राहुरी प्रतिनिधी - आयात निर्यात परवाना असलेल्या टँकरचे सील तोडून मद्यार्क काढण्यात आले. सदरील मद्यार्क हे बनावट मद्य व हातभट्टी गावठी दारूमध्ये मिश्रण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता होती. सदर कारवाईमध्ये दोन वाहनांसह 45 लाख 11 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील सदर पसार गेलेल्या इसमावरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर यांची मद्यार्क तस्करी विरोधात धडक कारवाई रविवार दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परराज्यातील महाराष्ट्राच्या हद्दितून जाणारे टँकर तपासणी करत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मध्य प्रदेश येथून केरळ राज्यात मद्यार्क घेऊन जाणारे टँकर तपासणी करत असताना हॉटेल जम्मू हिमाचल पंजाबी चौधरी धाबाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नगर मनमाड रोड लगत देवळाली प्रवरा शिवार तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी टँकर क्रमांक एमपी. 09 एचएच 7648 या टँकरमधून मद्यार्क टँकरचे झाकण उघडून पाईपच्या साहाय्याने पिकअपमध्ये असलेल्या 35 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये पाइपच्या सहाय्याने काढलेले एकूण 280 लिटर मद्यार्क पिकअपमध्ये आढळून आले.सदर पिकअपचा क्रमांक एमएच 12 एलटी 4047 असा आहे सदर ठिकाणी आरोपी टँकर चालक मालक व पिकअप चालक-मालक इ. अंधाराचा फायदा घेत पसार झाले. सदरील टँकर हा ओअॅसिस डिस्टिलरी लिमीटेड धार मध्य प्रदेश येथून युनायटेड डिस्टिलरीज केरळ येथे चाललेला होता सदर टँकरमध्ये 30 हजार लिटर अति शुद्ध मद्यार्क इएन असल्याची कागदपत्रावर नोंद असून टँकरचा आयात व निर्यात परवाना आहे परंतु सदर टँकरमधील अतिशुद्ध मद्यार्कची मोजदाद केली असता मद्यार्क टँकरमध्ये तफावत असल्याचे दिसून आले म्हणजेच आयात निर्यात परवाना असलेल्या टँकरचे सील तोडून मद्यार्क काढण्यात आले.सदरील मद्यार्क हे बनावट मद्य व हातभट्टी गावठी दारूमध्ये मिश्रण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता होती. सदर कारवाईमध्ये दोन वाहनांसह 45 लाख 11 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असून सदर पळून गेलेल्या इसमा विरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, उषा वर्मा संचालक अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क, मुंबई प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क पुणे व गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली नितेश शेंडे उपाधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर, संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव, दुय्यम निरीक्षक के. यु. छत्रे, नंदू परते व अजित बडदे सहाय्यक दुय्यम क्षिक सर्वश्री के. के. शेख, आर. बी. कदम व नारायण तुबे, जवान सर्वश्री पी. पी. साळवे, बी. के. नागरे व बी. बी. करंजुले, महिला जवान श्रीमती एस आर फटांगरे, वाहन चालक नि जवान विपुल करपे, सुशांत कासुळे व दीपक बर्डे यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेतला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गोपाल चांदेकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर हे करत आहेत.
Post a Comment