अहमदनगर प्रतिनिधी-पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात बेकायदेशीररित्या गॅस रिफील करणार्या अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत 39 गॅस टाक्यांसह 80 हजार 820 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरूण पोपट वरखडे (वय 36, रा. वरखडेवस्ती, निघोज) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई मयूर गायकवाड यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने एलसीबीचे पथक पारनेर तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान निघोजच्या वरखडेमळा परिसरात अरूण वरखडे बेकायदेशिररित्या गॅस रिफील करत असल्याची माहिती सहायक निरीक्षक दिनकर मुंढे यांना मिळाली होती.माहितीच्या आधारे एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता आरोपी वरखडे घराच्या आडोशाला गॅसच्या एका टाकीतून दुसर्या टाकीत गॅस रिफील करताना आढळून आला. त्याच्याकडे परवानासंदर्भात चौकशी केला असता तो विनापरवाना गॅस रिफील करत असल्याचे निर्दशनास आले.निरीक्षक कटके यांच्या सुचनांप्रमाणे सहायक निरीक्षक मुंढे, अंमलदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, राहुल साळुंके, सागर ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment