Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देणार्‍यास कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरात राहणार्‍या वंदना अशोक भिंगारदिवे या रविवारी सायंकाळी घरामध्ये स्वयंपाक करत असताना नितीन शेलार त्यांच्या घरात घुसला. तुमचा मुलगा कुठे आहे? असे म्हणत शेलार याने वंदना भिंगारदिवे यांना गावठी कट्टा दाखविला. वंदना यांच्यासह त्यांचा मुलगा अक्षय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची माहिती अक्षय याने 112 नंबरवर फोन करून पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार सतीश भांड, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, राजू शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, संदीप थोरात, राजेंद्र केकान, राजेंद्र फसले यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत नितीन शेलार याला ताब्यात घेतले. वंदना भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पुढील तपास सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी - भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्ताने अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आयोजन करणार असुन त्या अनुषगांने दि.१५ ऑगस्ट-२०२२ रोजी पर्यंतच्या पुढील ५५ आठवडयामध्ये प्रत्येक आठवडयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे पुढील कार्यक्रमाची ५५ आढवड्याचे नियोजन  अ.क्र कार्यक्रम १.) | स्वच्छता अभियान पोलीस स्टेशन स्तरावर व पोलीस वसाहत येथे २.) वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस स्टेशन स्तरावर व पोलीस वसाहत येथे 3). | आरोग्य शिबीर पोलीस स्टेशन स्तरावर व पोलीस वसाहत येथे ४). जनजागृती कोरोना संदर्भान्वये पोलीस स्टेशन स्तरावर कोरोना जगजागृती ५). जनजागृती गुटखा,मावा,तंबाखुजन्य पदार्थ सेवन न करणेबाबत ६).माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविदयालयांना पोलीस अधिकारी व | माध्यमिक विदयालयास अंमलदार यांनी भेट देवुन स्त्री अत्याचार व स्वसरंक्षणार्थ भेटी व जनजागृती माहीती व जगजागृती करणे ७). | सायबर /अर्थिक गुन्हे माध्यमिक व महाविदयालयांना पोलीस अधिकारी व | विषयी जगजागृती | अंमलदार यांनी भेट देवुन सायबर गुन्हे व अर्थिक गुन्हे | विषयी माहीती व जगजागृती करणे ८). | रस्ता सुरक्षा अभियान माध्यमिक व महाविदयालयांना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भेट देवुन रस्ता सुरक्षा अभियान विषयी माहीती व जगजागृती करणे सदरचे कार्यक्रम आयोजन मा.पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर,श्री.मनोज पाटील मा अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर साहेब श्रीरामपुर व श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब श्रीरामपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री.संजय सानप पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


श्रीरामपूर प्रतिनिधी- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. 

आरोपी. क्र.)1)  लक्ष्मण परसराम बिरसने रा टाकळीभान तालुका श्रीरामपूर 

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. शांताबाई गणपत जाधव रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3. आशाबाई शिवाजी पवार रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर

36,700/-  रु. कि.चे 525 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,28,750/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे   टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी  Dysp संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp  संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे, HC सुरेश  औटी, PC नितीन शिरसाठ आदींनी केली.

शिर्डी (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या सहा महिन्यात तीन छापे टाकून चार जणांना रंगेहात पकडले आहे. एवढी मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. मात्र तरीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गांभीर्याने ही गोष्ट अद्यापही घेतली नसल्याचे निदर्शनास येत असून यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने या लाचलुचपत प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरून यांच्यावरही पोलीस महासंचालकांच्या सूचने प्रमाणे कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये हप्ते घेण्याच्या ऑडिओ क्लिप वरून पोलीस निरीक्षक साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. तसेच या संदर्भात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.  वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई केली. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असतानाच मात्र येथिल  श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच घेतली. हे प्रकरण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असताना याकडे वरिष्ठ पोलिसांचे दुर्लक्ष होते की काय? अशी शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक संजय दुधाडे यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला .त्याच प्रमाणे संजय रघुनाथ काळे यांनीही श्रीरामपूरशहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराला मदत करण्यासाठी संजय काळे या पोलिस कर्मचाऱ्याने  11 ऑगस्ट 20 21 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार रुपये लाच स्विकारली त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सुनील उत्तमराव वाघचौरे व गणेश हरी ठोकळ यांनी तक्रारदार यांच्याकडे घराच्या भिंतीवरून चे वाद झाले त्या बदल्यात पोलीस ठाण्यात सहकार्य करण्यासाठी तक्रार दाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच मागितली मात्र दहा हजार रुपये लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 जानेवारीला 20 22 ला रंगेहात पकडले. व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .असे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन छाप्या मध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना विविध प्रकरणी लाच घेताना रंगेहात पकडले आहे . या पोलिसांवर कारवाई झाली. मात्र यासंदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे होते. कारण महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक व  नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनीही प्रत्येक जिल्हा पोलिस अधीक्षकांना आदेश दिले होते की,ज्या पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अधिकारी लाच घेतील त्या  संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी, पोलिस निरीक्षक ही त्यास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल व या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडल्यानंतर तेथील तत्कालीन पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र श्रीरामपूर येथे सहा महिन्यात तीन ट्रेकमध्ये चार पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तेथील पोलिस निरीक्षकांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

राहुरी प्रतिनिधी - आयात निर्यात परवाना असलेल्या टँकरचे सील तोडून मद्यार्क काढण्यात आले. सदरील मद्यार्क हे बनावट मद्य व हातभट्टी गावठी दारूमध्ये मिश्रण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता होती. सदर कारवाईमध्ये दोन वाहनांसह 45 लाख 11 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील सदर पसार गेलेल्या इसमावरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर यांची मद्यार्क तस्करी विरोधात धडक कारवाई रविवार दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परराज्यातील महाराष्ट्राच्या हद्दितून जाणारे टँकर तपासणी करत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मध्य प्रदेश येथून केरळ राज्यात मद्यार्क घेऊन जाणारे टँकर तपासणी करत असताना हॉटेल जम्मू हिमाचल पंजाबी चौधरी धाबाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नगर मनमाड रोड लगत देवळाली प्रवरा शिवार तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी टँकर क्रमांक एमपी. 09 एचएच 7648 या टँकरमधून मद्यार्क टँकरचे झाकण उघडून पाईपच्या साहाय्याने पिकअपमध्ये असलेल्या 35 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये पाइपच्या सहाय्याने काढलेले एकूण 280 लिटर मद्यार्क पिकअपमध्ये आढळून आले.सदर पिकअपचा क्रमांक एमएच 12 एलटी 4047 असा आहे सदर ठिकाणी आरोपी टँकर चालक मालक व पिकअप चालक-मालक इ. अंधाराचा फायदा घेत पसार झाले. सदरील टँकर हा ओअ‍ॅसिस डिस्टिलरी लिमीटेड धार मध्य प्रदेश येथून युनायटेड डिस्टिलरीज केरळ येथे चाललेला होता सदर टँकरमध्ये 30 हजार लिटर अति शुद्ध मद्यार्क इएन असल्याची कागदपत्रावर नोंद असून टँकरचा आयात व निर्यात परवाना आहे परंतु सदर टँकरमधील अतिशुद्ध मद्यार्कची मोजदाद केली असता मद्यार्क टँकरमध्ये तफावत असल्याचे दिसून आले म्हणजेच आयात निर्यात परवाना असलेल्या टँकरचे सील तोडून मद्यार्क काढण्यात आले.सदरील मद्यार्क हे बनावट मद्य व हातभट्टी गावठी दारूमध्ये मिश्रण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता होती. सदर कारवाईमध्ये दोन वाहनांसह 45 लाख 11 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असून सदर पळून गेलेल्या इसमा विरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, उषा वर्मा संचालक अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क, मुंबई प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क पुणे व गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली नितेश शेंडे उपाधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर, संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव, दुय्यम निरीक्षक के. यु. छत्रे, नंदू परते व अजित बडदे सहाय्यक दुय्यम क्षिक सर्वश्री के. के. शेख, आर. बी. कदम व नारायण तुबे, जवान सर्वश्री पी. पी. साळवे, बी. के. नागरे व बी. बी. करंजुले, महिला जवान श्रीमती एस आर फटांगरे, वाहन चालक नि जवान विपुल करपे, सुशांत कासुळे व दीपक बर्डे यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेतला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गोपाल चांदेकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर हे करत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -आपण सर्व देश बांधव आपल्या देशाच्या लोकशाहीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना दुसरीकडे जातीयतेने बुरसटलेली  काही विघ्नसंतोषी मंडळी यात विरजण घालून समाजा समाजात दुफळी निर्माण करण्याचे कुटील कारस्थान करत आहेत. हे देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी अत्यंत घातक आहे म्हणून अशा व्यक्तीवर वेळीच उचित कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याची खंत व्यक्त करत चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूरच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त करत नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या चर्मकार समाजासह इतर बहुजन समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्टविषयी तिव्र शब्दात निषेध नोंदवत त्यांच्यावर उचित कारवाई व्हावी या मागणीसाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.सविस्तर असे की दिनांक २९ जानेवारी २०२२ रोजी नागपूर येथील माजी महापौर संदीप जोशी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजच्या माध्यमातून चर्मकार समाज व खाटीक आणि नाभिक अशा बहुजन समाजाविषयी जातीवाचक तसेच अश्लील शब्दांचा वापर करून फेसबुक पोस्ट टाकल्याने संपूर्ण राज्यभरातून बहूजन समाजात संताप व्यक्त करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला जात आहे.अहमदनगर जिल्ह्यात देखील श्रीरामपूर येथील चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने नागपूर येथील घटनेचा निषेध नोंदवत श्रीरामपूर तहसीलदार आणि श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशनमध्ये नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या आक्षेपार्ह आणि गलिच्छ फेसबुक पोस्ट विषयी तीव्र निषेध नोंदवत उचित कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. माजी महापौर संदीप जोशी यांनी जाणीवपूर्वक समाजा समाजात तेढ निर्माण करून चर्मकार समाजासह इतर बहूजन समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे जोशी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन चर्मकार संघर्ष समितीचे जिल्हा संघटक.दिलीप शेंडे यांच्यासह चर्मकार बंधू-भगिनींद्वारे निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे,तसेच संबंधित समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदन प्रसंगी जिल्हा संघटक दिलीप शेंडे व चर्मकार संघर्ष समितीने दिला आहे, सदर प्रसंगी समितीचे तालुकाध्यक्ष सर्वश्री.संजय लक्ष्‍मण दळवी,शहराध्यक्ष कर्णासाहेब भाऊसाहेब कापसे, महिला शहराध्यक्षा इंदूताई नामदेव नन्नवरे,उपाध्यक्ष संतोषराव भाऊसाहेब देवराये, संघटक रवींद्र सदानंद गाडेकर, खजिनदार राहुल भाऊसाहेब कापसे, उपाध्यक्ष सुभाष गोपीनाथ पोटे,बाळासाहेब बापूराव चव्हाण, सहसचिव, संघटक अशोक रामभाऊ खैरे, सल्लागार नामदेव गंगाराम नन्नवरे, खजिनदार नामदेव बाळूभाऊ कानडे,सतीश विठ्ठल शेंडे, सचिन बबनराव कांबळे, सचिव सौ.भाग्यश्री कर्णासाहेब कापसे, सहसचिव सौ.भारती सचिन कांबळे,संघटक सौ.सुनंदा दिलीप शेंडे, सल्लागार सौ.मोहिनी अशोक खैरे, सल्लागार सौ. सोनल प्रेमचंद वाघमारे.आदींसह चर्मकार संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस त्या स्वबळावर लढेल. मात्र कुणाचा प्रस्ताव आलाच तर आघाडी करूनही निवडणुका लढविल्या जातील, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस आणि प्रवक्ता अविनाश आदिक यांनी दिले.जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल  श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने काँग्रेस भवन मधील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात श्री. आदिक यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी बडाख हे होते.आदिक  म्हणाले, आगामी काळात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्ह्यात  विधान परिषदेची ही निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जळगाव जिल्हा निरीक्षक म्हणून आपली नेमणूक केली आहे. तेथे ११ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र श्रीरामपूर कडे माझे अजिबात दुर्लक्ष होणार नाही. लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी कोरोना च्या मोठ्या संकटाच्या काळातही पालिकेच्या माध्यमातून शहरात खूप मोठी विकास कामे केली आहेत. तुम्ही पहा,जनता त्याची रोज चर्चा करीत आहेत.राष्ट्रवादीला यापुढे नक्कीच खूप चांगले दिवस येणार आहेत,असे सूतोवाच करीत श्रीरामपूर साठी आपण आगामी काळात खूप मोठे काम करणार आहोत. आता मी ते सांगणार नाही. कारण  त्याचे सर्व श्रेय घेतील. काम झाल्यानंतर आपण ते जाहीर करू, भले त्याचे श्रेय नंतर कोणीही घेवो, असे आदिक यांनी सांगितले.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिफारशीनुसार आपली जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे असे आदिक यांनी सांगून खा. सदाशिव लोखंडे, आ. लहू कानडे बाबासाहेब दिघे, आणि आपण  असे चौघेजण या तालुक्यातून जिल्हा नियोजन समितीवर गेले आहेत.  हे श्रीरामपूरचे भाग्य आहे. शहरातील जनता सुज्ञ आहे. गेली पाच वर्षे त्यांनी राष्ट्र वादी ला  खूप मोठे पाठबळ दिले.  आगामी निवडणुकीसंदर्भात नियोजन करण्यासाठी सर्वांचे मत विचारात घेतले जाईल. त्यासाठी ज्येष्ठांनी एकत्र येवून त्याची कच्ची यादी तयार करून ठेवावी.चौकट: गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील जनतेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना आदिक यांनी अनेक आठवणी विशद केल्या. स्व. गोविंद राव आदिक साहेबांना लता जी  राखी बांधण्यासाठी येत असत.चौकट -यावेळी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, अवि दादा यांनी मला निधी आणून दिला आणि मी तो आयता वापरला.  अविदादा यांनी  दिलेल्या निधीबद्दल ऋण व्यक्त केले. अवि दादा होते म्हणूनच मला खूप मोठा निधी मिळाला. शहरातील नागरिकांनीही मला खूप मोठी साथ दिली. ती यापुढेही मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.नगरसेवक राजेंद्र पवार म्हणाले राज्यामध्ये भाजपाची लाट असताना श्रीरामपूर आतील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अनुराधाताई आदिक यांना निवडून दिले त्या निवडीस त्या सार्थ ठरल्या, शहरांत घर तेथे रस्ता ही संकल्पना राबवत त्यांनी शहरातील गल्ली बोळातील रस्ते केले अजूनही जवळपास 100 रस्ते मंजूर करण्यात आले आहेत तसेच शहराची भविष्याची पाण्याची गरज लक्षात घेता सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना ही त्यांनी सरकारकडे पाठवली असून लवकरच तीही मार्गी लागेल असेही पवार म्हणाले.यावेळी तालुक्यातील अनेक विविध सोसायट्या, विविध ग्रामपंचायती मध्ये निवडून आलेल्या शेकडो मान्यवरांचा आदिक बंधू आणि भगिनी यांच्या हस्ते प्रत्येकास  बुके  देत सत्कार करण्यात आला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर आणि तालुक्यातील विविध पदांवर नियुक्ती दिलेल्या मान्यवरांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

दादा, तुमचा हा गौरव पाहून ,तुमच्याकडे संस्काराची लोकशाही आहे. हे तुमच्याकडे पाहून सर्वांनाच जाणवते आमच्याकडील नेत्यांना मात्र सगळीकडचे पाणी मानवले.सुसंस्कृत जनतेची आदिक साहेबांपासूनच तुमच्या परिवाराला साथ आहे.म्हणूनच आम्हाला अरुण पाटील नाईक यांच्या सह तुमच्या सहवासाचा नाद आहे, गोंडेगाव येथील बाबासाहेब कोळसे यांच्या या कवितेस उपस्थितांनी भरभरून दाद देतानाच सर्वत्र हशा पिकला होता.

यावेळी मर्चंट असोसिएशनच्या संचालकपदी पुरुषोत्तम झंवर ,प्रवीण गुलाटी, राहुल कोठारी,स्वरूपचंद खाबिया,निलेश बोरावके हे बहुमताने निवडून आल्याबद्दल  तसेच तुर्कस्तान येथे झालेल्या आशियाई पावर लिफ्टिंग स्पर्धेत प्रा सुभाष देशमुख यांनी कांस्यपदक पटकवल्याबद्दल त्यांचाही आदिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच अशोक कारखाना निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळविल्याबद्दल सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. मातुलठाण सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक कैलास बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक,ऍड. सर्जेराव कापसे, विष्णुपंत खंडागळे, बाबासाहेब कोळसे, ऍड. समीन बागवान आधी काँग्रेसजनांनी केक काँग्रेस भवन वर हजेरी लावत अविनाश आदिक यांचा सत्कार केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारभारी बडाख,यावेळी नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,,जयाताई जगताप ,अर्चनाताई पानसरे,सोनल मुथा,रेवती चौधरी, ऐश्वर्या चौधरी, निशा थोरात, नगरसेवक राजेंद्र पवार , मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे,  ताराचंद रणदिवे,भाऊसाहेब डोळस,रईस जहागीरदार,सुरेश निमसे, सोमनाथ गांगड,विजय शिंदे, चंद्रकांत सगम,नजीर मुलाणी, मल्लू शिंदे, बापूसाहेब सदाफळ,बापूसाहेब पटारे, उत्तम पवार,हर्षल दांगट,शहराम शेटे, रामभाऊ औताडे, भागचंद औताडे, वसंतराव पवार,डॉ. बापूसाहेब आदिक, आदित्य आदिक,अर्जुन आदिक, सुनील थोरात, हंसराज आदिक, निलेश आदिक,कार्लस साठे, राजेंद्र गवारे, किशोर बकाल, जालिंदर लवांडे, भगवानआदिक, विलास बडाख,डॉ. विलास आढाव, भाऊ डाकले, स्वप्निल जाधव, संदीप चोरगे,अमजद पठाण, लक्ष्मण धोत्रे, गोपाल वायं देशकर, राजेंद्र पानसरे, रवी गरेला, तौफिक शेख, शफी शहा,सैफ शेख, शोहेब शेख, भैय्या भिसे,निखिल सानप,योगेश जाधव, समित मुथा,राहुल बोरावके,शाकिर सय्यद, निरंजन भोसले, विलास ठोंबरे, सागर कुऱ्हाडे, शुभम पवार, अथर्व पाटील,  सोहेल सय्यद,  किशोर बडाख, डॉ. अरविंद बडाख, बाळासाहेब बडाख,श्रीकांत दळे, गणेश ठाणगे, सचिन पवार,लक्ष्मण धोत्रे बाळासाहेब बोरुडे,विशाल गोल्हार अक्रम शेख, मुयर खेमनर, आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट जयत चौधरी आणि बाबासाहेब लबडे यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget