नागपूरच्या माजी महापौरांचे चर्मकार,खाटीक आणि नाभिक समाजांविषयी अपशब्द ;चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य),शाखा श्रीरामपूरच्यावतीने तीव्र निषेध.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) -आपण सर्व देश बांधव आपल्या देशाच्या लोकशाहीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना दुसरीकडे जातीयतेने बुरसटलेली काही विघ्नसंतोषी मंडळी यात विरजण घालून समाजा समाजात दुफळी निर्माण करण्याचे कुटील कारस्थान करत आहेत. हे देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी अत्यंत घातक आहे म्हणून अशा व्यक्तीवर वेळीच उचित कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याची खंत व्यक्त करत चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूरच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त करत नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या चर्मकार समाजासह इतर बहुजन समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्टविषयी तिव्र शब्दात निषेध नोंदवत त्यांच्यावर उचित कारवाई व्हावी या मागणीसाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.सविस्तर असे की दिनांक २९ जानेवारी २०२२ रोजी नागपूर येथील माजी महापौर संदीप जोशी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजच्या माध्यमातून चर्मकार समाज व खाटीक आणि नाभिक अशा बहुजन समाजाविषयी जातीवाचक तसेच अश्लील शब्दांचा वापर करून फेसबुक पोस्ट टाकल्याने संपूर्ण राज्यभरातून बहूजन समाजात संताप व्यक्त करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला जात आहे.अहमदनगर जिल्ह्यात देखील श्रीरामपूर येथील चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने नागपूर येथील घटनेचा निषेध नोंदवत श्रीरामपूर तहसीलदार आणि श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशनमध्ये नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या आक्षेपार्ह आणि गलिच्छ फेसबुक पोस्ट विषयी तीव्र निषेध नोंदवत उचित कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. माजी महापौर संदीप जोशी यांनी जाणीवपूर्वक समाजा समाजात तेढ निर्माण करून चर्मकार समाजासह इतर बहूजन समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे जोशी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन चर्मकार संघर्ष समितीचे जिल्हा संघटक.दिलीप शेंडे यांच्यासह चर्मकार बंधू-भगिनींद्वारे निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे,तसेच संबंधित समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदन प्रसंगी जिल्हा संघटक दिलीप शेंडे व चर्मकार संघर्ष समितीने दिला आहे, सदर प्रसंगी समितीचे तालुकाध्यक्ष सर्वश्री.संजय लक्ष्मण दळवी,शहराध्यक्ष कर्णासाहेब भाऊसाहेब कापसे, महिला शहराध्यक्षा इंदूताई नामदेव नन्नवरे,उपाध्यक्ष संतोषराव भाऊसाहेब देवराये, संघटक रवींद्र सदानंद गाडेकर, खजिनदार राहुल भाऊसाहेब कापसे, उपाध्यक्ष सुभाष गोपीनाथ पोटे,बाळासाहेब बापूराव चव्हाण, सहसचिव, संघटक अशोक रामभाऊ खैरे, सल्लागार नामदेव गंगाराम नन्नवरे, खजिनदार नामदेव बाळूभाऊ कानडे,सतीश विठ्ठल शेंडे, सचिन बबनराव कांबळे, सचिव सौ.भाग्यश्री कर्णासाहेब कापसे, सहसचिव सौ.भारती सचिन कांबळे,संघटक सौ.सुनंदा दिलीप शेंडे, सल्लागार सौ.मोहिनी अशोक खैरे, सल्लागार सौ. सोनल प्रेमचंद वाघमारे.आदींसह चर्मकार संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment