Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी- चेक बाऊन्स प्रकरणात चार गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर फरार झालेला आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले अटक अटक केलेला इसम नामे विजय मुरली नरवाल , रा . सदर बाजार , पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार अहमदनगर याने उसनवार घेतलेल्या ३,४८,००० / - रु.या रकमेसाठी दिलेले चेक बाऊन्स झाल्याने सदर इसमा विरुध्द Negotiable Instruments Act १३८ प्रमाणे मा . अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर याचे न्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटला क्र . १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ , ४ ) ६३७/२०१२ असे चार खटले मा . न्यायालयात चालवुन सदर इसमास खटला क्रमांक १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ यामध्ये एकत्रितरित्या फिर्यादीस ३,४८,००० / - रु . नुकसान भरपाई देण्याचा आणि नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने सक्षम कारावास भोगण्याचा आदेश करण्यात आलेले आहे . इसम नामे विजय मुरली नरवाला याने मा . न्यायालयाचे आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाने त्याचे विरुध्द Conviction Warrant काढुन विशेष पथकामार्फत बजावणी करणे बाबतचे आदेश दिले होते . नमुद आदेश प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली कन्व्हेशन वॉरंट मधील इसमाचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की , इसम नामे विजय मुरली नरवाल हा जामखेड रोड येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस हेडकॉन्स्टेबल फकिर शेख , संदीप घोडके , विश्वास बेरड , दत्तात्रय हिंगडे , संदीप पवार , देवेंद्र शेलार , दिनेश मोरे , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक दिपक शिंदे अशांनी मिळुन जामखेड रोड , मुठ्ठी चौक येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असतांना एक इसम संशयीत रित्या फिरतांना दिसला त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेता त्याने त्याचे नाव विजय मुरली नरवाल , वय ३ ९ , रा . सदर बाजार पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार कॅम्प असे असल्याचे सांगितले . नमुद कन्व्हेशन वॉरंटमधील आरोपी हाच असलेबाबत खात्री झ आल्याने त्यास ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील  पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल  अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व  अनिल कातकाडे  , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



अहमदनगर प्रतिनिधी - सोनई येथे राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी पकडण्यात आला आहे. ही कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ऋषीकेश शेटे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकों सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव व चापाहेकॉ उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी आरोपी नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) व संतोष भिंगारदिवे (रा. घोडेगांव, ता. नेवासा) यांनी आरोपी ऋषीकेश वसंत शेटे

(रा. सोनई, ता. नेवासा) याचे सांगणेवरुन, मागील जुने भांडणाचे कारणावरुन, गैरकायद्याची मंडळी जमवुन भाऊ राहुल जनार्धन राजळे (वय २९, रा. लोहगांव, ता. नेवासा) यास शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फायरींग व जबर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या विकास जनार्धन राजळे (वय २७, रा. लोहगांव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गु.र.नं. १२३ / २२ भादविक ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, ९४९ सह आर्म अॅक्ट ३/२५ व मपोकाक ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील फायरींग करणारा आरोपी नितीन विलास शिरसाठ व त्याचा साथीदार संतोष उत्तम भिंगारदिवे अशा दोघांना ताब्यात घेऊन सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते.या गुन्ह्यातील आरोपी ऋषीकेश शेटे हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. पण आरोपी ऋषीकेश शेटे हा त्याचे राहते घरी हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे जाऊन आजुबाजूस सापळा लावून आरोपी शेटे यास शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता सोनई पोलीस ठाण्यात हजर केले.गुन्ह्याचा तपास शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्याकडे आहे. त्यांचे कार्यालयातील पोनि विजय क-हे यांनी गुन्ह्याचे तपासात व आरोपी अटकेमध्ये सहकार्य केले आहे. आरोपी ऋषीकेश वसंत शेटे वर या गुन्ह्या व्यतीरिक्त सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करून जातीवाचक शिवीगाळ, जबरी चोरी करुन जातीवाचक शिवीगाळ व दंगा असे एकूण ४ गुन्हे दाखल असुन दोन गुन्ह्यात तो फरार आहे.



श्रीरामपूर-लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-पवित्र कुराण सांगितले की , (१)" पृथ्वीवर सुधारणा घडवून आणा , सुधारणा केल्या नंतर कलह , उपद्रव माजवू नका , अल्लाहा चे भय बाळगुन सत्कर्मे करीत राहा , अल्लाहा सत्कर्म करणाऱ्यां बरोबर आहे "( अल-आराफ -५६).

(२) अगर तुमच्या वर कोणी आक्रमक केले ,तर तुम्ही सुद्धात्यांच्यावर अक्रमण करा , परंतु  त्यांनी केले तितकेच , पण मर्यादित , मर्यादांचे उल्लंघन करू नयेत ,  अल्लाहला मर्यादांचे उल्लंघन करणारे पसंद नाहीत .( अल -बकरा अ.नं. ९४,१९०,).

(३) त्यांच्याशी युद्ध करा ,जिथे  कुठे तुमचा त्यांच्याशी सामना होईल.आणि ,त्या ठिकाणांहून त्यांना हाकलून लावा ,जिथून त्यांनी तुम्हाला हाकलून लावले आहेत.(अल- बकराह आ.नं.१९१).

(४) "परवानगी दिली गेली युद्ध करण्याची ,ज्या लोकांवर वर अत्याचार केले गेले आहेत ,कारण ते अत्याचार पीडित आहेत " (सुरह नं.२२ अल- हशर -आ.नं.३९).

     आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला रात्री स्वातंत्र्य मिळवून ,देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज उंचावून मानवंदना दिली  , ती रात्र  ,हो ती रात्र  रमजान मुबारक ची लैलतुल -कद्र ची २७ वी रात्र व दिवस शुक्रवार च  व तराविह मधील खत्मुल कुराण ( समाप्ती) ही होती ..

 दिव्य कुरआन च्या संदेशानुसार एक गोष्ट लक्षात घेतली तर स्पष्ट होते की ,

   आम्ही ज्या मातृभुमी मधे ( वतन ) देशात  राहतात,त्या( भुमीशी ) , देशाशी ,वतनाशी , प्रामाणिक एकनिष्ठ , वचनबद्ध राहावे ..व त्या देशाशी वतनाशी प्राणपणाने लढावे व त्याचा लढता - लढता वीर मरण ( शहीद ) जरी आले तर वीरश्री( शहीदी ) पत्करावे .शहीद जरी झाले तर शहीद व्हावे ....हे पवित्र दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सांगितले आहे ..

" वतनाशी , देशांशी , मातृभूमी साठी मरण आले तर शहीद म्हणून मरताल , संबोधले जातिल.".

प्रेषित मुहम्मद स्व , सांगितले की , " शहीद " हा तात्काळ स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस) मधे मोठं जागा भेटते , " शहीदां" चा रक्ताचा फक्त एक थेंब जमिनीवर पडण्या आगोदर अल्लाहा ( ईश्वर)  त्या व्यक्तीस स्वर्गाचे दरवाजे ताबडतोब उघडताच." . शहीदांना पवित्र दिव्य कुरआन मधे खुप मोठा गौरव पुरस्कार असतो ..असे दिव्य कुरआन व हादिस मधे पुष्कळ ठिकाणी नमुद केलेले आहे.

पवित्र कुराण व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या मातृभुमी (आम्ही त्याला वतनपरस्ती  म्हणतात.) च्या शिकवणीनुसार , भारतीय स्वातंत्र्य चळवळीत , लढ्यात , लाखों मुस्लिमांनी भाग घेतला .भारत मातेच्या रक्षणासाठी लाखों मुस्लिमांनी (बलिदान)शहीद झाले आहेत .

अल्लाह (ईश्वरा)च्या आदेशानुसार मातृभुमी (वतन ) ना जो कोणी अत्याचार करेल , गिळंकृत करेल , लोकांना नाहक बळी,त्रास देतील , नाहक अत्याचार करतील त्यांच्या विरोधात लढुन ,  इंग्रजांच्या अत्याचार , आतोनात त्रासातून मुक्तता करण्यासाठी , 

 अल्लाहा च्या आदेशानुसार बलिदान शहीद झाले तर बक्षीस म्हणून मुस्लिम लोकांनी स्वीकार केला. 

१८५७ च्या पहील्या लढ्याचे नेतृत्व शेवटचे मुघल सम्राट बहादुरशहा जफर यांच्या कडे ,विरगंणा राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे , शिंदे , ई. भारतातील बहुतेक राजांनी त्यांच्या कडे नेतृत्व बहाल केले असताना , त्यांना रगुन जेल मधे काळया पाण्याची सजा सुनावली गेली, त्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्या दोन मुलांची मुंडके  कलम करुन त्यांच्या समोर आणुन  बहादुरशहा जफर यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न वारंवार केली परंतु त्या ब्लॅकमेल चा काहीच परिणाम आपल्या वतनपरस्ती ,मातृभुमीसाठी न होता त्यांनी सजा चा स्विकार केला परंतु देशाशी गद्दारी केली नाही .ऱगून मधील जेल मध्येच मृत्यू पत्करला.

.त्यांची इच्छा होती की , मातृभुमीच्या मातीतच  माझा देह  दफन करण्यात यावे ..

 परंतु इंग्रजांनी ही अट मान्य केली नाही ... बहादूरशहा जफर आजही रंगुनच्या मातीत दफन आहेत .मा.राजीवजी गांधी पंतप्रधान असताना त्यांनी त्या दफनभूमीतील माती आणुन भारतीय मातीत दफन करून त्यांची इच्छापूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे... 

अल्लाहा च्या शिकवणीचे महत्व बहादुरशहा जफर यांनी मातृभुमीसाठी " शहीद" होवून जन्नतुल फिरदौस चे हकदार झालेच असतील.

  जालियनवाला बाग च्या  जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडात , मृत्यू मुखी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात  मुस्लिमांची संख्या जास्त प्रमाणात होती .ं

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात, साठ टक्के मुस्लिम मोठ मोठ्या पदावर कार्यरत होते त्या सर्व मुस्लिम सरदारांनी आपल्या राजा बरोबरील वतन परस्ती ईमानदारी ने निभावून शहीद झाले ..

               म्हैसूर येथील टिपु सुलतान हे कट्टर देशभक्ती निभावताना इंग्रजांनीं त्यांना शहीद केले .

           नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौज मधे ही प्रमुख पदाधिकारी बहुतेक मुस्लिम सैनिक होते .

  राजस्थान मधे महाराजा महाराणा प्रताप  , महाराजा पृथ्वीराज चौहान व विविध राजांच्या सैन्यात प्रमुख सरदार हे मुस्लिम होते .

      #हा इतिहास आहे , परंतु मुस्लिम विरोधी इतिहास लेखकांनी मुस्लिम द्वेष फैलावण्यासाठी इतिहास ची मांडणी त्यांच्या पध्दतीने केली असो.

जगातील प्रत्येक देशात जिथे  मुस्लिम स्थानिक आहे त्या प्रत्येक देशात मुस्लिमांनी आपल्या देशाशी वतन परस्ती  प्रमाणिक निभावली आहे .

     भारतीय मुस्लिमांनी  पारतंत्र्यातील इंग्रजांच्या अत्याचाराला ,त्रास ,छळाचा , कडाडून विरोध करून मुह तोड जबाब उत्तर वेळोवेळी देउन इंग्रजांच्या जोखडातून भारत देशाला मुक्त करण्यासाठी लोखों ,कोटीं मुस्लिमांनी बलिदान देऊन भारतीय मातीतच दफन झाले. आहेत .

    आज  लैलतुल कद्र  २७  रात्र ,व शुक्रवार च्या योगा योगाने , भारतीय स्वातंत्र्यच्या आठवणी जाग्या होऊन .. भारतीय शहीदांना सलाम करावासा वाटतो.

लेखक डॉ सलीम सिकंदर शेख,बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 9271640014

श्रीरामपूर प्रतिनिधी-सध्या संपूर्ण राज्यभरात भोंगे, झेंडा वाद यासह विविध मुद्द्यांवरून तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान रमजान, अक्षय तृतीया यासारखे सण येत्या काही दिवसांत साजरे होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी श्रीरामपूर शहरातील विविध समाजांचे प्रतिनिधी, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके,तालुका पोलीस निरीक्षक मछिंद्र खाडे,पोलीस निरीक्षक संजय सानप आदींसह विविध पक्षांचे, संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सध्या तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू आहे. यातून सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. तरुणांची माथी भडकवली जात असल्याने अनुचित घटना घडत आहे. या घटनांमधून तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र असे तरुण रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांची माथी भडकावणारे कोणीही मदतीला येत नाहीत. वर्षानुवर्षे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्याचा विचार सर्वांनी करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर म्हणाले, ध्वनिक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. कायदा तोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई होईल. सामाजिक अशांतता निर्माण करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. मागील दोन महिन्यांपासून सायबर सेल, गोपनीय शाखांची पथके सतर्क आहेत. शहर शांत ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी जातीय सलोखा राखण्यासाठी इतरांना समजावून सांगणे आवश्यक आहे. तरुणांना अनुचित घटनांपासून परावृत्त करणे आवश्यक आहे. पालकांचीही यात मोठी जबाबदारी आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. वॉर्डांमध्ये, मोहल्ल्यामध्ये ग्रुप, कमिट्या तयार करून पोलिसिंगवर भर देण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियावर अत्यंत चुकीचे व विचित्र प्रकार सुरू आहेत. चुकीच्या बनावट क्लिप पसरविल्या जात आहेत. यातील काही लोकांपर्यंत पोलीस प्रशासन पोहचले आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन करत आहे. कोणावरही चुकीची कारवाई होणार नाही, याची दक्षता आम्ही निश्चितपणे घेऊ आपल्या श्रीरामपूर शहराचे नाव, जिल्ह्याचे नाव खराब होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मात्र, हेतूपुरस्सर कोणी चूक करत असेल, तर त्याला माफी नाही. बेकायदेशीर कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके म्हणाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आमची नजर आहे.काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.सोशल मीडियांवर काही आक्षेपार्ह पोस्ट जर आढळल्यास पोलिसांशी सम्पर्क करावा कोणीही कायदा हातात घेऊनये या साठी पोलीस तयार आहे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील याचा नागरिकांनी भान ठेवावा युवकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बैठकीतील सूचनांचा विचार सर्वांनी करावा आमच्या कडून निश्चितपणे उपक्रम भविष्यात राबवले जातील.येणारे सण उत्सव या साठी सांततां कमिटीची मिटिंग लवकरच घेणारच आहोत सर्वांना यात सहभागी करून घेतले जाईल. सण उत्सव पार पडल्यानंतर इतर वादांबाबत पुन्हा बैठक घेतली जाईल.

शिर्डी शहर प्रतिनिधी-शिर्डी शहरातील कनकुरी रोडरील हॉटेल साईकृष्णा या हॉटेलसमोर एका गाडीची चौकशी करत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास एकाने गोंधळ घालत अरेरावी करत धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिर्डी शहरात वाढत्या धूमस्टाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनकडून विविध उपाययोजना व विनानंबर वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कनकुरी रोडवरील हॉटेल साईकृष्णा समोर एक पांढरा रंग असलेली विनानंबरची दुचाकी उभी असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे व सरकारी वाहन चालक चौकशी करत असताना खंडु मारुती गोर्डे राहणार श्रीराम नगर शिर्डी याने गोंधळ घालून अरेरावी करत तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. माझी मोठी ओळख आहे. तुम्ही कोण लागून गेले, कागदपत्रे नाही असे सांगत धावुन आला सरकारी गणवेशावर असताना धक्काबुक्की केली. आरडाओरड करुन गोंधळ घातला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खंडु गोर्डे यांच्याविरुध्द भादंवि कलम 353,34अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करत असलेले ठिकाणी छापा टाकून 3.40 ब्रास वाळूसह दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन नायगाव येथील नदीपात्रात छाप टाकण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. मच्छिंद्र खाडे, हेड कॉन्स्टेबल भारत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, चांद पठाण, सुनील दिघे या पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करताना अनिल सोपान शेलार याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 5,07000 रुपयांचा मुद्देमाल आणि फारुख ख्वाजा शेख याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 507000 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 10,14000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर प्रतिनिधी-बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रुपये किमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 जण पसार आहेत. दरम्यान हे स्पिरीट श्रीरामपूरात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर विभागाच्या निरीक्षक, भरारी पथक क्रमांक 2 यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी वेल्हाळे शिवारातील हॉटेल हरीबाबा जम्मू-पंजाब चौधरी ढाब्याच्या मोकळ्या जागेत वाहतूक टँकरमधून स्पिरीट (मद्यार्क) तस्करी केली जाणार आहे. याबाबत पथकाने प्रत्यक्ष सापळा रचून तपासणी केली असता 4 व्यक्ती बेकायदेशीररित्या स्पिरीट काढतांना आढळून आले. याठिकाणी छापा टाकण्यात आला असता शहाजहान अफसर खान (वय-38, रा.उत्तरप्रदेश) व जुगल कुमार मंगुराम (वय-23, रा.जम्मू काश्मीर) यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्या 1949चे कलम 65 (अ) (ई), 80 (1), 81,83,90,98 (22) अन्वये 2 जणांना अटक करून व 2 जणांना फरार घोषित करून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत प्रत्येक टँकरमध्ये अंदाजे 34 हजार 600 लिटर स्पिरीट (मद्यार्क) असलेले 3 टँकर, 200 लिटरचे 5 बॅरल व सामग्री असे एकूण 1 कोटी 43 लाख 83 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक उषा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपाल चांदेकर, अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक पी.बी.आहिरराव, के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, के.के.शेख, एस.आर.वाघ तसेच प्रवीण साळवे, दीपक बर्डे, व्ही.आर.करपे, टी.आर.शेख,सचिन गुंजाळ, एस.एम.कासुळे, स्वाती फटांगरे यांनी सदर कारवाई केली. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास निरीक्षक गोपाल चांदेकर करत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget