Latest Post

मुंबई प्रतिनिधी - काळबादेवी येथील एका व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील चौथे आरोपी डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्याप फरार असून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सौरभ त्रिपाठीच्या शोधाकरिता पाच पथके इतर राज्यात पाठवण्यात आली आहेत. मात्र, अद्याप तरी त्रिपाठी यांचा शोध लागलेला नाही. मात्र, त्रिपाठी यांना हवालाद्वारे पैसे पुरवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी अटक केली असून त्यास आज मुंबईला आणणार आहे.आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्याभोवतीचा फास मुंबई पोलिसांनी चांगलाच आवळला आहे. त्यांच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेशात गेली आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एकाला अटक केली असून त्रिपाठींच्या सूचनेनुसार त्याने पोलीस निरीक्षक ओम वांगटेकडून हवालाद्वारे पैसे स्विकारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी दीड लाखांची रोकड जप्त केली आहे. अंगडियाकडून आरोपींनी 19 लाख रुपये उकळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत असल्याने त्रिपाठींच्या अडचणी वाढल्या आहेत.त्रिपाठीच्या शोधासाठी इतर राज्यात 5 पथके रवाना\व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झाल्यापासून डीसीपी सौरभ त्रिपाठी कुठे आहे, हे कुणालाही माहीत नाही. सौरभ त्रिपाठीच्या शोधासाठी 5 पथके तयार करण्यात आली आहेत. क्राईम ब्रांचचे पथक सौरभ त्रिपाठीचा उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये शोध घेत आहे. परंतु, अद्याप डीसीपी सौरभ त्रिपाठीबद्दल काहीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मात्र डीसीपी सौरभ त्रिपाठीला हवालाद्वारे पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. आज या व्यक्तीला मुंबईत आणण्यात येणार असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सौरभ त्रिपाठी यांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव खंडणी प्रकरणात अटकेच्या भीतीने सौरभ त्रिपाठी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (23 मार्च) या अर्जावर सुनावणी होणार आहे. या शिवाय त्रिपाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठीचा अहवाल मुंबई पोलीस आयुक्तालयातून गृहविभागात पाठवण्यात आला आहे.त्रिपाठींवर गुन्हा दाखस\अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसूल प्रकरणात त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील ओम वांगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यवसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.आरोप काय आहेत?सौरभ त्रिपाठींविरोधात मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सौरभ त्रिपाठींवर मुंबईतील अंगडियांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप आहे. अंगडियांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पोलीस उपायुक्त त्रिपाठी यांनी त्यांच्याकडून काम सुरू ठेवण्यासाठी 10 लाख रूपये मागितल्याचा आरोप आहे.

अहमदनगर -19 मार्च 2022 अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर , पोहेकॉ  बबन मखरे , पोहेकॉ  देवेंद्र शेलार , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक सचिन  आडबल , पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे , पोलीस कॉन्स्टेबल मयुर गायकवाड व चोपोहेकॉ  संभाजी कोतकर यांचे स्वतंत्र पथक नेमण जिल्हयातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुक्यामध्ये गुरुवार दि . १७/०३/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०३ ठिकाणी छापे टाकून एकूण १,०४,५०० / रु . किं . चा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ३ आरोपी विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . १ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६०/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ३८,५०० / -रु . किं . ची त्यामध्ये ३५ लि .

तयार दारु व ७०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - कानिफनाथ भिमोजी कळमकर रा . कळमकरवस्ती , नेप्ती , ता . नगर ( फरार ) २ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६ ९ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ४३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ८०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - राजू छबु पवार वय ३० , रा . नेप्ती , ता . नगर ३ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६२ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ४०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - राजेश बाजीराव पवार वय ४२ , रा . नेप्ती , ता . नगर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आग्रवाल, अहमदनगर ,उपविभागीय पोलीस अधीकारी ग्रामीण विभाग अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी  अमंलदार यांनी केलेली आहे

सिन्नर  वार्ताहर-तालुक्यातील पाथरे परिसरातील मातोश्री हॉटेलवर अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या पथकाने छापा टाकत हजारोंचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून केदार यांच्याकडून जिल्ह्यातील अवैध गुटखा, मद्य व अंमली  पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी कारवाईचा धडाका सुरु आहे. त्याअंतर्गत सिन्नरमधील पाथरे शिवारातील हॉटेल मातोश्री येथे अवैध दारुसाठा करुन विक्री होत असल्याची गुप्त माहिती नुकतीच केदार यांना मिळाली होती. त्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांच्या मागदर्शनाखाली आपल्या पथकाला सदर हॉटेलवर नजर ठेवण्यास सांगितले होते.त्यावरुन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी पथकाला खात्री पटल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा मारत 12 हजार 554 रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला. हॉटेल चालक रवींद्र देवमन मोकळ रा. पाथरे हा बेकायदेशीरपणे चोरट्या रीतीने देशी व विदेशी दारुची साठवणूक करून विक्री करतांना आढळल्याने त्याच्यावर वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून साडेबारा हजारांचा अवैद्य साठा जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी कांगणे यांच्या पथकातील पोलीस नाईक रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, वैष्णव यांनी केली.अवैद्य विक्री थाबवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात छोट्या हातगाड्यांसह धाब्यांवर सर्रासपणे अवैध दारुसाठा करुन विक्री सुरु आहे. कुठल्याही प्रकारचा परवाना नसूनही बिंधांस्तपणे अशा ठिकाणी सर्रास मद्याची विक्री होत असल्याने अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

श्रीरामपूर (शहर प्रतिनिधी शेख फकीर महंमद) श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने होत असलेली घरपट्टी नळपट्टी व बाजारपेठेतील दुकानांची जोर जबरदस्तीने होत असलेलि पट्टी वसुली शीथील करणे बाबत आज दिनांक 17/ 3/ 2022 रोजी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरील निवेदन स्वीकारताना पालिकेतील अधिकारी श्री कविटकर यांनी यासंदर्भात वरिष्ठांना कळवितो असे सांगितले सदरील निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली महासचिव शेख फकीर महंमद उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष मोहम्मद हनीफ तांबोळी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख बेलापुर शाखा प्रमुख मुसा भाई सय्यद बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद महिला जिल्हाध्यक्ष सौ समिना रफिक शेख पत्रकार संघ सदस्य सलीम जान मोहम्मद शेख अमीर बेग मिर्झा शेख नजीर गफूरभाई शकील इस्माईल कोथमिरे आदी पत्रकार या वेळी उपस्थित होते

पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आले की महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणूका ओबीसी चा मुद्दा सोडविण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका लांबणीवर टाकल्या असून या सर्व नगरपालिकांवर  प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे सबब सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांकडून जनतेच्या अडीअडचणीं चा विचार न करता कठोरपणे शक्तीची घरपट्टी पाणीपट्टी व दुकानांची पट्टी वसुली करण्यात येत आहे यामुळे सर्व नागरिक हवालदिल झाले आहे विशेष म्हणजे श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार जोरदार पट्टी वसुली करण्यात येत आहे पट्टी वसुली करिता नगरपालिकेचे वसुली पथक प्रत्येक वॉर्डातील घरी घरी जाऊन थकलेल्या पट्टीची मागणी करून दमबाजी करीत आहेत पट्टी थकलेल्या लोकांन पट्टीच्या ऐवज मध्ये त्यांच्या घरातील सामान घरावरील पत्रे जप्त करून नळ  कनेक्शन तोडण्याची धमकी देत आहेत सबब नागरिकांनी नगरपालिकेत चौकशी केल्यास उलट कर्मचारी वर्गाचे गाऱ्हाणे ऐकावे लागतात वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते की या पट्टी वसुली नंतरच या पैशावर आमचे पगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन होणार असल्याने तुम्हीच आमच्यावर उपकार करा व पट्टी भरा असे सांगितले जाते अर्थातच वसुली कर्मचाऱ्यांनी जनतेचे गाऱ्हाणे ऐकण्यास कानावर हात ठेवले आहे यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली असून पालिका प्रशासनाच्या या जोर जबरदस्ती पणाच्या वागणुकीचा निषेध नोंदवित आहे वास्तविक पाहता सन 2019 -20- 21 व 22 मध्ये कोरोना च्या प्रादुर्भावामुळे लोकांना उद्योग धंद्या पासून मुकावे लागले सद्य स्थितीतही बाजारपेठेतील दुकानदार व सर्वसामान्य नागरिकांची अत्यंत दुरवस्था झाली असून अद्याप शहरातील जनता कोरोना च्या संकटातून सावरली नसताना त्यांच्यावर वसुली चा बडगा थोपणे योग्य नसून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालविलेल्या या अत्याचाराचा आम्ही निषेध नोंदवित असून जनते कडून सूट देऊन टप्पे वारीने झेपेल अशा स्वरूपात व भरता येईल अशा स्वरूपात पट्टीची वसुली करावी पट्टी वसुली मध्ये शिथीलता वर्तवावी जेणेकरून नागरिकांना पट्टी भरण्यास सवलत मिळेल व ते आपल्या कुवतीप्रमाणे पट्टी भरण्यास समर्थ होतील सदरील या बाबींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सक्तीची पट्टी वसुली शिथील करावी असे नमूद करण्यात आले असून त्वरित पट्टी वसुली शीथील न केल्यास पत्रकार संघ व नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात येईल असा इशाराही पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.

अहमदनगर प्रतिनिधी-विषारी पदार्थ घेऊन एका पोलीस अंमलदाराने जीवन संपविले. सोमनाथ बापू कांबळे (रा. विळद ता. नगर) असे मयत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी विषारी पदार्थ कोणत्या कारणातून घेतला, याची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी पदार्थ घेतला होता. त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांबळे हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात नेमणुकीस होते. त्यांनी अनेक हरवलेल्या मुले-मुली, महिला-पुरूष यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. त्यांनी कोणत्या कारणातून विष घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदाराने विष घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस दलात पसरल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): आज दि. 17/03/2022 रोजी Dysp संदिप मिटके   श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक) हा हायप्रोफाइल  महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी PI सानप श्रीरामपूर शहर , व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक)व विश्वास रामप्रसाद खाडे वय 26 रा कांदा मार्केट,शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्  यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके ,PI सानप, Api  विठ्ठल पाटील,PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ,  पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार  म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.

बेलापुर (प्रतिनिधी  )- प्रदेश तेली महासंघाच्या अध्यक्षपदी बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांची बिनविरोध निवड करण्यात आली  आहे तेली महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष           भागवतराव लुटे यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाध्यक्ष निवडीबाबत बैठक बोलविण्यात आली होती या वेळी महासंघाचे मार्गदर्शक. विठ्ठलदास लुटे उपस्थित होते बैठकीत  जिल्ह्यातील सामाजिक विषय व संघटनेच्या पुढिल वाटचाली विषयी सकारात्मक चर्चा झाली,तसेच जुनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नुतन  कार्यकारिणी बनविण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ मार्गदर्शक  जयदत्तजी क्षिरसागर व प्रदेशाध्यक्ष श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या संमतीने सर्वाधिकार नागले यांना देण्यात आले.

      या वेळी नुतन जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांना निवडीचे नियुक्ती पत्र श्री. भागवतराव लुटे यांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी मा. श्री. विजयजी काळे,विभागिय अध्यक्ष मा. श्री. अरविंद शेठ {कारभारी}दारुणकर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथशेठ देवकर,  प्रभाकरराव लुटे. राजेंद्रभाऊ म्हस्के,. कैलासजी बनसोडे,. अनिलशेठ जाधव, देविदास कहाणे  दिपक नागले संतोष मेहेत्रे बाळकृष्ण दारुणकर नितीन फल्ले अँड विजय साळूंके रामेश्वर नागले संदीप सोनवणे योगेश शिंदे सागर ढवळे प्रविण नागले शुभम नागले आदि मान्यवर उपस्थित होते शेवटी प्रभाकर लुटे यांनी आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget