Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-एका वर्षात गांवकरी मंडळाने स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला आहे.  ग्रामपंचायतीच्या शताब्दी वर्षानिमित्त गाव व वाड्या वस्त्यावर वेगवेगळ्या योजना राबविणार असुन गावाचा चेहरा मोहरा बदलवणार असल्याची ग्वाही गांवकरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले यांनी दिली           गांवकरी मंडळाने एक वर्षाचा कार्यकाल पुर्ण केल्याबद्दल केलेल्या कामाचे मूल्यमापन त्या बाबत कार्यकर्त्यांच्या सूचना तसेच सोसायटी निवडणूकितील पराभवाचे विचारमंथन या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी नवले वस्तीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालींदर कुऱ्हे होते. जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले,की गावाचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन गांवकरी मंडळाचा उदय झाला विरोधकांच्या अनेक वावड्या उठत असतानाही बेलापुर ग्रामपंचायतीत मंडळाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारभार केला आहे. कोरोना काळात ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच विनामूल्य कोवीड सेंटर सुरु करुन अनेक रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचे काम करता आले .गांवकरी मंडळावर नेत्याचा पूर्णपणे अंकुश असुन कुठल्याही चुकांची पुनरावृत्ती होवू देणार नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले गेले नाही. गावाला फील्टर पाणी देण्याचा आमचा मानस आहे तसेच तरुणांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देण्याकरीता व अभ्यास करण्याकरीता स्वतंत्र इमारत उभारणार आहे.बेलापुर हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आधार गृपच्या माध्यमातून सामूहीक गट शेती करावयाची योजना असुन या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य हाती घेणार असल्याचे नवले म्हणाले.या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की गांवकरी मंडळाच्या विजयानंतर गावात एकही फ्लेक्स बोर्ड लावला नाही.दररोज एका नागरीकांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची नवी परंपरा सुरु केली. महानुभाव आश्रमाजवळीला रस्ता खूला केला,खटोड काँलनीतील गटारीचा रेंगाळलेला प्रश्न सोडवीला.राजकारणा पलीकडे जावुन गावाचा विकास करण्याचा आमचा मनोदय आहे बेलापुर सोसायटीत झालेला पराभव हा तांत्रीक कारणामुळे झालेला पराभव आहे आमचे सर्व सदस्य प्रामाणिकपणे काम करत असुन विरोधकांना देखील आरोप करण्याची संधी आम्ही दिली नसल्याचे खंडागळे म्हणाले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, सुनिल मुथा,रणजित श्रीगोड, देविदास देसाई विलास कुऱ्हे प्रमोद अमोलीक बाळासाहेब वाबळे, बाळासाहेब दाणी,लहानु नागले तंटामूक्ती अध्यक्ष  पुरुषोत्तम भराटे भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,विलास कु-हे,मोहसीन सय्यद,प्रमोद अमोलिक,अकबर सय्यद, लहानु नागले,आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कनजीशेठ टाक, भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,यादव काळे,ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान,मीना साळवी,उज्वला कुताळ,प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक,चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,रमेश काळे,शांतीलाल हिरण,प्रविण बाठीया,संजय बाठीया,पत्रकार दिलीप दायमा,किशोर कदम,वृद्धेश्वर कु-हे,रामदास वाबळे,गोरक्षनाथ कु-हे,मधुकर अनाप,सुरेश बोंबले,शाम मेहेत्रे,शशिकांत नवले,प्रकाश मेहेत्रे,प्रभाकर खंडागळे,अनिल कु-हे,संजय गोरे,सारंगधर खंडागळे,राकेश कुंभकर्ण, प्रशांत मुंडलिक,नितीन शर्मा,गोरख कुताळ,चंद्रकांत लबडे,प्रभात कु-हे,टिंकू राकेचा,लक्ष्मण राशिनकर,शहानवाज सय्यद,अशोक लबडे, सचिन वाघ,शफीक बागवान,दादासाहेब कु-हे,रवींद्र कुताळ,राजेंद्र कुताळ,अजीज शेख, श्रीहरी बारहाते,अल्ताफ शेख,बापू कु-हे,दादासाहेब कुताळ,रावसाहेब अमोलिक,शरद अंबादास नवले,राजेंद्र काळे,मास्टर हुडे,गोपी दाणी,भाऊसाहेब राक्षे,कुंदन कुताळ, अजय शेलार, बाळासाहेब शेलार,विजय हुडे,समीर जहागिरदार,नंदू शेलार,प्रभाकर ताके,जब्बार आतार,प्रतीक मुथ्था,रफिक शेख,रावसाहेब कु-हे,अक्षय दहिवाळ,नवाब सय्यद, रमेश लगे,सचिन हरदास,भिकाजी मेहेत्रे,समद सय्यद,जय संचेती,मंगेश नजन,विजय पोपळघट,अन्वर सय्यद,रमेश कुमावत,राम सोनवणे, विशाल आंबेकर,संदिप जाधव, अमोल गाडे,महेश कु-हे,सचिन जाधव,अक्षय गाढे,ऋषीकेश नवले,हरिष शेजुळ,सुभाष राशिनकर,दिपक पोपळघट,गणेश फुलभाटी,भाऊ नागले,नितीन पोपळघट,अनिस शेख,जयेश अमोलिक,आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते महेबुब ईमाम शेख यांची तर व्हा चेअरमन पदी सौ योगीता यमासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक संपन्न होवुन संक्रेश्वर जनसेवा शेतकरी विकासा अघाडीला अकरा जागा मिळाल्या होत्या तर  विरोधी संक्रेश्वर जनसेवा मंडळाला दोनच जागा मिळाल्या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी आर पी आगरकर यांनी चेअरमन  व व्हा चेअरमन निवडीकरीता बैठक बोलविली होती त्यात चेअरमन पदाकरीता एकमेव महेबुब ईमाम शेख यांचा अर्ज आला त्यांच्या नावाची सूचना बाबासाहेब जगताप यांनी मंडली तर भर्तरीनाथ सालबंदे यांनी त्यास अनुमोदन दिले व्हा चेअरमन पदाकरीता सौ योगीता यमासाहेब चव्हाण यांच्या नावाची सूचना राजु जगताप यांनी मांडली त्यास शशिकांत भोंगळे यांनी अनुमोदन दिले दोन्ही पदाकरीता एकेकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर पी आगरकर यांनी चेअरमन पदी महेबुब शेख तर व्हा चेअरमन पदी सौ योगीता चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव गीताराम काळे प्रकाश नलगे यांनी काम पाहीले या वेळी नुतन चेअरमन महेबुब शेख व्हा चेअरमन सौ योगीता चव्हाण संचालक बाबासाहेब जगताप भर्तरीनाथ सालबंदे त्रींबक जगताप राजेंद्र जगताप सौ. सिताबाई खेमनर ज्ञानदेव होन बाळासाहेब चोखर पत्रकार देविदास देसाई शशिकांत भोंगळे पंढरीनाथ जगताप जालींदर चव्हाण आदि संचालक उपस्थित  होते   निवडीनंतर संक्रेश्वर मंदीरात दर्शन घेवुन चेअरमन व्हा चेअरमन व सर्व संचालकांना रथात बसवुन फटाक्याच्या अतिषबाजीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सोसायटी स्थापनेपासून आजपर्यंत निघालेली ही पहीली अभूतपूर्व मिरवणूक होती अनेक जण गट तट विसरुन या मिरवणूकीत सहभागी झाले होते .या वेळी माजी चेअरमन नबाजी जगताप माजी सरपंच संजय जगताप कल्याणराव जगताप अन्सार शेख कादर शेख मिलींद बोरावके रोहीदास खपके बाळासाहेब हरिश्चंद्रे भास्कर महाराज पागीरे सुभाष दाते चंद्रभान जगताप  रज्जाक शेख पिरन शेख द्वारकनाथ चव्हाण प्रकाश बोरावके राजु बोरावाके प्रभाकर चव्हाण कादर शेख मिलींद बोरावके जावेद सय्यद गोकुळ सालबंदे दादासाहेब जगताप बाजीराव जगताप आनदा बर्डे संभाजी जाधव आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेवटी रामराव होन यांनी आभार मानले राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ जायभाय व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणार आहे म्हणून त्यांचे विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांतर्फे मा.उप विभागीय (प्रांत)अधिकारी श्रीरामपूर यांना  निवेदन देऊन करण्यात अली आहे,

आपला भारत देश हा सार्वभौम असून भारत देशामध्ये हिंदु, मुस्लिम,सिख, ईसाई, बौद्ध,वगैरे असे सर्वच गुण्यागोविंदाने राहतात,भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक नागरिकाला आपआपल्या समाजाचा व धर्माचा प्रचार - प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे,त्यातच गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुंबई येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने मस्जिदीवरील भोंगे वाजल्यास त्यासमोर लाऊड स्पिकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते,त्यांच्या आवाहानाला अनुसरून राज्यामध्ये ठिकठिकाणी जातीय दंगली भडकवण्याचे/होण्याचे प्रकार होत आहे ? त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे,त्यामुळे देशाची व राज्याची सुरक्षा धोक्यात येत आहे म्हणून अशा समाजद्रोही प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यात यावा व राज ठाकरे यांचेवर तसेच त्यांना पाठबळ  देणाऱ्या कार्यकर्त्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करणेत यावा.अशा मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांनी मा.उप विभागीय (प्रांत)अधिकारी  श्रीरामपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,यावेळी त्यांच्यासह आसिफ तांबोळी,संदीप पवार,गणेश पवार,शादाब पठाण,इमरान शेख,मतीन शेख, राजू वेल्डर, अवेज़ शेख,दानिश शाह,अफरोज़ शाह,अरबाज़ शाह,सोहेल शेख, रितेश सोनवणे, मोसिन शेख, लियाकत खान, दानिश बागवान, मोसिन शेख, तनवीर शाह,आदी उपस्थित होते.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यासह शहरात ऐन सण-उत्सवाच्या काळातच तासन्तास वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या विभागातील अधिकार्‍यांनी तर नको ग्राहकांचा डोक्याला ताप म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून बिनधास्त झाले आहेत. इकडे उष्णतेच्या उकाड्यामुळे नागरिक संतप्त झाले असून आता दाद कोणाकडे मागावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.काल सलग दुसर्‍या दिवशी तालुक्यासह शहरातील वीज दुपारपासून गायब होती. रात्री उशिरा कधीतरी वीज आली आणि गायबही झाली हे लोकांना कळलेच नाही. काही नागरिक उकाड्यामुळे इतके हैराण झाले आहेत की, रात्र रात्र जागून काढत आहेत. वीज कधी येणार अशी विचारणा कर्मचार्‍यांकडे केली तर कर्मचारी तर या विभागाचे प्रमुख आहेत असे समजून नागरिकांबरोबर अर्वाच्च भाषा वापरून उडावाउडवीची उत्तरे देत असतात. कधी काहीही न सांगता फोन ठेवून देत कट करत असतात. वरिष्ठ सर्वच अधिकार्‍यांनी तर वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा नाहक त्रास नको म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले आहेत. एकीककडे नागरिकांची झोप उडवायची आणि दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी आरामशीर झोपायचे असा प्रकार सध्या या विभागात सुरू आहे.काल दुसर्‍या दिवशीही वीज अचानक कधीही जाते आणि कधीही येते. यामुळे शहरातील पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजनही कोलमडले आहे. गेली दोन दिवस शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही हे अचानक जाहीर केल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. भर उन्हाळ्याच्या काळात पाणी पाणी अशी परिस्थिती झाली आहे. वीज कशामुळे गेली? का गेली? अशी चौकशी करण्याकरिता फोन केला असता कोणीही धड उत्तर दिले नाही. महावितरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले असून कर्मचारी मनमानी पध्दतीने आपले कामकाज करत आहेत. त्यामुळे या सगळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.लोडशेडींग आहे की नाही याची कल्पना नागरिकांना दिली जात नाही. वीज कधी जाणार कधी येणार याचीही माहिती दिली जात नाही. पूर्वी शहरात व तालुक्यात वीज कधी जाणार कधी येणार याची सविस्तर माहिती मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियावर टाकली जात होती. मात्र माहिती टाकणे तर सोडाच परंतु स्वतःचे मोबाईलही स्वीच ऑफ करून ठेवण्याएवढी मजल अधिकार्‍यांची झाल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.

थकबाकी असताना नागरिकांना दमबाजी करून कायद्याची भाषा वापरुन त्याचा धाक दाखवत वसुली करण्याचा धडाका वितरणने चालविला होता तसा धडाका वीज का जाते आणि ती कधी येणार-कधी जाणार याची माहिती देण्याचा ठेवला असता तर नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले नसते. वीज कट करताना त्यांची भाषा ग्राहकांना अपमान करणारी व वेदना देणारी होती आता अधिकार्‍यांची तोंडे बंद का? असा सवालही यावेळी विचारला जात आहे. काही ठिकाणी 80 टक्के वसुली होऊनही त्या ठिकाणी वीज नियमित देण्याची सेवा का दिली जात नाही? असा सवालही केला जात आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पवित्र रमजान महिना, श्रीरामवमी,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जंयती, महावीर जयंती, गुड फ्राईडे ह.सय्यदबाबा उर्स अशी विविध धर्मियांची विविध धार्मिक उत्सवांमध्ये लागु केलेले अन्यायकारक विजेचे भार नियमन त्वरित रद्द करून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर समाजवादी पार्टीच्या असंख्य कार्याकर्त्यां समवेत त्रस्त नागरीक आंदोलन छेडणार असल्याचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सध्या पवित्र रमजान हा मुस्लिम धर्मियांचा उपवासाचा महिना सुरु आहे,उपवास (रोजा), तरावीह नमाज (प्रार्थना) असून भारनियमनामुळे अत्यावश्यक सेवामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देखील भरल्या जात नाही, त्यामुळे पिण्याच्या पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही,सध्या एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळा जानवू लागला असल्याने पुढे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा हंगाम सुरु होणार आहे,तसेच याच महिन्यात सर्वधर्मियांचे सण /उत्सव  सुरु असून विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाने जाणुन बुजून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे,तो खुपच त्रासदायक असून अन्यायकारक पध्दतीने तब्बल नऊ तासांचे दररोजचे भार नियमन सुरु केलेले आहे,त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे,तसेच विज बिलाची तर आगदी सक्तीने वसुली होत असून विज बिल भरले नाहीतर विज पुरवठा खंडित करण्यात येतो आहे,तरी आपणास या नम्र निवेदनाद्वारे विनंती करणेत येते की, हे जुलुम जबरदस्तीचे विज भारनियमन तातडीने रद्द करून वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करणेत यावा अन्यथा नाईलाजास्तव आपले कार्यालया समोर समाजवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्रस्त नागरीक कोणतीही पुर्व सुचना न देता येत्या दोन चार दिवसातच लोकशाही मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल यापासून उद्भवलेल्या बरे - वाईट परिणाममास संबंधित महावितरण प्रशासनच जबाबदार राहील तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार होऊन विजेचे अन्यायकारक भार नियमन तातडीने रद्द करावे,असा ईशारा समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी महावितरण कंपनीच्या उप व कार्यकारी अभियंत्यांसह तहसिलदार श्रीरामपूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे,

यावेळी आसिफ ताबोळी,संदीप पवार,गणेश पवार,शादाब पठाण, इमरान शेख,मतीन शेख,राजू वेल्डर, अवेज़ शेख,दानिश शाह, अफरोज़ शाह,अरबाज़ शाह, सोहेल शेख,रितेश सोनवणे, मोसिन शेख,लियाकत खान, दानिश बागवान,मोसिन शेख, तनवीर शाह, आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर उक्कलगाव रोडवरील असलेल्या रहेमानीया काँम्प्लेक्स मधील मागील बाजुचे पत्रे पाच दुकाने फोडण्यात आली असुन चोरट्यांनी गल्ल्यातील दहा ते पंधरा हजार रुपये लांबविले  बेलापुरातील काही दिवसापूर्वी झालेल्या दोन चोरींचा तपास लागलेला नसतानाच काल बेलापुर उक्कलगाव रोडवरील नविन झालेल्या पत्र्याच्या गाळ्याचे असलेल्या मागील बाजुचे पत्रे उचकटून चार दुकाने फोडण्यात आलीअसुन या दुकानातील काही रक्कम चोरीस गेलेली आहे या ठिकाणी असलेले जनता ट्रेडर्स हे दुकान

पाठीमागील बाजुकडून फोडण्यात आले त्या दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरलेला असल्यामुळे नेमका किती माल गेला हे समजु शकलेले नाही मात्र या ठिकाणी देणगी करीता ठेवण्यात आलेले बाँक्स फोडून त्यातील पैसे लांबविण्यात आले त्या ठिकाणी गल्यातील पाच हजार रुपयांची चिल्लर चोरट्याने लंपास केली त्या नंतर जे बी फँशन हे कपड्याचे दुकान फोडण्यात आले मात्र दुकानात काहीही नसल्यामुळे चोरट्याने तेथुन काढता पाय घेतला या दुकानात गल्ल्यात २५ हजार रुपये रोख होते तसेच काउंटरला चावी देखील तशीच होती परंतु दुकानात काहीच सामान नसल्यामुळे गाळा बंद

असावा असा गैरसमज झाल्यामुळे गाळामालाक बिनसाद यांचे २५ हजार रुपये वाचले त्यानंतर अश्पाक बागवान यांचे सेतू कार्यालयही फोडण्यात आले त्या शेजारी आसणारी भोसले डेअरीच्या गाळ्याचाही पत्रा मागीला बाजुने उचकटुन दुकानात प्रवेश केला परंतु तेथील काहीच सामान चोरीला गेले नाही त्यानंतर चोरट्याने आपला मोर्चा अरुण गोळे यांच्या अश्विनी मेडीकलकडे वळवीला छतावरील पत्रा कापून चोरट्याने दुकानात प्रवेश केला गल्ल्यात असणारी चिल्लर तसेच चेकबुक काही ठेव पावत्या घेवुन चोरट्याने तेथुन पोबारा केला मेडीकल मधील सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झालेला आहे त्याच शेजारी असणाऱ्या ताईसाहेब द फँमीली लेडीज व मेन्स वेअर हे ही दुकान वरील पत्रा उचकटून फोडण्यात आले तेथील एक ड्रेस व सुटे पैसे नेण्यात आले असुन चोरटे हे दोन जण असावेत असा अंदाज आहे घटनेची माहीती समजताच बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी घटनास्थळी भेट देवुन माहीती घेतली  बेलापुर बाजार समीतीच्या आवारातून संचेती यांच्या तीस गोण्या सोयाबीनची  सुमारे सव्वा लाख रुपयांची चोरी झाली असुन त्यांनी देखील फिर्याद देण्याचे टाळले आहे बाजार समीतीच्या सेल हाँल मधुन यापूर्वीही बऱ्याच वेळा व्यापाऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे बाजार समीतीने या करीता मजबुत असे सेल हाँल बांधुन द्यावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे या बाबत बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला कुणीही चोरी झाल्याचे कळवीले नाही तसेच पोलीसाकडेही तक्रार दाखल झालेली नाही सव्वा लाखाची चोरी होवुन देखील व्यापारी गप्प का ? असा सवाल उपस्थित होतो

पुणे ( प्रतिनिधी) : उज्बेकिस्तान येथे होणाऱ्या १४ व्या यू १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी श्री विरल शहा यांची नियुक्ती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.६ ते १३ जुन २०२२ दरम्यान तस्खेत,उज्बेकिस्तान येथे चौदाव्या यु १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.श्री शहा यांनी यापूर्वी भारतीय महिला संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अनेक वेळा काम पाहिले आहे. तसेच नेपाळ येथे झालेल्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महिला संघाने पटकावलेल्या सुवर्णपदक संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या श्री शाह हे महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्री शहा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की आगामी १४ व्या आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत भारताच्या मुली सर्वोत्तम प्रदर्शन करतील व स्पर्धेचे विजेतेपद निश्चित पटकावतील.आपला संघ सर्व क्षेत्रात मजबूत आहे,असे ते पुढे म्हणाले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतिक जयंत पाटील, राज्यातील सर्व विभागीय सचिव तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget