Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-सध्या संपूर्ण राज्यभरात भोंगे, झेंडा वाद यासह विविध मुद्द्यांवरून तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान रमजान, अक्षय तृतीया यासारखे सण येत्या काही दिवसांत साजरे होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी श्रीरामपूर शहरातील विविध समाजांचे प्रतिनिधी, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके,तालुका पोलीस निरीक्षक मछिंद्र खाडे,पोलीस निरीक्षक संजय सानप आदींसह विविध पक्षांचे, संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सध्या तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू आहे. यातून सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. तरुणांची माथी भडकवली जात असल्याने अनुचित घटना घडत आहे. या घटनांमधून तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र असे तरुण रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांची माथी भडकावणारे कोणीही मदतीला येत नाहीत. वर्षानुवर्षे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्याचा विचार सर्वांनी करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर म्हणाले, ध्वनिक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. कायदा तोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई होईल. सामाजिक अशांतता निर्माण करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. मागील दोन महिन्यांपासून सायबर सेल, गोपनीय शाखांची पथके सतर्क आहेत. शहर शांत ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी जातीय सलोखा राखण्यासाठी इतरांना समजावून सांगणे आवश्यक आहे. तरुणांना अनुचित घटनांपासून परावृत्त करणे आवश्यक आहे. पालकांचीही यात मोठी जबाबदारी आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. वॉर्डांमध्ये, मोहल्ल्यामध्ये ग्रुप, कमिट्या तयार करून पोलिसिंगवर भर देण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियावर अत्यंत चुकीचे व विचित्र प्रकार सुरू आहेत. चुकीच्या बनावट क्लिप पसरविल्या जात आहेत. यातील काही लोकांपर्यंत पोलीस प्रशासन पोहचले आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन करत आहे. कोणावरही चुकीची कारवाई होणार नाही, याची दक्षता आम्ही निश्चितपणे घेऊ आपल्या श्रीरामपूर शहराचे नाव, जिल्ह्याचे नाव खराब होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मात्र, हेतूपुरस्सर कोणी चूक करत असेल, तर त्याला माफी नाही. बेकायदेशीर कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके म्हणाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आमची नजर आहे.काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.सोशल मीडियांवर काही आक्षेपार्ह पोस्ट जर आढळल्यास पोलिसांशी सम्पर्क करावा कोणीही कायदा हातात घेऊनये या साठी पोलीस तयार आहे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील याचा नागरिकांनी भान ठेवावा युवकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बैठकीतील सूचनांचा विचार सर्वांनी करावा आमच्या कडून निश्चितपणे उपक्रम भविष्यात राबवले जातील.येणारे सण उत्सव या साठी सांततां कमिटीची मिटिंग लवकरच घेणारच आहोत सर्वांना यात सहभागी करून घेतले जाईल. सण उत्सव पार पडल्यानंतर इतर वादांबाबत पुन्हा बैठक घेतली जाईल.

शिर्डी शहर प्रतिनिधी-शिर्डी शहरातील कनकुरी रोडरील हॉटेल साईकृष्णा या हॉटेलसमोर एका गाडीची चौकशी करत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास एकाने गोंधळ घालत अरेरावी करत धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिर्डी शहरात वाढत्या धूमस्टाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनकडून विविध उपाययोजना व विनानंबर वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कनकुरी रोडवरील हॉटेल साईकृष्णा समोर एक पांढरा रंग असलेली विनानंबरची दुचाकी उभी असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे व सरकारी वाहन चालक चौकशी करत असताना खंडु मारुती गोर्डे राहणार श्रीराम नगर शिर्डी याने गोंधळ घालून अरेरावी करत तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. माझी मोठी ओळख आहे. तुम्ही कोण लागून गेले, कागदपत्रे नाही असे सांगत धावुन आला सरकारी गणवेशावर असताना धक्काबुक्की केली. आरडाओरड करुन गोंधळ घातला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खंडु गोर्डे यांच्याविरुध्द भादंवि कलम 353,34अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करत असलेले ठिकाणी छापा टाकून 3.40 ब्रास वाळूसह दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन नायगाव येथील नदीपात्रात छाप टाकण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. मच्छिंद्र खाडे, हेड कॉन्स्टेबल भारत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, चांद पठाण, सुनील दिघे या पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करताना अनिल सोपान शेलार याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 5,07000 रुपयांचा मुद्देमाल आणि फारुख ख्वाजा शेख याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 507000 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 10,14000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर प्रतिनिधी-बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रुपये किमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 जण पसार आहेत. दरम्यान हे स्पिरीट श्रीरामपूरात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर विभागाच्या निरीक्षक, भरारी पथक क्रमांक 2 यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी वेल्हाळे शिवारातील हॉटेल हरीबाबा जम्मू-पंजाब चौधरी ढाब्याच्या मोकळ्या जागेत वाहतूक टँकरमधून स्पिरीट (मद्यार्क) तस्करी केली जाणार आहे. याबाबत पथकाने प्रत्यक्ष सापळा रचून तपासणी केली असता 4 व्यक्ती बेकायदेशीररित्या स्पिरीट काढतांना आढळून आले. याठिकाणी छापा टाकण्यात आला असता शहाजहान अफसर खान (वय-38, रा.उत्तरप्रदेश) व जुगल कुमार मंगुराम (वय-23, रा.जम्मू काश्मीर) यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्या 1949चे कलम 65 (अ) (ई), 80 (1), 81,83,90,98 (22) अन्वये 2 जणांना अटक करून व 2 जणांना फरार घोषित करून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत प्रत्येक टँकरमध्ये अंदाजे 34 हजार 600 लिटर स्पिरीट (मद्यार्क) असलेले 3 टँकर, 200 लिटरचे 5 बॅरल व सामग्री असे एकूण 1 कोटी 43 लाख 83 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक उषा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपाल चांदेकर, अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक पी.बी.आहिरराव, के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, के.के.शेख, एस.आर.वाघ तसेच प्रवीण साळवे, दीपक बर्डे, व्ही.आर.करपे, टी.आर.शेख,सचिन गुंजाळ, एस.एम.कासुळे, स्वाती फटांगरे यांनी सदर कारवाई केली. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास निरीक्षक गोपाल चांदेकर करत आहेत.

बेलापूर(वार्ताहर)राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारची पत ढासळली.त्यामुळे कोणी गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाहीत.राज्याला कोणीही लस द्यायला तयार नव्हते. महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे  टेंडर काढले जातात .तसेच दरपत्रकच तयार केले आहेत. राज्याची एव्हढी बिकट अवस्था कधीच झाली नव्हती. कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारचे योगदान काय? असा सवाल  भाजपचे नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जि. प.आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद नवले यांच्या निधीतून बेलापूर येथे पावणेतीन कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण आ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद नवले होते.


आ. विखे पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीचे एक एक मंत्री घोटाळ्यांमध्ये अडकले. वाळु माफियांनी उत्च्छाद मांडलाय. आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा  दुर्दैवी प्रयत्न होतोय. आत्महत्याग्रस्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकार न्याय देऊ शकले नाही. अपयश झाकण्यासाठी राज्यातील वसुली सरकारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. दारूमुक्तीचा निर्णय घेतला.मंत्र्यांनाच पैसे पुरेनात ते जनतेला काय देणार? असा सवाल करुन त्यांनी  राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.

याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाखाली १२० कोटी जनतेचे निशुल्क लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात १ लाख ६० हजार कोटी खर्च करुन गोरगरिबांना मोफत धान्य देऊन त्यांची भुक भागविली.काश्मीरसह  देशभर पंचायत राजच्या माध्यमातून गावागावांत विकास करण्यासाठी तसेच वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी पाऊले टाकली जात आहेत.

शरद नवले यांनी  मिळालेल्या संधीचे सोने करीत चांगले काम करुन एक नवा अध्याय रचला असे सांगत  आ. विखे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.बेलापूरला एक मोठा सांस्कृतिक ठेवा लाभला असुन  या गावाचा नेहमी अभिमान वाटतो. त्यामुळे गावाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही आ. विखे यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत येत्या ५ मे रोजी बेलापूरला कार्यक्रम घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की,पक्षभेद विसरून समविचारी लोकांना बरोबर घेऊन जनतेच्या विश्वासाला पात्र राहुन निवडणूक जाहीरनाम्यानुसार विविध विकासकामे पुर्ण करीत आहोत.गावात जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, झेंडा चौक सुशोभीकरण,उर्दु शाळा खोल्यांचे बांधकाम  आदींद्वारे कोट्यवधी रुपयांची कामे केली. त्यासाठी  आजी-माजी जि. प.अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले व सौ. शालिनीताई विखे यांनी मोठी मदत केली.पुढील काळात १२ कोटींची पाणी योजना,५० लाखांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,२५ लाखांची अद्यावत जिम आणि कम्युनिटी हॉल, प्रवराकाठी पर्यटन विकास आदी प्रस्तावित कामांसाठी सहकार्य करण्याची विनंती आ. विखेंना केली.


गावातील विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकार क्षेत्रातील सुयश आणि कार्याबद्दल मान्यवरांचा विखेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.


 यावेळी माजी सभापती दिपक पटारे यांनी विखेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच आमदारांना जमणार नाही असे काम नवलेंनी केल्याचा उल्लेख केला.सुनील मुथा यांनी दिवंगत खा. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्याप्रमाणेच आपण बेलापूरकडे लक्ष देण्याची विखेंना विनंती केली. सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वागत केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथ्था यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले.


या प्रसंगी सर्वश्री नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे,जि. प. सदस्या सौ. संगीताताई गांगुर्डे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भीमभाऊ बांद्रे,अनिल थोरात,जालिंदर कु-हे,सुधाकर खंडागळे,भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,रणजित श्रीगोड,सुवालाल लुंकड, कनजीशेठ टाक,पुरुषोत्तम भराटे, साहेबराव वाबळे,पोलीस पाटील अशोक प्रधान लहानुभाऊ नागले,गटविकास अधिकारी मच्छीन्द्र धस, उपअभियंता आर. एस. पिसे, शाखा अभियंता गोराडे, बेलापूर खुर्दच्या सरपंच सौ. वर्षा महाडीक, उपसरपंच अँड. दीपक बारहाते,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे, ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, वैभव कु-हे,सौ. प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, मिना साळवी आदींसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.


श्रीरामपुरात (प्रतिनिधी) येथील भारतीय लहुजी सेना च्या वतीने श्रीरामपुरात मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. सदर उपोषणास श्रीरामपुरात एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व  प्राथमिक शाळा आहे त्या शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर शाळा ची वालकॅमपाऊड भिंत खचली व तुटली आहे, मुतारी व शौचालय नाही इत्यादी अनेक मागणी साठी आज आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मा संजीवनदिवे गटशिक्षणाधिकारी व शाळा चे संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आलेले मा गोरे सर मुख्याध्यापक यांच्या हस्ते मा हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब बागुल,रज्जाक भाई शेख  जिल्हा अध्यक्ष ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, यांना लेखी आश्वासन  दिल्यानंतर व सर्व मागण्या त्वरीत पुर्ण करू आसे बोलल्या नंतर  उपोषण सोडण्यात आले.  सदर उपोषणास रिपई चे जिल्हा अध्यक्ष सुभाष ञिभोवन,आरपीआय जिल्हा अध्यक्ष संदीप मगर, सपा चे जिल्हा अध्यक्ष जोयब जमादार,सलमान पठान शिव स्वराज्य मंच  आदी पाठींबा दिला. उपोषण यशस्वी करण्यासाठी युसूफ शेख, सुभाष कुलकर्णी,  आमजत कुरेशी, सिकंदर भाई ताबोली, रमेश खामकर, चंदू पवार, मेहमूद पठान,  आदी कार्यकरते व पालक वर्ग उपस्थित होते.

श्रीरामपूर- लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-दिव्य कुरआन मधे , "  आम्ही (अल - कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरीत केले आहे (१)आणि , तुम्हाला काय माहीत की, " कद्र " ची रात्र काय आहे ???(२), कद्र ची रात्र हजार महीण्यांपेक्षा ही अधिक उत्तम आहे .(३), दुत ( ईशदुत) आणि रुह(जिब्राईल अलै.)त्यात आपल्या पालनकर्यांच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४), लैलतुल कद्र ची रात्र पुर्णतः " शांती  "आहे.. उषःकाला पर्यंत..(५)(  दिव्य कुरआन पारा ३० सुरह नं.९७ आ.नं.१ ते ५). 

# हजरत  ईबने अब्बास  म्हणतात , प्रेषित मुहम्मद सल्ल.  सांगितले  ," लैलातुल कद्र ची रात्र रमजान महीन्याच्या अंतिम चरणात येते ,अंतिम दहाची ,नऊ ,सात किंवा पाच रात्री राहिल्या तर  या रात्री येतात.(सहीह बुखारी २०२२).

हज.आयेशा रजि. प्रेषित मुहम्मद स्व.च्या पत्नी , सांगितले की," रमजानच्या अंतिम दहा रात्री जेंव्हा येत असत  , त्यावेळेस आम्हाला प्रेषित  स्व. स्वतः ड्रेस  परिधान करून, बरोबर घरातील सर्व मंडळींना  तीलावत , प्रार्थना  करण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागवीत असत." ( सहीह  बुखारी २०२४).,

   रमजान महिन्यातील पुष्कळ  अद्भूत घटना घडलेल्या आहेत, पुराणां ,   इस्लामी इतिहासामधे बर्‍याच नोंदी आढळतात .

रमजान मुबारक मधील  २१ ,२३ ,२५ ,२७ , २९   ,३० ची "लैलतुल जायजा " या पवित्र कद्र च्या  रात्री येतात . यांचं महत्त्व  शब्दातीत आहेत , ते व्यक्त करता येत नाहीत.

## या प्रत्येक  कद्र च्या रात्र  रोजच्या  दैनंदिन  रात्री (पेक्षा १०००) एक हजार महीण्यांपेक्षा ही अधिक महिन्यांच्या  रात्रीपेक्षा  जास्त  सबाब ( पुण्यं) असते . 

फक्त याच रात्रींना " लैलातुल  -कद्र '" च्या पवित्र रात्रीं संबोधतात .

दिव्य कुरआन म्हणते की, " आम्ही या रात्र मध्ये  दिव्य कुराण ग्रंथ  पृथ्वीवर  तुमच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत केला आहे ," "' आणि तुम्हाला काय माहीत की ही रात्र काय असते  ",  "  तुम्हाला कधी या रात्रीचे महत्त्व जाणाले.", "तर तुम्ही स्तब्द व्हाल ,व तुम्हाला भान राहणार नाही ," (सुरह नं.९७ आ.नं.१-ते - ५)

या कद्र च्या रात्रींच  महत्त्व आहे . 

अशाच प्रकारे संपूर्ण वर्षभर ,,(१)  ईदु आजहा( बकरी ईद) रात्र(२) ईदु ल फितत्र ( रमजान ईद) रात्र ,.(३)मोहरमची आशुरा १० वी रात्रीं चे महत्वही  काही औरच सांगितले आहे. 

  # यांमध्ये कोणती रात्र  महत्त्वाची आहे , हे तज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत . कारण अल्लाह (ईश्वरा)ने या दिव्य  कद्र च्या रात्रींचं  गुपित ठेवलं .

      कुरआन म्हणते की ," जे समोर आहे आणि जे काही गुपित आहे या सर्वांचे ज्ञान फक्त(ईश्वर),अल्लाहाकडेच आहेत ,  व आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ,फक्त तो पर्यंत मर्यादित आहे , जे (ईश्वराने) अल्लाहाने माणसाला प्रदान केलेले आहेत किंवा देवु  इच्छितो , या रात्रीचे  ज्ञान फक्त आल्लाहाने (ईश्वराने )आपल्या जवळ ठेवले आहेत  ".

                      मानवाला , दुआ ,नमाज , कुराण पढण करून ,नामस्मरण करून,  दया ,याचना करून .  कद्र ची रात्र  तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे शोधण्याचा प्रयत्न करा.

      (# @  काही तज्ञांनी ,एक हजार (१०००) महीन्यांच्या दिवसानुसार फक्त एका रात्रीत ,# किती -सेकंद ‌,#किती - मिनिटे, # किती -तास , # किती -दिवस, # किती- वर्षांची ईबादत ,बंदगी,होते त्यांची गोळा बेरीज केली .# एक १ सेकंद = २३ तास ईबादत , # १ एक मिनिट = ५८ दिवसांची ईबादत , # एक तास = ९ -८ वर्षे  ईबादत ,#  शेवटी एक रात्र = ८३ वर्षे (त्रेयांशी वर्षे) इयर्स , ईबादत ,बंदगी ( पुजा ) होते ..एवढी मोठी महत्वाची लैलतुल -कद्र च्या फक्त एका रात्रींचं  ##).

            # प्रेषित मुहम्मद स्व. सांगितले की, '' लैलतुल-कद्र 'च्या रात्री आल्लाह  शेवटच्या सातव्या आकाशावर  येऊन पृथ्वी तलावरील प्राणीमात्रांना व माणसांना आव्हान करतात की ,,

"" कोण आहे जे माझ्याकडे दयेची याचना करतोय की मी त्याला दया ,देईल , दाखवील '" 

 "  कोण आहे , जो करूणेची भिख मागेल ,मी त्याला करूणेची भिक देईल ", 

 " कोण आहे ,जो आपल्या केलेल्या लहान-मोठ्या पापांची क्षमा याचना मागतोय , की मी त्याला क्षमा देईल " ,

  "  कोण आहे ,जो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून माझ्याकडे मागणं मागतो मी , त्या सर्व मनोकामना पूर्ण करील ". "  सर्वांना मनोभावे माफी देईल."...

#  पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व म्हणतात की,"  या लैलतुल-कद्र च्या रात्री आल्लाहा  दोन्ही हात मोकळे करून मानव जातीस अव्हान करतात  की  , "   कोण आहेत जो एक आशा आल्लाहाला कर्ज दिईल की ,जो दरिद्री नाही व अत्याचारी  तर नाहींच ,''

                 आल्लाहाचे ( ईश्वरा)हे सकाळी भोर पहाटेपर्यंत आव्हान हे , क्षमा, दया, करुणा,बक्षिसे, देण्याचे काम चालूच असते, 

पण आपणाला त्या आव्हानांची फिकीर नसते ,आपण मस्तावलेले ,सुस्तावलेले झालेलो असतो ,  विचार करण्याची मानसिकताच नसते ,

# आल्लाहाला  काय गरज कर्जाची. जशी आपली आई जेव्हा आपल्याकडून काही अपेक्षा करते व आपल्याला याचना करते की मला काहीतरी दे अगदी त्याचप्रमाणे आल्लाहा ही आपल्याला आपल्या आईप्रमाणे जाणून-बुजून आपल्याला कर्ज मागतात ( गरीब ,अनाथ ,विधवा , भुकेल्या यासाठी) आपली परीक्षा घेत असतात .त्यांना काय घेणं परंतु आल्लाह कृपावंत ,दया , देणारे . कायम आपल्याला काहीतरी देतच असतात , आपल्या इच्छांची पूर्तता करत असतात. 

संपूर्ण मानवजातीने , प्राणिमात्र व जीवजंतू हे अल्लाहाचे‌ ,त्यानेच‌ निर्माण केलेले .सर्व जगात जगाने  कितीही मागितले तरी ,  अथांग महासागरात समजा ऐक सुईच्या टोकाला जेवढे थैंब येतील तेवढे व कणभरही कमी होणार नाहीत येवढी लिला एकठ्या अल्लाहा ( ईश्वराची )आहेत.

 कृपावंत ,दयावंत सृष्टीचा  स्वामी देणाराआहेत .

परमेश्वर आपल्याला  जेवढे योग्य  व कुवती, सहनशक्ती प्रमाणेच देतात . 

अल्लाह  परमदयाळू  ,कृपावंत आहे ,ते अत्याचारी तर ते नाहीत .

 ‌‌   # हजरत आयेशा रजि.म्हणतात की ," आपण केलेल्या सर्वप्रथम पापाची क्षमा मागा कारण आपल्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत ".

आज संधी आहे  , सेकंदा -  ला २३ तास , मिनिटाला ५८ दिवस ,व १ तासाला ९ वर्षे , विचार करा किती ईबादत बंदगी करुन  फायदा उचलण्याचा ,, अजुनही वेळ गेलेली नाही...उचला फायदा......

लेखक डॉ सलीम सिकंदर शेख

 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget