Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी - जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी क्रिकेट बेटींगव्दारे जुगार अड्डयांवर छापा टाकुन कारवाई करण्याबाबत जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पोलीस ठाण्यांना आदेश केला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी सदर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन कारवाईचे आदेश दिले होते.तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी अहमदनगर जिल्हयात आय.पी.एल. बेटींगची माहिती घेत असताना पो. नि. अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत, नगर शहरात हनुमान मंदिरापाठीमागे, सुर्यनगर, अहमदनगर येथे मोकळया मैदानात चेतन पांडुरंग वराडे ( रा. सुर्यनगर, अहमदनगर), प्रविण गिते (रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर) याचे सांगणे वरुन व त्याचे अर्थिक फायदयाकरीता कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सन रायझर्स हैद्राबाद या दोन संघामध्ये चालु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटींग जुगार खेळतो व खेळवितो अशी बातमी मिळाल्याने पथकातील, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ अण्णा पवार, पोना शंकर चौधरी, पोना सचिन आडबल, पोना लक्ष्मण खोकले असे सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपी क्र. १) चेतन पांडुरंग वराडे (वय ४१, रा. सुर्यनगर, अहमदनगर) यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातुन क्रिकेट बेटींग खेळण्यासाठी लागणारे जुगाराची साधने जप्त केली.खेळ हा प्रविण गिते ( रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर (फरार)) याचे सांगणे वरुन खेळवित असल्याचे त्याने सांगितल्याने सदर आरोपी क्र. १ यास ताब्यात घेवून जप्त मुददेमाल व आरोपी पोलीस स्टेशनला घेवुन जावुन वरील दोन आरोपी विरुध्द पोहेकों संदिप पवार यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर प्रतिनिधी- पहाटे ३ वाजेच्या सुमारास फिर्यादि अक्षय कुंडलिक गोल्हार वय 30 वर्षे, राहणार कोहिनूर मंगल कार्यालयासमोर सावेडी अहमदनगर,यांचे मालकीचे नगर सोलापूर रोड वरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात सात ते आठ आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करून व पिस्टलचा धाक दाखवून मोबाईल रोख रक्कम असा एकूण २,५५,८०० रुपये रकमेचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता.(सा,स,मो,)सदर घटनेबाबत अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२१ भादवि कलम ३९५,३९७ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता,वरील प्रमाणे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर व श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदरचा गुन्हा घडल्यास ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपी नामे १) कृष्णा विलास भोसले वय २२ वर्ष,रा. हातवळण दाखले,तालुका आष्टी,जिल्हा बीड,२) सुरेश पुंजाराम काळे वय ३८ वर्ष,रा.सोनवीर, तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर,३) रावसाहेब विलास भोसले वय ४० वर्ष,रा. हातवळण दाखले ,तालुका आष्टी,जिल्हा बीड,४) आजिनाथ विलास भोसले वय २५ वर्ष,रा. हातवळण दाखले,तालुका आष्टी,जिल्हा बीड, यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.आरोपींकडे वरील नमूद गुन्हा बाबत विचारपूस केली असता ते प्रथम उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले त्यांना अधिकृत विश्वासात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांना सदरचे गुन्हे त्यांचे साथीदार १) भरत विलास भोसले राहणार हातवळण तालुका आष्टी(फरार)२) पवन युनूस काळे राहणार गुणवडी तालुका अहमदनगर( फरार) अशांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले होते तपासादरम्यान सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का)कलम ३(१)(!!),३(२)व ३(४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना दिले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकाची नेमणूक करून सपोनि.सोमनाथ दिवटे,पोसई.सोपान गोरे,पोहेकाँ.संदिप पवार, दत्तात्रय इंगळे,सुनील चव्हाण,संदीप घोडके, दिनेश मोरे,विश्वास बेरड,शंकर चौधरी,राहुल सोळंके,मेघराज कोल्हे,जालिंदर माने,योगेश सातपुते,चापोहेकॉ.बबन बेरड, संभाजी कोतकर,भरत बुधवंत यांचे पथकाची नेमणूक करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या पथक पोलीस अधिकारी व अंमलदार नगर तालुका हद्दीमध्ये पेट्रोलिंग फिरत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी नामे पवन काळे हा गुणवडी तालुका नगर येथे त्यांचे राहते घरी येणार असून आता गेल्यास मिळून ही अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कटके यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ गुणवडी तालुका नगर येथे रवाना करून मिळालेल्या बातमीच्या माहितीवरून आरोपी बाबत माहिती घेऊन कारवाई करणे बाबत सूचना दिली. पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी गुणवडी तालुका नगर येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन सापळा लावला थोड्याच वेळात(सा ,स,स) मिळालेल्या माहितीतील एक संशयीत इसम त्यांचे राहते घरी परिसरात येताना पथकाला दिसला पोलिस पथकाची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला बातमीतील आरोपी हा सदर इसम असल्याची पथकाचे खात्री होताच त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले त्याला पोलिस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव व पूर्ण पत्ता विचारला असता त्यांने सुरुवातीस तो उडवा उडवीचे उत्तरे देऊन लागला त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पवन युनूस काळे राहणार गुणवडी तालुका नगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२१ भादवि कलम ३९५,३९७,सह आर्म अॅक्ट कलम व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम हा गुन्हा केल्याची कबुली दिली.  आरोपीविरुद्ध विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी अहमदनगर ग्रामीण विभाग,श्री.अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची  131 वी जयंती श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार माननीय  भानुदास मुरकुटे तसेच जयंती समितीचे अध्यक्ष श्री सुरेश अमोलिक उपाध्यक्ष सुधीर तेलोरे विश्वास अमोलिक राजेश अमोलिक  यांच्या उपस्थितीत संपन्न झाली  बेलापूरातील मुख्य ध्वजस्तंभाजवळ उत्कृष्ट अशी सजावाट करुन त्या ठिकाणी महामानव डाँक्टर बाबासाहेब  आंबेडकराचा पुतळा ठेवण्यात आला होता  या वेळी महिलानी देखील  महामानवास अभिवादन केले या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक बाजार समिती संचालक सुधीर नवले सरपंच महेंद्र साळवी पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले दिलीप दायमा किशोर कदम ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक भाई शेख रमेश अमोलिक   भारत साळुंके विलास नाना मेहेत्रे प्रल्हाद अमोलिक दिलीप अमोलिक  हाजी इस्माईल शेख एकलव्य संघटना अध्यक्ष बाबुराव पवार राहुल तेलोरे मयूर खरात अमोल तेलोरे अलिशा अमोलिक पवन रणदिवे मेजर निलेश अमोलिक विकास अमोलिक गौरव वाकडे सागर साळवे  बाबुलाल भाई पठाण स्वप्नील अमोलिक अल्ताफ शेख बबनबाई अमोलिक प्रभावती अमोलिक आशाबाई तेलोरे शिंधु खरात सुशीला खरात सुनीता तेलोरे अनिता खरात आरोही तेलोरे नीलम तेलोरे तेरेजा तेलोरे सीमा तेलोरे जयश्री जाधव  अमोलिक जयेश अमोलिक अनिकेत गजभिव निलेश सोनवणे रजनीकांत तेलोरे अल्ताफ भाई शेख अरुण अमोलिक  उपस्थित होते शेवटी ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले या वेळी गावातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

श्रीरामपूर-लेखक:-डॉ सलीम सिकंदर शेख - ईस्लाम या शब्दाचा अर्थ,"अल्लाहा (ईश्वरा) समोर संपूर्ण समर्पण करणं " असा होत असून ' आरबी " भाषेत त्याचा अर्थ " शांतता " असा होतो. श्रद्धेसाठी तांत्रिक दृष्टीने वापरण्यात आलेला शब्द " ईमान " असून मुळ शब्द " अमन " अमन पसंद " त्याचा अर्थ ही " शांती " च होतो. कोणत्याही कार्याची सुरुवात ही ," बिस्मिल्लाह- हिर- रहमान निर- रहीम " अर्थात :- अल्लाहा च्या नावाने सुरूवात करतो ,जो कृपाळू -दयाळू आहेत.

पवित्र कुराण ची सुरुवातच आशा आयातीने होउन पहील्या पारा १  व पहील्या सुराहा नं.१ यामध्ये , (१)सर्व स्तुती ही फक्त अल्लाहा साठीच आहेत ,जो संबंध सृष्टीचा रब आहे. " रब " या शब्दाचा अर्थ मालक , पालनपोषण करणारे, समस्त सृष्टीची काळजी घेणारी, देखरेख करणारे,शासक व्यवस्थापक , (२) तोच एकमात्र कृपावंत,दयावंत आहे , (३)प्रलय(कयामतच्या) दिवसाचा स्वामी फक्त तोच आहे,(४) आम्ही, सर्व जण तुझीच बंदगी ( ईबादत , भक्ती ) करतो ,(५) फक्त व फक्त तुमच्या जवळच (पाशी)मदत मांगतो ,(६) आम्हाला सरळ मार्ग दाखवं ,(७)जे कोपग्रस्त झाले नाहीत, व जे मार्ग भ्रष्ट नाहीत ( अर्थात, ज्या मार्गाने तुम्ही खुश आहेत ) असा सरळ मार्ग आम्हाला दाखवां..( अल-,फातिहा १ ते ७).

पहिल्या प्रथमच पवित्र कुराण मधे ईस्लामचा स्वभाव, वैशिष्ट्ये दर्शवली आहे.  त्यामधे शांतता, स्नेहभाव, प्रेम, परोपकार आहे, वविशेष महत्त्व प्राप्त झालेत ते प्रेम, करुणा, सहानुभूती ही बांधवाप्रती व संपूर्ण सृष्टीप्रती .

या संबंध सृष्टीला मार्ग , दिशा दाखवण्यासाठी वेळोवेळी  सव्वा लाख प्रेषीत पाठवले.त्यात अंतिम प्रेषित मुहम्मद स्व यांना सृष्टीच्या मार्गदर्शनासाठी त्या बरोबरच पवित्र कुराण हे समस्त सृष्टीला "जीवन कसे जगावे " यासाठी पाठवले.

  प्रेषित मुहम्मद स्व . सांगताना की, " सर्व निर्मित  प्राणीमात्र अल्लाहा (ईश्वरा) ची लेकरे आहोत म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या मानवी शी जो प्रेम करतो, त्यांच्या शी अल्लाहा (ईश्वर) प्रेम करतात ."

पवित्र कुराण म्हणते ," जो अणु-रेणू ईतके ही सत्कर्म , त्याचे ही फळ त्याला जरूर मिळेल, व जो अणु- रेणू ईतके ही दृष्ट - कर्म (वाईट कृत्ये )करील त्याला त्याचे वाईट फळ  ( त्याला चाखायला मिळेल) मिळेल."  (सुराह नं.८ अल- जिल -जलाल आ.नं.८).

  सृष्टीच्या निर्मितीनंतर चे पहिले प्रेषित हजरत अदम ( अॅडम) अलै. यांच्या पुत्र  कैन याने त्याच्याच भाउ ' अबेल ' ची हत्या केली .या जगात  घडलेल्या पहिल्या पहिल्या खुना बदल पवित्र कुराण मधे अल्लाहा  सांगतात , "  कोणाचीही हत्या न घडता पृथ्वीवर उपद्रव मागविण्या करिता ,. जो  एखाद्या ही माणसाचा खुन , हत्या करील ..तर ..समजा त्याने  संपूर्ण मानवजातीची हत्या  केली व करणारा ठरैल ..., व....जो कोणी एका मानवाचे रक्षण करील ...त्या व्यक्तीला अखिल, सर्व , मानवी जातीचे रक्षण केल्या सारखं होईल .ते श्रेय मिळेल..''"( सुराह नं.५ अल- माईदा ,आ.नं.३२ वी).

        ईस्लाम धर्माने देशात, समाजात कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाया करण्यासाठी मुळीच परवानगी दिलेली नाही व देत ही नाहीत. पृथ्वीवर मानवी कल्याणासाठी व सुखरूप राहावं म्हणून या जगात अल्लाहा सुधारणा घडवून आणण्यासाठी पवित्र कुराण मधे स्पष्ट शब्दात आदेश देतात की, "  पृथ्वीवर  तिच्यामधे सुधारणा घडवून आणा व सुधारणा घडवून आणल्या नंतर पृथ्वीवर उपद्रव ,कलह माजवू नका , आणि भयमुक्त आशेने अल्लाहा (ईश्वर) ची प्रार्थना करीत राहा . अल्लाहा चे वरदान ,कृपा ,कायम सत्कर्मे करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत."  ( सुराह अल -आराफ आ.नं.५६ ).

वरील सर्व पवित्र कुराण व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या सांगण्यावरून हे लक्षात येते की जे जे लोकं आपल्या दृष्ट प्रवृत्ती ने , दृष्ट विचाराने ,वागण्याने , पृथ्वीवर जाणूनबुजून कलह , उपद्रव ,विष पसरविण्याचे काम , प्रयत्न करतात त्यांच्या साठी एक प्रकारची तंबीच आहे.व जे जे खरोखरच पुण्यं च , समाजातील सर्वच थरातील लोकांच्या कल्याणासाठी झटतात त्यांच्यासाठी एक वरदान च आहे.

   ईस्लाम ने कोणत्याही जाती धर्माचा कधीच केव्हाही तिरस्कार केला नाही .ईतर कोणत्याही बाबतीत बळजबरी करण्याची कधीच परवानगी दिली नाहीत.याबाबत ..

पवित्र कुराण म्हणते की, " धर्माच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही.."(सुराह नं. २ अल- बकराह आ.नं.२५६).

                         हे सत्य आहे की ईस्लाम अत्याचाराविरोधात, असत्या विरोधी , अन्यायाविरुद्ध , जे जे लोकं नाहक त्रास देतात त्याविरोधात,  स्रीयां वर जेथे जेथे अत्याचार  किंवा त्यांच्या चारित्र्यावर हनन होत असेल तर , स्त्रियांच्या रक्षणा साठी आवाज उठवतो .. जेथे जेथे काही चुकीचे होत असेल आशा ठिकाणी आवाज उठवण्यासाठी परवानगी देतो .

             परंतु , सर्व आक्रमकांना , विरोधकांना , शक्य तो  संयमाने ,नेमेस्त पणे ,शांतीने उत्तर द्यायचे आव्हान करतो .

याबाबत पवित्र कुराण म्हणतात की," तुम्हाला जर बदला घेण्याचा असेल तर ,जितक्या प्रमाणात तुमच्या वर  करण्यात आला ,आगदी  तेवढ्याच प्रमाणात ...पण , परंतु ...जर संयम राखाल तर तुमच्यासाठी ते अधिक चांगले होईल ...जर शांतते कडे त्यांचा कल असेल तर तुम्ही ही शांततेकडेच झुका .." , सुराह नं. २ अल - बकराह आ.नं.८१).

यासर्व पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या  आदर्शवत शिकवणीनुसार व जीवन चरित्रानुसार  हे निर्विवाद सत्य व सिध्द  होते की ईस्लाम कधीच केव्हाही जातीयवाद विद्वेष व दहशतवादी कारवाया करण्यासाठी कधीच उत्तेजन देत नाहीत . ईस्लाम चा कायम शांततेकडे कल ,झुकाव राहीलेला आहेत....

डॉ सलीम सिकंदर शेख  बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर ९२७१६४००१४

संगमनेर प्रतिनिधी-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेरात गुरुवारी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीला काही तरुणांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला.मिरवणूक मेनरोडवर येताच एका समाजाचे काही तरुण हिरवे व लाल झेंडे घेवून मिरवणुकीत घुसले. या तरुणांनी घोषणाबाजी करत दुसर्‍या समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या. तसेच काहींना धक्काबुक्की करत महिलांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 100 ते 120 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मेनरोड येथे आली असता एका समाजाच्या काही तरुणांनी हातात हिरवे व लाल झेंडे घेवून मिरवणुकीत प्रवेश करत घोषणाबाजी केली. यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला. घोषणाबाजी करत असतांना मिरवणुकीतील काही महिलांना या तरुणांनी अपमानास्पद वागणूक दिली. तसेच धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने मिरवणुकीतील रथासमोर विक्षीप्त हावभाव करत रथ अडविण्याचा प्रयत्न केला. व पुतळ्याची हेळसांड करुन धार्मिक भावना दुखावल्या. फिर्यादी व साक्षीदार यांच्या जातीय विषयी दुसर्‍या समाजात द्वेष निर्माण करुन दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने या तरुणांनी गैरवर्तन केले. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे 3 वाजता किशोर सुदामराव चव्हाण (रा. दिल्लीनाका, संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी फिरोज गुलाब बागवान (रा. मोमीनपुरा), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इकबाल बागवान, सोहेल इकबाल शेख, अल्ला अजीज शेख, हमजा शेख, साबीर शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजान गफ्फार याचा मुलगा (नाव माहित नाही), मारुफ अस्लम बागवान व इतर 100 ते 120 (सर्व रा. संगमनेर) जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 270/2022 भारतीय दंड संहिता 295 (अ), 296 (अ), 153 (अ), 453 (अ), 143, 147, 120 (ब), 323 व अनुसुचित जाती जमाती अधिनियम सुधारित कायदा 2015 ते कलम 3(1), (यू)(व्ही)(डब्ल्यू), 3 (2) (5, ए) प्रमाणे दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी मारुफ अस्लम बागवान (वय 20, रा. बागवानपुरा, संगमनेर), अब्दुल समद जावेद कुरेशी (वय 21, रा. भारतनगर, संगमनेर) यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे.


लेखक -  डॉ. सलीम सिकंदर शेख-पवित्र दिव्य कुरआन  नुसार ,"" ज्याने मला जन्म दिला आहे ,तो ही मला सरळ मार्ग दाखवतो  # तोच मला अन्न-पाणी देतो #,आणि आजारी पडलो तर तोच मला बरा करतो# तोच मला मृत्यू देईल आणि मग पुन्हा तोच मला कयामतच्या दिवशी जिवंत करील # आणि ज्यांच्यापासून मी आशा बाळगतो की,तोच (कयामतच्या) मोबदल्याच्या दिवशी माझी चुक माफ करील  ," (पवित्र कुराण ,पारा नं.१९ ,सुरहा नं.२६ ,अल-अशुराह आ.नं.७८,७९,८०,८१,८२).

     #" तोच सृष्टीचा निर्माता ,रब (पालनकर्ता) आहे  , तोच एक मात्र कृपावंत ,आणि दयावंत आहे ." (  पारा नं.१ सुरह नं.१  अल -फातिहा आ.नं.१,२)

     #" तोच चिरंतरजीवी असून ,तमाम सृष्टीचा भार त्यानेच सांभाळलेला आहे , पृथ्वी व आकाशाचा स्वामी (रब) तोच आहे " ( सु..नं.२ आ.नं.२५९).

     # "  समस्त सृष्टीचा स्वामी ( रब) तोच आहे , प्रतिष्ठा प्राप्त करणारा ही तोच (रब) आहे व अपमानित करणारा ही तोच आहे  " ( सु.नं.३ आ.नं.२६-२७)

     # "  आकाशातील चंद्र सुर्य तारे सर्व काही त्याचेच आहे ,तोच जी्न व मृत्यू देणारा आहे "( सु. नं.१०, आ.नं.५५-५६).

       #"  पृथ्वी व आकाशातील गुप्त सत्यांचे ज्ञान फक्त त्यालाच आहे ,तो सर्व ज्ञानी आहे ,तो सर्व काही करु शकतो "( सु. नं. १६,आ.नं. ७७)

     #" सृष्टीच्या प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे ". (सु.नं.२०,आ.नं.५०).

      #" मागिल व पुढील सर्व समई तोच आहे , चिरंजीवी व चिरस्थानी तोच आहे ." ( सु. नं. २० आ.नं.११०-१११).

         -- " तोच सर्वोत्तम उपजिविका देणारा आहै , सर्वत्र आहे ." ( सु. नं. २२ आ.नं.५८ व ६६).

     #" तोच असण्याला नष्ट करतो , सत्याला खरे करून दाखवतो , लोकांची निराशा झाल्यानंतर ही पाउस पाडतो " ( सु.नं..४२ आ.नं.२४ व ३१).

   #" तोच जबरदस्त व बुद्धीमान आहे , तोच आद्य ही आहेत व  अंतिम ही तोच राहाणार आहे  , तोच प्रकट ही आहे व तोच अप्रकटही , व. तोच मनातील रहस्ये ही जाणणारा ,"( सु.नं.५७ आ.नं.१ ते ६).

    #"तोच वाली व दाता आहे , तोच मृतांना जिवंत करणारा (कयामतच्या दिवशी) आहेत ." (सु. नं.४२ आ.नं.९).

      #" कोणीही त्याचा पुत्र नाही व त्याच्या बादशहीत कोणीही त्याचा भागिदार नाही ." ( सु. नं.१७ आ.नं.१११).

       # " तोच क्षमा करणारा ही आहे व कठोरातील कठोर शिक्षा देणारा ही तोच आहे ." ( सु. नं.१३ आ.नं.६)

       # " तरी ही तो - निरपेक्ष आहे , कोणीही त्याची संतती नाही व तो ही कुणाची संतती नाही ." पारा नं ३० सु.नं ११२ सुरह -ईखलास आ.नं.१ ते ४).

   

आपण  सृष्टी वर तारकीक लक्ष दिले तर , निश्चितच आपण आश्चर्यचकित होत असतो , सृष्टीतील प्रत्येक कण न कण , चंद्र सुर्य ,तारे ,प्रत्येक घटना आपल्याला आश्चर्य चकीत , चमत्कारिक, अदभुत करुन सोडतात . सृष्टीच्या निर्मितीचा व सृष्टी चा सुनियोजित आराखडा ,रचना ,  पद्धती, त्यांची प्रत्येक वेळेस ची अचुकता , आप-आपल्या वेळी , त्यामधे मिली सेकंदाचा ही फरक नाही ,एवढी अचुकता , चंद्र सुर्य तारे पृथ्वी यांच्या मधे एक मिली सेंकदाचाही फरक न होता आपल्या वेळेनुसार रूतूचक्र  फिरत आहेत .येवढं अदभुत चमत्कार आज विज्ञानाच्या युगात सुद्धा आपण आश्चर्यचकीत होऊन पहात असतो. एवढ्या जगात , एवढ्या मोठ्या जनसंख्येला वेळेवर तीन वेळा पोटात अन्न , व समुद्रात जवळपास १८००० आठरा हाजार जिवजंतु आहेत ( कुरआन च्या नुसार) फक्त समुद्रात ..त्यामधे एकटा व्हेल मासा फक्त कितीतरी टन ,टन एका वेळेस खातो .. फक्त एक व्हेल मासा .असे  कोटींनी जिवजंतु जिवंत पृथ्वीवर आहेत . त्यामध्ये प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळे ,  नखरे वेगवेगळे हे सर्व सिस्टिम बघून माणूस हैरान होत असतो ..पण सृष्टीच्या प्रत्येक जिवजंतु , प्राणी मात्रा , प्रत्येक आणु व रेणू ,ची साचेबद्ध रचना बनवली आहे , प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध , साचेबद्ध , काम करीत आहे, प्रत्येकाला आप -अपलं अस्तित्व -ओळख देऊन जन्माला घातलं  आहे., सृष्टीत चराचरात चैतन्य भरलेले पाहायला मिळते , प्रत्येक जिवाला एक आपलं वैयक्तिक पातळीवर वैशिष्ट्य बाहल केलेलं आहे . 

सृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू जन्मापासून मृत्यूपर्यंत एक साचेबद्ध नियमितपणे नियमबद्ध जीवन जगत आहे , हे कोणीतरी चाललंय हे लक्षात घेतलं तर .

आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला तो जन्माला येण्याआधी त्याला उपाशी पोटी राहु नाही म्हणून येण्याआधीच दुधाची सोय पुर्ण करुन ठेवतो .किती अद्भूत आहे हे सर्व विचार केला तर.त्या बाळाला थोडं थोडं  मोठं करतो आई बाबा , समाजाच्या प्रत्येक घटकांकडून काही तरी शिकायला देतो.

जमीनीतुन एक दाणा पेरणी केल्यानंतर त्या दाण्याचे रूपांतर असंख्य संख्येने करून ते धान्य , प्रत्येक दाण्यांची विल्हेवाट लाउन , प्रत्येकाला त्याच्या भुकेच्या वेळेनुसार पोटात घालतो .किती अद्भुत आहे ना ? विचार केला तर आश्चर्य करण्याशिवाय पर्याय नाहीच नाही. 

ज्याच्या त्याच्या कर्तृत्वानुसार , कर्मानुसार तो मोठा होत जातो , ५०,६०,७०,८०-१०० जगून जग सोडून जातात , सृष्टीच्या प्रत्येक कणा - कणाला मग काही ही आसो त्याला मरण हे निश्चित  ,सत्य आहे ( कुल्यु नफसून जायकतुल मौत ), मृत्युनंतर तो कयामतच्या दिवशी जीवंत सुद्धा करणार आहे , तुम्ही या जगात केलेल्या चांगल्या- वाईट कामांचं हिशोब घेण्यासाठी..हे जीवन चक्र आहे.

           हे सर्व फक्त  अदृश्य अल्लाहा च चालवत असतो. .!!.

अल्लाहा बद्दल काही ही व्याख्या करताच येणार नाहीत , .

                       पवित्र कुरआन पारा न. १५ मधे  ,"हे पैगंबर (स्व.) सांगा की,जर सात ही समुद्र हे  माझ्या पालनकर्तयाच्या गोष्टी लिहिण्यासाठी शाई (लिहीण्याची) बनला तर ,तो समुद्राची शाई संपेल , परंतु ,पालणकरत्याच्या गोष्टी संपणार नाही, इतकेच नव्हे तर पुन्हा तितकीच शाई आम्ही आणली तरी देखिल पुरेशी ठरणार नाही ," (सुराहा अल - कहफ आ..नं.१०९) ..!!!.

लेखक -  डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा जनरल हॉस्पिटल

श्रीरामपूर ९२७१६४००१४

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात विनापरवाना शस्त्रे घेवून फिरत असलेल्या एक़ास गुन्हे अन्वेषण नगरच्या पोलीस पथकाने सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्याचेकडून एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे जप्त केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बीफ मार्केट परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रविंद्र घुंगासे. रोहित येमुल, मेघराज कोल्हे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे या अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बीफ मार्केट, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला.त्यानंतर काही वेळातच एक संशयीत इसम बीफ मार्केट परिसरात फिरतांना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असे एकूण 30,500/ रू.कि.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली असून ते जप्त करण्यात आले आहे. त्याचे नाव अंजर इलीयाज शहा वय 22, रा. बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं. 2, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र तुकाराम धुगांसे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 268/2022, नुसार अंजर इलीयाज शहा याचेविरुध्द भादंवि कलम आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget