कर्जत प्रतिनिधी - खूनप्रकरणातील पाच वर्षे फरार असणारे आरोपी पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. विजय लक्षम मोडळे (वय 29, रा.मोढळे वस्ती, राशीन ) असे पकडण्यात आलेल्याची आरोपीचे नाव आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सफौ तुळशीदास सातपुते, हेकॉ अण्णासाहेब चव्हाण, पोना संभाजी वाबळे, पोकॉ भाऊसाहेब काळे,अर्जुन पोकळे,देविदास पळसे, संपत शिंदे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मोढळेवस्ती, राशीन येथे जागरण गोंधळाचे कार्यक्रमात पैसे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपीत मजकूर यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमा करून फिर्यादीचा भाऊ आप्पा दगडू मोढळे व वडील दगडू महादेव मोढळे यांना तलवारीने, कुर्हाडीने,काठयाने मारहाण केली त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ आप्पा मोढळे हा गंभीर जखमी होऊन फिर्यादीचे वडील दगडू महादेव मोढळे हे मयत झाल्याने फिर्यादी अशोक दगडू मोढळे (रा. मोढळे वस्ती,राशीन ता कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 63/2016 भादवि कलम 302,307, 324,143,147, 148,149,504, 506 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी विजय लक्षम मोडळे (वय 29, रा. मोढळे वस्ती, राशीन) हा खेड भागात आल्याची गुप्त बातमी कर्जत पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ कर्जत पोलिस टीम रवाना करून आरोपीला बातमी मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेऊन अटक केली.

Post a Comment