श्रीरामपूर _(प्रतिनिधी राज मोहम्मद रसूल शेख ) महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने रविवार दिनांक 9/1/ 2022 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात दुपारी 4ते 6:30 वाजले च्या सुमारास नवोदित पत्रकारांसाठी पत्रकार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली व पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद यांनी केले होते या वेळी शिक्षक म्हणून पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष आसलम बिनसाद व इतर ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते यावेळी असलम बिनसाद यांनी उपस्थित पत्रकारांना कोणत्याही
विषयावर बातमी लिहिण्याकरिता फाईव्ह डब्ल्यू व वन एच हे सहा मुद्दे लक्षात घेतल्यास बातमी बनविणे अत्यंत सोपे व सोयीचे होते असे समजून सांगितले या बेसिक वर आपण स्तंभ लिखाण, वार्तापत्र, गुन्हेगारी वार्तापत्र, व्यक्तिपरिचय, आत्मचरित्र, निवडणूक वार्ता पत्र किंवा एखाद्या घटनेबद्दल बातमी किंवा लेख तयार करू शकतो यानंतर उपस्थित पत्रकारांना त्यांनी प्रत्येकी एक विषय देऊन बातमी लिहावयास सांगितले सर्वांनी आपापली बातमी तयार केल्यानंतर ती बातमी तपासून वाचन करून दाखविण्यात आलि या बातम्या योग्य
लिहिण्यात आल्या किंवा नाही याबाबत संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी परीक्षक म्हणून बातम्या बरोबर लिहिण्यात आल्या बद्दल होकार दिला व उपस्थित पत्रकारांची पाठ थोपवून त्यांना प्रोत्साहन दिले यावेळी शेख बरकत आली यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले या शिबिरास पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, उत्तर महाराष्ट्र प्रभारी कासम शेख, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष सलीम शेख, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार ताकपिरे, पत्रकार संघाचे सदस्य अनिस शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहराध्यक्ष इमरान शेख, पत्रकार संघ सदस्य सार्थक साळुंके, बेलापूर शाखा सचिव शफिक शेख यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते शिबिरात अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद यांनी मानले.
Post a Comment