शिर्डीत मुस्लिम समाज वधू वरांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.
शिर्डी प्रतिनिधी-सामुदायिक विवाह ही काळाची गरज असुन अशा विवाह सोहळ्याच्या आयोजनाने अनेक गोर गरीब गरजुवंत कुटुंबाला आधार मिळत असुन हा विवाह सोहळा अनेकांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पार पडलेल्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्था शिर्डी शहराच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी केले. महरुम हाजी असगरअली सय्यद यांच्या स्मरणार्थ संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात चार जोडपे विवाहबद्ध झाले. संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून या विवाह सोहळ्याचे आयोजन होत असुन शिर्डीतील उर्दू शाळेत विविध क्षेत्रातील मान्यवर व मौलाना यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्यात संस्थेच्या वतीने कपाट पलंग व संसार उपयोगी वस्तू कन्यादान म्हणून भेट देण्यात
आल्या आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेमूदभाई सय्यद यांनी या विवाहासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन उपस्थित राहिलेले शिर्डी मतदार संघाचे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा संस्थेच्या व मुस्लिम समाजबांधवाच्या वतीने यावेळी सत्कार केला. तर या सोहळ्यास कमलाकर कोते , निलेश कोते , जगन्नाथ गोंदकर , दत्ताञय कोते , विजयराव कोते,हाजीमुन्नाभाई शाह,अशोक गोंदकर, अरुणशेठ गायकवाड़,शिराज देशमुख, हाजी रज्जाकभाई, अज्मोद्दीनभाई शेख,दत्ता गोविदराव कोते,नितिन दादा शेळके, सलीम मुल्ला जी, खलील शेख,हाजीअयूबभाईपठान,फिरोज भाई शेख,एकबाल कालूभाई,अशफ़ाक तंबोली, हाजीसिकंदर पठान,आदीसह शिर्डीतील सर्वपक्षीय नेते ग्रामस्थ उपस्थित होते. हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी हाजी शमसुद्दीनभाई ,महेमूदभाई सय्यद, अशरफभाई सय्यद, जावेदभाई शाह, सरदार भाई पठान,मुक्तारभाई सय्यद, गुलामरसूलभाई शेख ,दादाभाई ईनामदार ,अखलाक खान, साजिदभाई शेख ,सफीकभाई शेख,अयूब भाई शाह ,बरकत सय्यद,हैदर सय्यद,अर्शद शाह ,मुज्जुभाई मौ.असगरली, सलीमभाई शेख,रोशन पठान ,नदीम भाई शेख, मतीन सय्यद,जावेद इनामदार, अकरम सय्यद, व सर्व कार्यकारणी सदस्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment