Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- घरात गँसचा अचानक स्फोट झाल्यामुळे चार जण भाजुन गंभीर जखमी झाले असुन त्यांचेवर प्रवरानगर येथील दवाखान्यात उपचार सुरु आहे. या स्फोटाबाबत परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर येथील जाम मस्जिदच्या पाठीमागे असणाऱ्या गाढे गल्लीतील शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता जोरदार स्फोट झाला या आवाजाने परिसर दणाणून गेला या ठिकाणी शशीकांत अशोक शेलार वय वर्ष 43 सौ

ज्योती अशोक शेलार  वय वर्ष 38 यश अशोक शेलार वय वर्ष 16 नमश्री अशोक शेलार वय वर्ष 8 हे चौघे जण कर्डीले यांचे खोलीत भाडेकरु म्हणून रहात होते शशीकांत शेलार याचा औषधाचा व्यवसाय आहे आज सकाळी साडे सहा वाजता सौ ज्योती अशोक शेलार यांनी शेगडी पेटविली असता भयानक स्फोट झाला हा स्फोट ईतका भयानक होता की  त्यांच्या घरावर असलेले पत्र्याचे छत दुर उडाले एक एक पत्रा सुटा होवुन दुर उडाला पत्र्यावर असलेल्या वरांड्या खाली कोसळल्या त्यामुळे नमश्री जखमी झाली तसेच आगीमुळे चौघेही जण होरपळले स्फोटाचा आवाज येताच आजुबाजुचे लोक मदतीला धावले जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात भरती केले त्या नंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट येथे दाखल केले आहे जखमींची प्रकृती स्थिर आहे . घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधिकारी दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप बेलापुर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी घटनास्थळास भेट दिली घटनेचे गांभिर्य

ओळखुन ए टी एस व ए टी सी पथकानेही घटनास्थळी भेट दिली कामगार तलाठी व मंडलाधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली .तसेच दवाखान्यात जावुन जखमींची विचारपुस केली या घटनेबाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू असुन गँस लिक असल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पहात आहेत.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- महाराष्ट्र ही संताची भूमी असुन समाजाच्या भल्यासाठी त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने जिवन व्यतीत केल्यास कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास ह.भ .प. बाळाराम रंधे महाराज यांनी व्यक्त केला             श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.रंधे महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या वेळी भाविकांना मार्गदर्शन करताना ह.भ.प.रंधे महाराज म्हणाले की तुम्ही उद्याची चिंता करु नका चिंता ही मनुष्याला चितेकडे घेवुन जाते आनंदी जिवन जगा भौतिक सुखाच्या मागे धावू नका संताची शिकवाण आचरणात आणा असेही ते म्हणाले किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रारंभी गावातुन संत जगनाडे महाराजाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली बेलापूरच्या ध्वज स्तंभाजवळ मिरवणूक आल्यानंतर अनेक मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले मिरवणूकी नंतर ह भ प बाळाराम रंधे महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले या वेळी अशोक साळूंके  आसाराम जाधव, गोरखनाथ मगर ,सोमनाथ कर्पे जिल्हा उपाध्यक्ष लहानु नागले ,प्रभाकर जाधव भरत साळूंके  ,अँड .विजय साळूंके ,केशवराव जाधव ,रविंद्र कर्पे ,चंद्रकांत शेजुळ ,रविंद्र जगताप, गोकुळ नागले ,सागर ढवळे रामेश्वर नागले जनार्धन शिंदे , गणेश मगर, योगेश शिंदे ,संदीप सोनवणे ,बापु नागले , सुनिल शेजुळ गणेश साळूंके  ,विजु नागले कचरु राऊत ,आदिसह ग्रामस्थ वा महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-नरसाळी येथील पाटील यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला असुन त्यांच्या घरातुन सात तोळे दागीने व रोख रक्कम २५ हजार असा ऐवज चोरुन नेला आहे. नेहे यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास लागत नाही तोच चोरट्यांनी पुन्हा चोरी करुन पोलीसांनाच आव्हान दिले आहे  या बाबतची फिर्याद सौ नमिता पंकज पाटील  धंदा - घरकाम, राहणार नरसाळी बेलापुर खूर्द  यांनी दिली असुन बेलापुर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत त्यांनी पुढे म्हटले आहे की

 माझे पती शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.दररोज रात्री ११/०० वाजता वल्ड पिस मेडीटेशन हेशिबीर हे रात्री ०१/२० वा पावेतो चालते.या  वर्ल्ड पिस मेडीटेशन ऑनलाईन शिबीरामध्ये मी भाग घेते सदरचे काल  रात्री  चे सुमारास आम्ही घरातील सर्वांनी जेवण केले त्यानंतर माझे पती पंकज हे हॉलमध्ये  झोपी गेले तसेच घरामध्ये मुलगा नितीश व मुलगी सर्वज्ञा असे झोपी गेले माझी सासु हे घराचे बाहेरील किचन रुममध्ये झोपी गेल्या नेहमीप्रमाणे वल्ड पिस मेडीटेशन शिबीर असल्याने रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून, घराबाहेरील किचनरुममध्ये शिबीरात जावुन बसले.  शिबीर चालू असताना  मला आमचे घराबाहेर काहीतरी आवाज आल्याने घाबरुन मी किचनरूमचा दरवाजा बंद केला त्यानंतर राजी ०२/५५ पा चे सुमारास मी किचनचा दरवाजा उघडून माझे घरामध्ये गेलो असता मला आमचे घरातील आतील खोलीमधील कपाट उघडे दिसले व त्यामधील सामानाची उचकापाचक झालेली दिसली त्यामुळे मी माझे. पती यांना उठवुन पाहणी केली असता आम्हाला घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली  त्यानंतर आम्ही आमचे घरातील सामानाची खात्री केली असता आमचे खालील वर्णनाचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रकमेची चोरी झाल्याचे आढळले त्याचे वर्णन खालीलप्रमाणे  चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण  एक सोन्याची बांगडी सोन्याचे एक तोळे  वजनाचे कामातील कर्णफुले व २५,०००/- रुपये रोख रक्कम असा जवळपास सात तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे घराचा दरवाजा उघडा पहिल्याने त्याद्वारे  आत प्रवेश करुन चोरुन नेले असल्याची तक्रार देण्यात आली  त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे पाटील यांनी तातडीने पोलीस पाटलाला घटनेची माहीती दिली त्यांनी पोलीसांना फोन करताच पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञाना बोलविण्यात आले होते श्वानाने रस्त्यापर्यत माग दाखविला  बेलापुरातील नेहे यांच्या घरी झालेल्या चोरीचा अजुन काहीच धागादोरा लागलेला नसताना आता चोरट्यांनी पुन्हा दुसरी चोरी केली आहे.



अहमदनगर प्रतिनिधी -माजी नगरसेवक कैलास गिरवले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर काठीने मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन कर्मचार्‍यासह दोघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तत्कालीन पोलीस नाईक रवींद्र आबासाहेब कर्डिले व सध्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक विजय महादेव ठोंबरे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. याबाबत पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैशाली मुळे यांनी फिर्याद दिली आहे. सीआयडी चौकशीनंतर मंगळवारी दुपारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यात कैलास रामभाऊ गिरवले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासकामी 8 एप्रिल 2018 रोजी रात्री 12.30 च्या सुमारास चौकशीसाठी त्यांच्या घरून एलसीबी कार्यालयात आणले होते.तेथे एलसीबीचे साध्या वेशातील कर्मचारी कर्डिले व ठोंबरे यांनी कैलास गिरवले यांना काठीने मारहाण करून दुखापत केल्याची असल्याचे सीसीटिव्ही फुटेज कॅमेरा नं.1 मध्ये तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी कोठडीत असताना गिरवले यांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी गिरवले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दोन कर्मचार्‍यांनी मारहाण केल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे.



कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे  ३ जानेवारी रोजी सोमवार आठवडे बाजार च्या दिवशी भर दिवसा  शिंगणापूर येथे राहणाऱ्या राजु भोसले या तरुणाचा लोखंडी रॉड व दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे

कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात सोमवारच्या बाजारात ७ ते ८ जणांनी रॉड ,गज व दगडाने ठेचून केला खून, केली  असल्याची घटना घडली आहे   हात्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी  घटनास्थळी धाव. घेतली मयत राजा भोसले याला शहरातील संत जनार्धन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलिस करत आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )-शेतीत रासायनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळे शेतीचे व पिकाचे आरोग्य धोक्यात आले असुन मानवाच्या आरोग्याला त्याचे गंभीर परीणाम भोगावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे अवाहन साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांनी केले                                      सेंद्रिय शेती या विषयावर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर म्हणाले की पिकावर कमजोरीमुळे रोग येतो आपण कमजोरी दुर करण्या ऐवजी रोगावरच खर्च करतो झाडाला सशक्त बनविले तर रोगावर खर्च

करण्याची वेळच येणार नाही पैसा कमविण्याचे साधन म्हणून शेती करु नका वैतागुन शेती करु नका जिवो जिवस्य जिवनम्  या तत्वाचा अवलंब करा आपण शेतातील मित्र किडीचे संगोपन न केल्यामुळे शेती धोक्यात आली आहे निसर्गाच्या ऋतुचक्रात होणारा मानवाचा हस्तक्षेप थांबला पाहीजे हायब्रीड पिकाच्या पाठीमागे धावुन आपण जमीन नापीक करत चाललो आहे मातीतील जिवाणू मारुन आपण कस नसलेल्या पिकाचे उत्पादन घेत आहे पिकाच्या आरोग्याची पुरेसी माहीती नसणारे पैसा कमविण्याच्या नादात शेतकऱ्यांना खोटेव चुकीचे सल्ले देत आहे जादा कमीशन देणारी औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे उत्पन्नापेक्षा उत्पादनाचा खर्चच जास्त होत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे रासायनिक खताची वाढणारी उत्पादने अन गावात शहरात वाढणारे आजार या बाबी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळा सेंद्रिय शेतीमुळे पिकाचा खर्चही कमी होणार आहे व आपल्याला सकस आहार मिळणार आहे चला  आनंदाने शेती करा व पुढील पिढीला होणारा आरोग्याचा धोका दुर करा असे अवाहनही राम मुखेकर यांनी केले कार्यक्रमास सर्वश्री सुरेश वारुळे सुनिल गोसावी दिपक बोरुडे ,डाँक्टर सोपान मोरे आनदा बर्डे ,तुषार म्हस्के ,आजिज शेख रविंद्र टिक्कल बापुसाहेब धायबट आंबादास कर्पे दत्तात्रय देठे गोरक्षनाथ सजन सर राजेंद्र कडू हनुमंत सिनारे शिवाजी कातोरे अशोक कदम केशव शेलार किशोर शेंडगे आदिसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले तर विशाल कोकणे यांनी आभार मानले शेखर वाकचौरे यांनी स्वागत केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आण्णासाहेब जाधव महेश वारुळे विकास शिरसाठ देवराम वाबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच महीला मूक्तीदिन बेलापूरात  मोठ्या उत्सहात संपन्न झाला                                संत सावता महाराज मंदिर बेलापुर, मुख्य झेंडा चौक ,  बेलापुर बु!!ग्रामपंचायत तसेच बेलापुर सेवा संस्थेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .या वेळी जि. प. सदस्य शरद नवले ,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुऱ्हे, विलास मेहेत्रे, जालींदर कुऱ्हे, पत्रकार देविदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, दत्ता कुऱ्हे, शिवाजी वाबळे, सेवा संस्थेचे व्हा चेअरमन कलेश सातभाई, रघुनाथ जाधव, बाळासाहेब लगे, मधुकर आनाप, गोरख कुऱ्हे,  संदीप कुऱ्हे,  प्रफुल्ल कुऱ्हे, साईनाथ शिरसाठ, सोमनाथ शिरसाठ ,महेश कुऱ्हे ,प्रभात कुऱ्हे, सोमनाथ लगे ,बाबुलाल पठाण, शफीक आतार, बापु कुऱ्हे,  अल्ताफ शेख, रमेश लगे, बाळासाहेब नगरकर, निखील नगरकर ,प्रिकांत कुऱ्हे, अशोक दुधाळ, बाळासाहेब लगे, प्रफुल्ल खपके, चेतन कुऱ्हे,  जनार्धन ओहोळ ,सुनिल आनाप ,केशव कुऱ्हे, नंदु मेहेत्रे उपस्थित होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget