शिर्डी (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या सहा महिन्यात तीन छापे टाकून चार जणांना रंगेहात पकडले आहे. एवढी मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. मात्र तरीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गांभीर्याने ही गोष्ट अद्यापही घेतली नसल्याचे निदर्शनास येत असून यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने या लाचलुचपत प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरून यांच्यावरही पोलीस महासंचालकांच्या सूचने प्रमाणे कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये हप्ते घेण्याच्या ऑडिओ क्लिप वरून पोलीस निरीक्षक साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. तसेच या संदर्भात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई केली. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असतानाच मात्र येथिल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच घेतली. हे प्रकरण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असताना याकडे वरिष्ठ पोलिसांचे दुर्लक्ष होते की काय? अशी शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक संजय दुधाडे यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला .त्याच प्रमाणे संजय रघुनाथ काळे यांनीही श्रीरामपूरशहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराला मदत करण्यासाठी संजय काळे या पोलिस कर्मचाऱ्याने 11 ऑगस्ट 20 21 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार रुपये लाच स्विकारली त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सुनील उत्तमराव वाघचौरे व गणेश हरी ठोकळ यांनी तक्रारदार यांच्याकडे घराच्या भिंतीवरून चे वाद झाले त्या बदल्यात पोलीस ठाण्यात सहकार्य करण्यासाठी तक्रार दाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच मागितली मात्र दहा हजार रुपये लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 जानेवारीला 20 22 ला रंगेहात पकडले. व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .असे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन छाप्या मध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना विविध प्रकरणी लाच घेताना रंगेहात पकडले आहे . या पोलिसांवर कारवाई झाली. मात्र यासंदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे होते. कारण महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनीही प्रत्येक जिल्हा पोलिस अधीक्षकांना आदेश दिले होते की,ज्या पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अधिकारी लाच घेतील त्या संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी, पोलिस निरीक्षक ही त्यास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल व या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडल्यानंतर तेथील तत्कालीन पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र श्रीरामपूर येथे सहा महिन्यात तीन ट्रेकमध्ये चार पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तेथील पोलिस निरीक्षकांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Post a Comment