रसंगी डॉ.रवींद्र कुटे,डॉ.संकेत मुंदडा,डॉ.मोनिका संचेती यांचीही भाषणे झाली.


          पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या 152 स्पर्धकातून डॉ.सुभाष गल्हे यांनी निवड प्रक्रियेतून विजेते घोषित केले.विजेत्यांना प्रशांत पाटील यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आली.डॉ.राहुल राऊत व डॉ.सुनीता राऊत यांचेकडील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रणवीर हिवाळे यांनी द्वितीय क्रमांकाचे डॉ.गणेश बैरागी व डॉ.नेहा बैरागी यांचेकडील पारितोषिक श्रीमती रेखा त्रिभुवन यांनी तर डॉ.विनोद बागुल व डॉ.अमृता बागुल यांचेकडे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रकाश गायकवाड यांनी पटकावले.समीर याकूब बागवान,रमाताई पोकळे,डॉ.दिलीप शेज्वळ यांचेकडील उत्तेजनार्थ पारितोषिक कु.नाजिया मंसुरी, कु.तनिष्का शिंगे व कु.तुलसी न्याती यांनी मिळवले.सर्व स्पर्धकांना रमेश कापडीवाल यांनी प्रमाणपत्र देऊ केले.

कार्यक्रमासाठी डॉ.दिलीप पडघन,डॉ.राम कुकरेजा,डॉ.केतन बधे,डॉ.प्राजक्ता टांक,डॉ.वर्षा शिरसाठ,राखी बिहाणी,नम्रता मुंदडा,शिरीष सूर्यवंशी,जालिंदर जाधव,किशोर बत्तीसे विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.          

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता टांक यांनी तर आभारप्रदर्शन शकील बागवान यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget