चित्रकार उदावंत व भागवत यांनी २०१२ मध्ये रंगलहरी आर्ट ॲकॅडमीची स्थापना करून रंगलहरी कलादालनाची निर्मिती केली. या अंतर्गत गेल्या दहा वर्षांत कला रसिकांची कलाभिरूची वाढविण्यासठी या गुरू-शिष्य जोडीने शेकडो उपक्रम घेतले. यामध्ये नामांकित चित्रकार, शिल्पकार यांना निमंत्रित करून चित्रकलेची प्रात्यक्षिके, चित्रांची तसेच व्यंगचित्रांची प्रदर्शने, समाजातील दुर्बल घटकांसाठी मोफत
हस्तकला प्रात्यक्षिके, मुलांना लहानपणापासूनच कलेची आवड वाढावी यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मोफत चित्रकला तसेच व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके, पर्यावरण पूरक गणेश मुर्तींची प्रात्यक्षिके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनाचे चित्रण घडविणारे रेखा चित्र प्रदर्शन, सुलेखन प्रात्यक्षिके तसेच प्रदर्शन यांचा समावेश आहे. यासोबतच कोरोना काळातील घरात बसून नैराश्येच्या गर्केत गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये केलची रूची वाढावी यासाठी दोन वर्षांमध्ये अनेकदा ऑनलाईन पद्धतीने मोफत चित्रकला शिबिरे घेतली. या शिबिरात अमेरिका, जॉर्जिया, ऑसट्रिया, दुबई, कॅनडा या देशांसह भारतातील सर्वच कानेकोपऱ्यातील विद्यार्थी रंगलहरीशी जोडले गेले. पालकांचा चित्रकलेप्रती दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी अनेक मान्यवरांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित केली. या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. याव्यतिरिक्त सामाजिक भान जपत भागवत व उदावंत यांनी आतापर्यंत अनेक गरजू रूग्णांसाठी रस्त्यावर उतरून कला रसिकांची चित्रे, व्यंगचित्रे त्यांच्यासमोर साकारून २ लाखाहून अधिक रूपयांचा मदत निधी उभारला.
अशी वाटचाल करीत रंगलहीरने दशकपूर्ती केली असून त्यानिमित्ताने आता सर्वांसाठी मोफत चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी कला रसिकांना चित्रकार उदावंत व भागवत यांची साकारलेली व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, कार्टून्स, प्राण्यांची चित्रे, धार्मिक चित्रे, ऐतिहासिक चित्रांसोबतच रंगलहरीच्या निवडक विद्यार्थ्यांची चित्रेही पहावयास मिळतील, रंगलहरी, साई सुपर मार्केट, मेनरोड या ठिकाणी प्रदर्शनाचा जास्तीत मोठ्या संखेने आनंद लुटावा, असे आवाहन चित्रकार भागवत व उदावंत यंनी केले आहे.
Post a Comment