Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी )- एकीकडे दिवाळीपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी स्टँड ओस पडलेले असताना दुसरीकडे या एसटी स्टँडवर खाजगी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या गाड्या बिनदिक्कतपणे आत मध्ये उभ्या राहत असून तेथेच प्रवासी सुद्धा भरले जात आहेत. विशेष म्हणजे एस टी डेपो सध्या सुरू आहे . सर्व अधिकारी कामावर हजर आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासमोर या काळया पिवळ्या गाड्यांचे अतिक्रमण बसस्थानकामध्ये झालेले आहे. त्यामुळे एस टी महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने काळया पिवळ्या गाड्यांनी श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याचे चित्र सध्या रोज पाहायला मिळत आहे.

गेले अनेक महिने एस टी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण राज्यात सुरू आहे.श्रीरामपूर डेपो मध्ये काही कर्मचारी हजर झालेले असल्याने नगर,पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी ठिकाणच्या बसगाड्या सुरू आहेत. मात्र बहुतांश वेळ बसस्थानकामध्ये शुकशुकाट असतो. याचाच फायदा घेत काळ्या पिवळ्या गाड्या चालवणाऱ्या चालकांनी बसस्थानकाचा ताबा घेतला आहे. नगर, संगमनेर,नेवासा या मार्गावर श्रीरामपूरातून काळया पिवळ्या गाड्या चालू असल्याने जनतेची बऱ्यापैकी प्रवासाची सोय झालेली आहे हे निर्विवाद. पूर्वी या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून भरल्या जात होत्या. मात्र त्या बंद असल्यामुळे रिकाम्या बसस्थानकाचा सदुपयोग म्हणून कि काय या सर्व काळात या खाजगी गाड्या बसस्थानकामध्ये एका रांगेत उभ्या केल्या जातात आणि तेथूनच भरल्या देखील जातात. त्यामुळे श्रीरामपूरचे बसस्थानक एस टी महामंडळाने काळ्या पिवळ्या गाड्याची वाहतूक करणाऱ्या लोकांना कराराने दिले आहे कि काय ? असा प्रश्न सध्या श्रीरामपूरकरांना पडला आहे.

नजिकच्या काळामध्ये एस टी बसेस सुरू होण्याची शक्यता नाही . त्यामुळे जनतेची गैरसोय दूर होण्यासाठी या काळया पिवळ्या गाड्यांचा निश्चितपणे मोठा हातभार लागला आहे . प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम मोडून या गाड्यांमधून प्रवासी भरले जातात . त्याबद्दल ही नागरिकांची तक्रार नाही . कारण गरजू लोकांना प्रवास करणे क्रमप्राप्त असल्याने ते या गाड्यांमधील सर्व प्रकारच्या गैरसोयी सहन करत आपला प्रवास करीत असतात . नगर लाईनवर चालणारे गाड्यांचे चालक हे किमान सौजन्याने तरी वागतात . मात्र संगमनेर लाईन वर चालणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत . त्यात ही आता या गाड्यांनी राजरोसपणे श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याने व तेथूनच या गाड्यांची वाहतूक होत असल्याने भविष्यामध्ये काळा पिवळ्या गाड्यांसाठी श्रीरामपूरचे बसस्थानक हे माहेर घर बनण्याची शक्यता आहे . एस टी च्या स्थानिक अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या एसटी स्टँड मध्ये लावल्या जातात .ज्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या गाड्या बस स्थानकात लावण्यात येत आहेत त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांनी एस टी महामंडळाच्या जिल्हा नियंत्रक यांच्याकडे केली आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी-शासनाने पंधरा वर्षानंतर सर्व प्रकारची वाहने  बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र त्यामुळे अनेक वाहने बिनधास्तपणे व परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही स्क्रॅप केली जात आहेत. त्यामध्ये कागदपत्रे असणारी व कागदपत्रे नसणारी अशी अनेक वाहने स्क्रॅप केली जात असून त्यामध्ये चोरी केलेल्या वाहनांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या स्क्रप होणाऱ्या वाहनांवर नियंत्रण यावे व त्यासाठी शासनाने स्वतंत्र पथक किंवा पोलीस नियंत्रणासाठी नियुक्त करावेत. व विनापरवाना स्क्राप करणाऱ्या स्क्रॅप धारकांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी आता होत आहे.केंद्र शासनाने 15 वर्षा

नंतर सर्व प्रकारची वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षे झाल्यानंतर अनेक वाहने स्क्रप करण्यात येत आहेत. मात्र या स्क्रॅप होणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यासंदर्भात उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्क्रॅप होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परिवहन विभागातून परवानगी घ्यावी लागते .तरच अशी वाहने स्क्रॅप करता येतात. मात्र श्रीरामपूर शहराप्रमाणेच इतर ठिकाणीही दररोज अनेक वाहने स्क्रॅप केली जात आहेत. मग ती वाहने खरंच पंधरा वर्षे झालेली आहेत की चोरीचे आहेत. याचाही तपास लागत नाही .श्रीरामपूर शहरात तर अनेक तरुणांनी असे व्यवसाय टाकले आहेत व ते गब्बर होत चालले आहेत. मात्र यातून खरंच कायदेशीर हा व्यवसाय होत आहेत का? हा खरा प्रश्न आहे. जर विभागीय परिवहन अधिकाऱ्याची परवानगी नसतानाही वाहने स्क्रॅप केली. तर अशा वाहनधारकांवर, गॅरेज मालकांवर , व स्क्रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. जेणेकरून बेकायदेशीरपणे वाहने स्क्रॅप करणाऱ्या टोळीवर नियंत्रण येईल .अनेक तरुण त्यामुळे विविध ठिकाणाहून वाहनांच्या चोरी करतात व ही वाहने स्क्रॅप केली जातात . श्रीरामपूर शहरांमध्ये दोन रुपये किलोने  वाहने स्क्रॅप करून दिली जातात. त्यामुळे वाहने चोरीला ही आणखी पाठबळ मिळत आहेत. शिवाय अशी वाहने विविध ठिकाणी स्क्रप केली जात असल्यामुळे या स्क्रॅप वाहनांच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडलेल्या सुट्ट्या भागामुळे इतर नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होतो. अनेक जण त्यामुळे जखमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही वाहन स्क्रप होताना विभागीय परिवहन कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची त्यास परवानगी हवी .जर‌ ती नसल्यास किंवा कोणतीही वाहन स्क्रॅप विनापरवाना होत असेल तर अशा वाहन स्क्रॅप करणाऱ्यांवर  त्वरित कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा व शासनाने याकडे अधिकाधिक लक्ष देऊन या विनापरवाना स्क्रॅप होणार्‍या वाहनांवर नियंत्रण यावे म्हणून स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांडुन बोलले जात आहे.



श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-युक्रेन रुस युध्दाच्या नावाखाली अनेक ठिकाणी जिवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी असुन या बाबत व्यापारी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल तसेच गँस वितरक व महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेवुन समस्या सोडविण्यात येतील असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात ग्राहक दिन संपन्न झाला .त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक मंचचे विभागीय अध्यक्ष रणजीत श्रीगोड हे होते प्रास्ताविक भाषणात ग्राहक मंचचे अध्यक्ष प्रा .गोरख बारहाते म्हणाले की अनेक व्यापारी चढ्या भावाने जिवनावश्यक वस्तूंची विक्री करत आहे खाद्य तेलाच्या किमती वाढलेल्या आहे ही बाब गांभिऱ्याने घेणे आवश्यक आहे युध्दाच्या नावाखाली ग्राहकांची लुट केली जात आहे .महावितरण कडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे या करीता महावितरण अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात यावी ,असेही ते म्हणाले अध्यक्षपदावरुन बोलताना रणजीत श्रीगोड म्हणाले की आज आहार

कोणता घ्यावा तेच समजत नाही सर्व जिवनावश्यक वस्तूत भेसळ होत आहे झटपट पैसे मिळविण्याच्या नादात नागरीकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे देश भेसळमूक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे .फसव्या जाहीरातीमुळे अनेकांची फसवणूक होते त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे तसेच बदलत्या काळानुरुप व परिस्थिती नुसार कायद्यातही बदल झाला पाहीजे असेही श्रीगोड म्हणाले या वेळी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष  भागचंद नवगीरे यांनी गँस धारकाकडून जादा रक्कम घेतली जात असल्याची तक्रार केली तसेच ग्राहक दिनात आलेल्या समस्येवर निराकरण करुन ते ईतिवृत्त पुढील ग्राहक दिनात वाचले गेले पाहीजे अशी सूचना नवगीरे यांनी मांडली या वेळी दक्षता समीतीच्या सदस्या सौ आशा परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी अनिता आहेर अमित चंदन रितेश ऐडके कमलकिशोर मुंदडा  संतोष परदेशी धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले शहराध्यक्ष गोपीनाथ शिंदे अव्वल कारकुन चारुशिला मगरे मँडम वंदना नेटके मँडम पुरवठा निरीक्षक पुजारी दक्षता कमीटी सदस्य चंद्रकांत झुरंगे भाऊसाहेब वाघमारे अरुण खंडागळे संतोष परदेशी सुभाष चोरडीया एकनाथ थोरात नाना मोरे योगेश नागले सुदर्शन पवार मुरलीधर वधवाणी राजेंद्र वधवाणी चंद्रकांत गायकवाड सुनिल पारखे अतुल झिरंगे राजेंद्र वाघ सुधीर गवारे सचिन मानधने सुभाष साळूंके नरेंद्र खरात सोमनाथ देवकर रणजीत जामकर मयुर मुखेडकर आनंद परदेशी राहुल लिहीणार आदिसह मान्यवर उपस्थित होते शेवटी देविदास देसाई यांनी आभार मानले तर रज्जाक पठाण यांनी सूत्रसंचलन केले

श्रीरामपूर-चित्रकार भरतकुमार उदावंत व चित्रकार रवी भागवत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रंगलहरी कलादालनाच्या दशकपूर्तीनिमित्त कला रसिकांना विविध १० माध्यमतील सुमारे १०० चित्रांची मेजवानी मिळणार आहे. येथील रंगलहरी कलादालनात (रविवार) दि. १३ मार्च रोजी सायं ४ वाजेपासूनपासून हे चित्रांचे प्रदर्शन सर्वांसाठी पूर्णपणे मोफत खुले केले जाणार आहे.

चित्रकार  उदावंत व भागवत यांनी २०१२ मध्ये रंगलहरी आर्ट ॲकॅडमीची स्थापना करून रंगलहरी कलादालनाची निर्मिती केली. या अंतर्गत गेल्या दहा वर्षांत कला रसिकांची कलाभिरूची वाढविण्यासठी या गुरू-शिष्य जोडीने शेकडो उपक्रम घेतले. यामध्ये नामांकित चित्रकार, शिल्पकार यांना निमंत्रित करून चित्रकलेची प्रात्यक्षिके, चित्रांची तसेच व्यंगचित्रांची प्रदर्शने, समाजातील दुर्बल घटकांसाठी मोफत


हस्तकला प्रात्यक्षिके, मुलांना लहानपणापासूनच कलेची आवड वाढावी यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मोफत चित्रकला तसेच व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके, पर्यावरण पूरक गणेश मुर्तींची प्रात्यक्षिके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनाचे चित्रण घडविणारे रेखा चित्र प्रदर्शन, सुलेखन प्रात्यक्षिके तसेच प्रदर्शन यांचा समावेश आहे. यासोबतच कोरोना काळातील घरात बसून नैराश्येच्या गर्केत गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये केलची रूची वाढावी यासाठी दोन वर्षांमध्ये अनेकदा ऑनलाईन पद्धतीने मोफत चित्रकला शिबिरे घेतली. या शिबिरात अमेरिका, जॉर्जिया, ऑसट्रिया, दुबई, कॅनडा या देशांसह भारतातील सर्वच कानेकोपऱ्यातील विद्यार्थी रंगलहरीशी जोडले गेले. पालकांचा चित्रकलेप्रती दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी अनेक मान्यवरांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित केली. या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. याव्यतिरिक्त सामाजिक भान जपत भागवत व उदावंत यांनी आतापर्यंत अनेक गरजू रूग्णांसाठी रस्त्यावर उतरून कला रसिकांची चित्रे, व्यंगचित्रे त्यांच्यासमोर साकारून २ लाखाहून अधिक रूपयांचा मदत निधी उभारला.

अशी वाटचाल करीत रंगलहीरने दशकपूर्ती केली असून त्यानिमित्ताने आता सर्वांसाठी मोफत चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी कला रसिकांना चित्रकार उदावंत व भागवत यांची साकारलेली व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, कार्टून्स, प्राण्यांची चित्रे, धार्मिक चित्रे, ऐतिहासिक चित्रांसोबतच रंगलहरीच्या निवडक विद्यार्थ्यांची चित्रेही पहावयास मिळतील, रंगलहरी, साई सुपर मार्केट, मेनरोड या ठिकाणी प्रदर्शनाचा जास्तीत मोठ्या संखेने आनंद लुटावा, असे आवाहन चित्रकार भागवत व उदावंत यंनी केले आहे.


बेलापूर (प्रतिनिधी  )-बेलापुर झेंडा चौकात नेहमीच  येथील  नेहमीच गजबजलेल्या झेंडा चौक परिसरात होणारी वाहतूक कोंडी हा नित्याचाच भाग झाला आहे. वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी ग्रामस्थांकडून नेहमीच केली जाते अधिकारी ही मागणी मान्य करतात परंतु त्याची अंमलबजावणी आजपावेतो झालेली नाही. याचाच फटका पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना नुकताच बसला. त्याचे असे झाले की दोन-तीन दिवसांपूर्वी सकाळी साधारण अकरा वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची गाडी बेलापूर हुन पढेगाव कडे जात होती. परंतु झेंडा चौक परिसरात अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती नेमकी या वाहतूक कोंडीत  मिटके यांची गाडी अडकली . ड्रायव्हरने प्रथम हॉर्न वाजवून  अस्ताव्यस्त गाड्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्ढावलेल्या वाहनधारकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. काही वेळ वाट पाहूनही वाहने बाजूला जात नसल्याचे पाहून शेवटी ड्रायव्हरने सायरन वाजविला. सदर गाडी पोलिसांची आहे हे समजताच आधी बेपरवा असलेल्या वाहनधारकांनी तातडीने आपापली वाहने बाजूला घेतली आणि हे अधिकारी मार्गस्थ झाले.बेलापूर येथील बस स्टँड पासून ते जे टी एस हायस्कूल पर्यंत दुतर्फा वाहने लावलेली असतात. या बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. प्रसंगी लहान-मोठे अपघात होऊन बऱ्याचदा वाहनधारकांमधे  बाचाबाची होते. परंतु याकडे ना पोलीस लक्ष देतात ना ग्रामपंचायत प्रशासन.मध्यंतरी अशा अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांची हवा सोडणे, वॉल किल्ल्या काढून घेणे त्यांच्यवर कायदेशीर कारवाई करणे अशी मोहीम बेलापूर पोलिसांनी सुरू केली होती तिचा अपेक्षित परिणामही दिसू लागला होता परंतु अल्पावधीतच ती मोहीमही थंडावली. ग्रामपंचायत प्रशासनाला तर या गोष्टीशी काही देणे-घेणे नाही असे वाटते.भविष्यात काही गंभीर घटना घडण्यापूर्वीच ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून नागरिकांना नेहमी होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून मुक्तता करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-पत्र्याच्या शेजारी असलेल्या शेडजवळ गवत का पेटविले याचा जाब विचारल्याने बडधे कुटुंबात तुफान हाणामारी झाली असुन बेलापुर पोलीसांनी सहा जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . बेलापुर खूर्द येथील बडधे कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून वाद होते त्या वादाचे पर्यावसण आज तुफान हाणामारीत झाले या वेळी लाकडी दांडके गज कुऱ्हाड आदिंचा वापर करण्यात आला .बेलापुर खूर्द येथील बडधे वस्ती येथे राहणारे सुभाष मुरलीधर बडधे यांच्या शेजारी राहणारे अजित मच्छिंद्र बडधे व इतरांनी त्यांच्या पत्र्याच्या शेडलगत गवत व पाचट आणून टाकले व ते पेटविले त्यामुळे सुभाष बडधे यांच्या पत्र्याला आगीच्या झळा पोहोचल्या त्याचा जाब विचारण्यासाठी सुभाष मुरलीधर बडधे ,सुनिल सुभाष बडधे ,पांडूरंग सुभाष बडधे ज्योती सुनिल बडधे हे गेले असता आगोदरच तयारीत असणाऱ्या अजित मच्छिंद्र बडधे शरद मच्छिंद्र बडधे ओमकार मच्छिंद्र बडधे ,भाऊसाहेब कारभारी बडधे सोनाली आजित बडधे तुळसाबाई मच्छिंद्र बडधे

यांनी लाठ्या काठ्या गज व कुऱ्हाडीचा वापर करुन चौघांना गंभीर जखमी केले या चौघावर श्रीरामपुरातील शिरसाठ यांच्या दवाखान्यात उपचार सुरु असुन एकाची प्रकृती गंभीर आहे .बेलापुर पोलीसांनी ज्योती सुनिल बडधे यांच्या फिर्यादीवरुन अजित बडधे ,शरद बडधे ,ओमकार बडधे ,भाऊसाहेब बडधे सोनाली बडधे तुळसाबाई बडधे यांचे विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२२ नुसार  भादवि कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,३०७,५०४,५०६  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट  हे पुढील तपास करत आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-सरकारच्या निर्देशानुसार कोविडचे नियम पाळत श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेसाठी दोनशेच्या टप्प्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय यात्रा नियोजन बैठकीत करण्यात आला. तसेच पारंपरिक व आवश्यक सर्व विधी साजरे करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.मढी देवस्थान समितीच्या महाप्रसाद गृहासमोर यात्रा नियोजन समितीची बैठक प्रभारी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, गटविकास अधिकारी शितल खिंडे, यासह परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, वनविभाग, वीज वितरण, नगरपालिका अशा प्रमुख यंत्रणाचे प्रतिनिधी, देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, सचिव विमल मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, विश्वस्त शामराव मरकड, शिवजीत डोके, भऊसाहेब मरकड, डॉ.विलास मढीकर, माजी सरपंच देवीदास मरकड, बाबासाहेब मरकड, ग्रामस्थ नवनाथ मरकड, डॉ. रमाकांत मडकर, लक्ष्मण मरकड आदी उपस्थित होते.मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत तीन टप्प्यांमध्ये होते. होळी, रंगपंचमी व अमावस्येला भरणारी फुलोर बाग यात्रा असे टप्पे असून रंगपंचमी टप्पा सर्वाधिक मोठा असतो. राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी भाविकांना दर्शन घेऊन लगेच माघारी फिरावे लागेल. रंगपंचमीच्या दिवशी मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला लावून त्यानंतर त्यांची विधिवत पूजा केली जाते. समाधी मंदिरासमोरील गर्दी टाळण्यासाठी अशा भाविकांना मंदिर परिसरात थांबण्यास बंदी असून यात्रेसाठी खास तयार करण्यात आलेल्या पटांगणात जाऊन पारंपरिक विधी करून माघारी फिरावे लागेल.अमावस्येच्या दिवशीची कावड यात्रा व निशान भेट मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत होईल. गेल्या दोन वर्षापासून यात्रा बंद राहून यंदाही कोविडचे निर्बंध पाळून भावीकांना यात्रेस परवानगी मिळाल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यावेळी माहिती देताना आगार प्रमुख महेश कासर म्हणाले, एस टीचा संप मिटला नसला तरी जिल्ह्यातून एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण क्षमतेच्या सुमारे 25 टक्के बसेस आगारातून सुरू झाल्या आहेत. मढी येथून पैठणसाठी जादा गाड्या सुटतील. यात्रेदरम्यान चालणारे अवैध धंदे, दारू विक्री पूर्णपणे बंद करावेत, अशी मागणी अंबादास आरोळे यांनी केली.यावेळी अध्यक्ष मरकड म्हणाले, यात्रेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पूर्णपणे पालन करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या सर्व बाजूंनी सुमारे अडीचशे एकर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी हायमॅक्स, पथदिवे, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. मायंबावरून येणारे भाविकांना थेटपणे पाथर्डी-तिसगाव येथे सहजपणे जाता येईल. देवस्थान समीतीच्यावतीने पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. भाविकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर व भाविकांच्या संख्येसाठी निश्चित केलेली अट काढून दर्शन सोहळा संपेल.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget