बेलापुर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाँक्टर कडेकर तर उपाध्यक्ष पदी डाँक्टर काळे यांची निवड.
बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाँक्टर अशुतोष कडेकर (जोशी ) तर उपाध्यक्ष पदी डाँक्टर संदीप काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . बेलापुर मेडीकल असोसिएशनची बैठक नुकतीच संपन्न झाली. डाँक्टर संपदा काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील वर्षाकरीता नविन कार्यकारीणी निवडण्यात आली. त्यात अध्यक्षपदी डाँक्टर कडेकर तर उपाध्यक्ष पदी डाँक्टर काळे यांची निवड करण्यात आली खजिनदारपदी डाँक्टर विजय सोमाणी यांची निवड करण्यात आली .या वेळी बोलताना मावळते अध्यक्ष डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ म्हणाले की मागील काळ हा अतिशय खडतर होता. रुग्णांची सेवा करताना अनेक डाँक्टरांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. आपली काळजी घेवुन सर्वांनी कोरोना काळात नागरीकांची चांगली सेवा केली .येणारा काळ देखील कठीण आहे. आपल्याला नविन आलेल्या ओमायक्राँन सारख्या आजाराचा सामना करावयाचा आहे सर्व डाँक्टर मंडळींनी आपली स्वतःची काळजी घेवुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहनही डाँक्टर निर्मळ यांनी केले या प्रसंगी डाँक्टर अशुतोष कडेकर ,डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास डाँक्टर शशिकांत कडेकर ,डाँक्टर श्रीकृष्ण काळे ,डाँक्टर सौ .बडधे डाँक्टर सौ राशिनकर डाँक्टर सौ भुजबळ ,डाँक्टर सुधीर काळे प्रकाश जोशी दिलीप टाकसाळ संतोष डाकले ऋषी साळूंके गंगाराम पवार अनिल भगत वैशाली भगत मच्छिंद्र गवते शुभम नवले सौ सुविद्या सोमाणी सौ वनमाला गंगवाल उपस्थित होते शेवटी डाँक्टर भारत भुजबळ यांनी आभार मानले.
Post a Comment