बेलापुर (प्रतिनिधी )-शेतीत रासायनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळे शेतीचे व पिकाचे आरोग्य धोक्यात आले असुन मानवाच्या आरोग्याला त्याचे गंभीर परीणाम भोगावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे अवाहन साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांनी केले सेंद्रिय शेती या विषयावर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर म्हणाले की पिकावर कमजोरीमुळे रोग येतो आपण कमजोरी दुर करण्या ऐवजी रोगावरच खर्च करतो झाडाला सशक्त बनविले तर रोगावर खर्च
करण्याची वेळच येणार नाही पैसा कमविण्याचे साधन म्हणून शेती करु नका वैतागुन शेती करु नका जिवो जिवस्य जिवनम् या तत्वाचा अवलंब करा आपण शेतातील मित्र किडीचे संगोपन न केल्यामुळे शेती धोक्यात आली आहे निसर्गाच्या ऋतुचक्रात होणारा मानवाचा हस्तक्षेप थांबला पाहीजे हायब्रीड पिकाच्या पाठीमागे धावुन आपण जमीन नापीक करत चाललो आहे मातीतील जिवाणू मारुन आपण कस नसलेल्या पिकाचे उत्पादन घेत आहे पिकाच्या आरोग्याची पुरेसी माहीती नसणारे पैसा कमविण्याच्या नादात शेतकऱ्यांना खोटेव चुकीचे सल्ले देत आहे जादा कमीशन देणारी औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे उत्पन्नापेक्षा उत्पादनाचा खर्चच जास्त होत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे रासायनिक खताची वाढणारी उत्पादने अन गावात शहरात वाढणारे आजार या बाबी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळा सेंद्रिय शेतीमुळे पिकाचा खर्चही कमी होणार आहे व आपल्याला सकस आहार मिळणार आहे चला आनंदाने शेती करा व पुढील पिढीला होणारा आरोग्याचा धोका दुर करा असे अवाहनही राम मुखेकर यांनी केले कार्यक्रमास सर्वश्री सुरेश वारुळे सुनिल गोसावी दिपक बोरुडे ,डाँक्टर सोपान मोरे आनदा बर्डे ,तुषार म्हस्के ,आजिज शेख रविंद्र टिक्कल बापुसाहेब धायबट आंबादास कर्पे दत्तात्रय देठे गोरक्षनाथ सजन सर राजेंद्र कडू हनुमंत सिनारे शिवाजी कातोरे अशोक कदम केशव शेलार किशोर शेंडगे आदिसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले तर विशाल कोकणे यांनी आभार मानले शेखर वाकचौरे यांनी स्वागत केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आण्णासाहेब जाधव महेश वारुळे विकास शिरसाठ देवराम वाबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment