श्रीरामपूर : शहरातील बेलापूर रोड परिसरात अशोक थिएटर मागील भाग व मुळा-प्रवराच्या अलिकडचा भाग साडेतीन गल्ली म्हणून अशा उपहासात्मक नावाने चर्चिला जात होता. या भागाला कोणतेही नाव नव्हते. याच भागात जागृत असे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची बजरंगबलीवर श्रद्धा असल्याने या भागाला बजरंगनगर नाव द्यावे, अशी सर्व हनुमान भक्तांची इच्छा होती. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेत परिसरातील नागरिकांनी बजरंगनगर नाव देण्याची मागणी केली. त्याला श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण समेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. ही कामगिरी लोकनियुक्त मा. नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक व समर्थन देणाऱ्या १७ नगरसेवकांनी केली. पालिकेने अधिकृत बजरंगनगर नामकरण मंजूर केल्यानंतर बजरंगनगर भागातील हनुमान भक्तांची मागणी व नागरिकांची इच्छा पूर्ण झाल्याने काल बजरंगनगर नाव फलकाचे कर्तव्यदक्ष ठरलेल्या लोकनियुक्त मा. नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते फित कापून अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र गुलाटी, नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक राजेश अलघ, तसेच माजी नगरसेवक यांच्यासह 'दै. जयबाबा'चे संपादक अॅड. बाळासाहेब आगे, कार्यकारी संपादक मनोजकुमार आगे हिंद सेवा मंडळाचे संजय जोशी, अल्तमेश पटेल, अॅड.संदीप चोरमल, अॅड. सुभाष जंगले, अॅड. कैलास आगे, बेलापूर रोड मित्रमंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर आगे, प्रशांत देशमुख, प्रशांत भोसले, सागर शेळके, लोकेश बोरा, योगेश बोराडे, पिंटू चव्हाण,मनोज शेळके, शरीफ शेख, रंगनाथ वाव्हळ, किशोर कुन्हे, सुनील परदेशी, संतोष घावटे, अशोक अस्वले, शार्दुल (बच्चन), धनगे, लतिफ शेख आदीसह परिसरातील भाविक नागरिक उपस्थित होते.यावेळी बजरंगनगर दक्षिणमुखी हनुमान रस्ता, पूर्णवादनगर रस्ता लक्ष्मीमाता मंदिर रस्ता अशा फलकांचे अनावरण करण्यात आले. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व उपस्थित नगरसेवकांचा भागातील नागरिकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे योगायोगाने ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र गुलाटी यांचा वाढदिवस होता. त्यांनाही मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. कोविडचे नियम पाळून व गर्दी न करता हा कार्यक्रम करण्यात आला.
Post a Comment