Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-वाढत्या कोविड संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुस्पष्ट आदेश काढले आहेत. या आदेशात अभ्यंगातांना शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी सक्तीची करण्यात आली आहे. तर खासगी आस्थापानामध्ये वर्क फ्रॉमला प्रोत्सहान देत कायालयीन उपस्थिती 50 टक्के ठेवण्यास सांगण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशात शासकीय कार्यालयातील प्रमुखांनी नागरिकांना संवादासाठी ऑनलाईन व्हीसीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, कार्यालय परिसिारात किंवा मुख्यालयात बाहेरून येणार्‍यांसाठी व्हीसीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच आवश्यकतेनूसार कर्मचार्‍यांची उपस्थिती व वेळेमध्ये आवश्यक ते बदल करून शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन द्यावेत. खासगी कार्यालयात मात्र कर्मचारी उपस्थिती 50 टक्के ठेवण्यास सांगण्यात आले आहे.दहावी आणि बारावी वगळता अन्य शाळा 15 फेबु्रवारीपर्यंत बंद राहणार असून अपवादात्मक परिस्थितीमध्ये शाळा सुरू करण्यास मान्यता हवी असल्यास सदर विभाग आणि आस्थापना यांना राज्य आपत्ती विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना अटी आणि शर्ती नूसार परवानगी राहिल. मात्र, प्रेक्षकांना बंदी राहणार असून शॉपिंग मॉल्स, बाजार संकूले, हॉटेल, रेस्टॉरन्टस्, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, हेअर सलून यांना क्षमतेच्या 50 टक्क्यांची अट कायम आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांना सार्वजनिक वाहतूक करता येणार आहे. यासह अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असणार्‍या सेवांची माहिती जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात दिलेली आहे.दहावी-बारावी वगळून अन्य वर्ग ऑनलाईन-जिल्ह्यातील पहिले ते नववी आणि अकारावीचे वर्ग ऑफलाईनासाठी बंदच राहणार आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग काही महत्वाच्या कृतीसाठी भरविण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी काढले आहेत. 15 फेबु्रवारीपर्यंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विना अडथा ऑनलाईन अध्यापन करावे, शिक्षकांनी मात्र शंभर टक्के शाळेत उपस्थित राहावे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


श्रीरामपूर _(प्रतिनिधी राज मोहम्मद रसूल शेख ) महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने रविवार दिनांक 9/1/ 2022 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात दुपारी 4ते 6:30 वाजले च्या सुमारास नवोदित पत्रकारांसाठी पत्रकार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली व पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद यांनी केले होते या वेळी शिक्षक म्हणून पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष आसलम बिनसाद व इतर ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते यावेळी असलम बिनसाद यांनी उपस्थित पत्रकारांना कोणत्याही

विषयावर बातमी लिहिण्याकरिता फाईव्ह डब्ल्यू व वन एच हे सहा मुद्दे लक्षात घेतल्यास बातमी बनविणे अत्यंत सोपे व सोयीचे होते असे समजून सांगितले या बेसिक वर आपण स्तंभ लिखाण, वार्तापत्र, गुन्हेगारी वार्तापत्र, व्यक्तिपरिचय, आत्मचरित्र, निवडणूक वार्ता पत्र किंवा एखाद्या घटनेबद्दल बातमी किंवा लेख तयार करू शकतो यानंतर उपस्थित पत्रकारांना त्यांनी प्रत्येकी एक विषय देऊन बातमी लिहावयास सांगितले सर्वांनी आपापली बातमी तयार केल्यानंतर ती बातमी तपासून वाचन करून दाखविण्यात आलि या बातम्या योग्य

लिहिण्यात आल्या किंवा नाही याबाबत संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी परीक्षक म्हणून बातम्या बरोबर लिहिण्यात आल्या बद्दल होकार दिला व उपस्थित पत्रकारांची पाठ थोपवून त्यांना प्रोत्साहन दिले यावेळी शेख बरकत आली यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले या शिबिरास पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख,  उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, उत्तर महाराष्ट्र प्रभारी कासम शेख, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष सलीम शेख, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार ताकपिरे, पत्रकार संघाचे सदस्य अनिस शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहराध्यक्ष इमरान शेख, पत्रकार संघ सदस्य सार्थक साळुंके, बेलापूर शाखा सचिव शफिक शेख यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते शिबिरात अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद यांनी मानले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गँस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील नमश्री या मुलीचा उपचार सुरु असताना  आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बेलापुर येथील गाढे गल्लीत राहणारे  शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गँस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता त्यात घरातील चौघेही गंभीर भाजले होते त्यांना प्रथम कामगार हाँस्पीटल व नंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते यातील शशिकांत शेलार यांची मुलगी नमश्री वय वर्ष ९

हीचे उपचार सुरु असतानाच आज सकाळी निधन झाले तिच्यावर शेलार स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे शेलार कुटुंबीयातील तिघावर अजुनही प्रवरानगर येथील दवाखान्यात उपचार सुरु असुन या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे तरी आपण या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे असे अवाहन पत्रकार देविदास देसाई यांनी केले असुन आपण मोबाईल नंबर 7020049484 या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे वर  मदत पाठवावी असे अवाहन पत्रकार देविदास देसाई यांनी केले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाँक्टर अशुतोष कडेकर (जोशी ) तर उपाध्यक्ष पदी डाँक्टर संदीप काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .                                             बेलापुर मेडीकल असोसिएशनची बैठक नुकतीच संपन्न झाली. डाँक्टर संपदा काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील वर्षाकरीता नविन कार्यकारीणी निवडण्यात आली. त्यात अध्यक्षपदी डाँक्टर कडेकर तर उपाध्यक्ष पदी डाँक्टर काळे यांची निवड करण्यात आली खजिनदारपदी डाँक्टर विजय सोमाणी यांची निवड करण्यात आली .या वेळी बोलताना मावळते अध्यक्ष डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ म्हणाले की मागील काळ हा अतिशय खडतर होता. रुग्णांची सेवा करताना अनेक डाँक्टरांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. आपली काळजी घेवुन सर्वांनी कोरोना काळात नागरीकांची चांगली  सेवा केली .येणारा काळ देखील कठीण आहे. आपल्याला नविन आलेल्या ओमायक्राँन सारख्या आजाराचा सामना करावयाचा आहे सर्व डाँक्टर मंडळींनी आपली स्वतःची काळजी घेवुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहनही डाँक्टर निर्मळ यांनी केले या प्रसंगी डाँक्टर अशुतोष कडेकर ,डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास डाँक्टर शशिकांत कडेकर ,डाँक्टर श्रीकृष्ण काळे ,डाँक्टर सौ .बडधे डाँक्टर  सौ राशिनकर डाँक्टर सौ भुजबळ ,डाँक्टर सुधीर काळे प्रकाश जोशी दिलीप टाकसाळ संतोष डाकले ऋषी साळूंके गंगाराम पवार अनिल भगत वैशाली भगत मच्छिंद्र गवते शुभम नवले सौ सुविद्या सोमाणी सौ वनमाला गंगवाल उपस्थित  होते शेवटी डाँक्टर भारत भुजबळ यांनी आभार मानले.



श्रीरामपूर : शहरातील बेलापूर रोड परिसरात अशोक थिएटर मागील भाग व मुळा-प्रवराच्या अलिकडचा भाग साडेतीन गल्ली म्हणून अशा उपहासात्मक नावाने चर्चिला जात होता. या भागाला कोणतेही नाव नव्हते. याच भागात जागृत असे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची बजरंगबलीवर श्रद्धा असल्याने या भागाला बजरंगनगर नाव द्यावे, अशी सर्व हनुमान भक्तांची इच्छा होती. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेत परिसरातील नागरिकांनी बजरंगनगर नाव देण्याची मागणी केली. त्याला श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण समेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. ही कामगिरी लोकनियुक्त मा. नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक व समर्थन देणाऱ्या १७ नगरसेवकांनी केली. पालिकेने अधिकृत बजरंगनगर नामकरण मंजूर केल्यानंतर बजरंगनगर भागातील हनुमान भक्तांची मागणी व नागरिकांची इच्छा पूर्ण झाल्याने काल बजरंगनगर नाव फलकाचे कर्तव्यदक्ष ठरलेल्या लोकनियुक्त मा. नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते फित कापून अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र गुलाटी, नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक राजेश अलघ, तसेच माजी नगरसेवक यांच्यासह 'दै. जयबाबा'चे संपादक अ‍ॅड. बाळासाहेब आगे, कार्यकारी संपादक मनोजकुमार आगे हिंद सेवा मंडळाचे संजय जोशी, अल्तमेश पटेल, अ‍ॅड.संदीप चोरमल, अ‍ॅड. सुभाष जंगले, अ‍ॅड. कैलास आगे, बेलापूर रोड मित्रमंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर आगे, प्रशांत देशमुख, प्रशांत भोसले, सागर शेळके, लोकेश बोरा, योगेश बोराडे, पिंटू चव्हाण,मनोज शेळके, शरीफ शेख, रंगनाथ वाव्हळ, किशोर कुन्हे, सुनील परदेशी, संतोष घावटे, अशोक अस्वले, शार्दुल (बच्चन), धनगे, लतिफ शेख आदीसह परिसरातील भाविक नागरिक उपस्थित होते.यावेळी बजरंगनगर दक्षिणमुखी हनुमान रस्ता, पूर्णवादनगर रस्ता लक्ष्मीमाता मंदिर रस्ता अशा फलकांचे अनावरण करण्यात आले. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व उपस्थित नगरसेवकांचा भागातील नागरिकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे योगायोगाने ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र गुलाटी यांचा वाढदिवस होता. त्यांनाही मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. कोविडचे नियम पाळून व गर्दी न करता हा कार्यक्रम करण्यात आला.



मुंबई - कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अनेक निर्बंधासह नवी नियमावली जारी केली आहे. हे सर्व निर्बंध उद्या मध्यरात्रीपासून (10 जानेवारी) लागू असणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.यामध्ये राज्यातील स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आहे. चित्रपटगृह रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच, नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. काय आहेत निर्बंध? मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू मैदाने, उद्याने पर्यटन स्थळ राहणार बंद शाळा कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेने सुरु पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास मुभा हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंतबाबा चौकी जवळ, खंडाळा शिवारातून घरी जात असलेल्या इसमास त्याची मोटारसायकल, रोख रक्कम असा ऐवज घेवून पोबारा करणार्‍या दोघा चोरट्यांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, मोटारसायकल व रोख रक्कम 37 हजार 500 रुपये हस्तगत केले आहेत.कोपरगाव तालुक्यातील दोदेवाडी येथील नानासाहेब लक्ष्मण नेहे व त्यांचे चुलत भाऊ ज्ञानदेव राघुजी नेहे हे दोघे त्यांचे मोटार सायकलवरुन श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंत बाबा चौकी जवळ, खंडाळा शिवारातून घरी जात असतांना त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटार सायकलवरुन तीन इसम आले व त्यांनी त्यांचे मोटार सायकलला गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील दोन मोबाईल, रोख रक्कम व मोटारसायकल जबरीने ओढुन चोरुन नेली. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी तपासाची गती पोलिसांनी वाढविली असता सदरचा गुन्हा श्रीरामपूर मधील विशाल भारत बोरुडे रा. वॉर्ड नं. 3 नॉर्दन बॅच श्रीरामपूर व खंड्या उर्फ विजय राजेंद्र वाकोडे रा. वार्ड नं.3 बाजारतळ श्रीरामपूर यांनी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय सानप स्वतः व डी. बी.पथकाचे पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पंकज गोसावी, राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार 7 जानेवारी 2022 रोजी 17.30 वा. सुमारास बाजारतळ वार्ड नं.3 श्रीरामपूर येथून गुन्ह्यातील चोरीस गेलेला होन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल, दोन मोबाईल व रोख रक्कम 37 हजार 500 रुपये अशा मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करित आहेत.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget