Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गेल्या दोन वर्षात आपण सर्वांनी कोरोना सारख्या भयंकर संकटाचा सामना केला त्यात अनेक नातेवाईक गमावले आहे. आता येणारा काळही भयानक असुन ओमायक्राँन सारख्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे अवाहन अल्फा हाँस्पीटलचे डाँक्टर सागर जाधव यांनी केले  आहे     बेलापुर खटकाळी गावठाण येथील शिलोह चर्चला ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त  तसेच ख्रिस्तवासी पोपटराव भिवाजी आमोलीक यांच्या स्मृती प्रित्यर्थ "माझा परिवार "तसेच अमोलीक परिवाराच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणारांचा कोरोना योध्दा  पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले त्या वेळी आयोजित कार्यक्रमात डाँक्टर जाधव बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  हे होते अध्यक्षीय भाषणात बोलताना बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे म्हणाले की दोन वर्षात कोरोना संकटामुळे आपण अनेकांना गमावुन बसलो सर्व जण घरी बसुन आपली वा आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतानाच डाँक्टर पोलीस पत्रकार पोलीस पाटील महावितरणचे अधिकारी कर्मचारी  आरोग्य अधीकारी कर्मचारी सफाई कर्मचारी आपला जिव धोक्यात घालुन गावाला नागरीकांना सेवा देत होते त्यांच्या आरोग्याची काळजी घेत होते अमोलीक परीवाराने त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना सन्मानित केले त्या बद्दल आमोलीक परिवाराला धन्यवाद दिलेच पाहीजे असेही खंडागळे म्हणाले या वेळी तालुक्यात सर्व प्रथम कोविड सेंटर सुरु करणारे अल्फा हाँस्पिटलचे डाँक्टर सागर जाधव व डाँक्टर सौ राणी जाधव ,बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डाँक्टर देविदास चोखर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड  ,बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके व बेलापुर पोलीस स्टेशनचा स्टाफ ,जेष्ठ पत्रकार देविदास देसाई बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिचारीका श्रीमती वंदना खरात ,बेलापुर  प्राथमिक आरोग्य केंद्राचा रुग्णवाहीका चालक संतोष शेलार ,पोलीस पाटील आशोक प्रधान ,महावितरणचे चेतन जाधव , बेलापुर ग्रामपंचायतीच्या सफाई विभागात काम करणारे सफाई कर्मचारी राजेंद्र भिंगारदिवे ,श्रीमती सुशिलाबाई खरात ,सौ निर्मलाबाई तेलोरे ,पाणी पुरवठा विभागात काम करणारे योगेश आमोलीक ,शिलोह चर्चचे पास्टर शैलेश अमोलीक आदिंना कोरोना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्मृतीचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय अमोलीक पास्टर शैलेश अमोलीक पत्रकार  सुहास शेलार दादासाहेब साठे नितीन खंडीझोड पल्लवी विधाटे ,तृप्ती बनसोडे ,रुपेश अमोलीक डँनियल अमोलीक ,नितीन कसबे ,अर्पणा खंडीझोड ,विश्वास वाघमारे,सचिन अमोलीक , दिनेश विधाटे, प्रकाश अमोलीक ,प्रमोद अमोलीक ,राजू अमोलिक, सचिन कसबे, शिमोन अमोलिक, राजु विधाटे आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पास्टर शैलेश अमोलीक यांनी केले . सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर सुहास शेलार यांनी आभार मानले.


श्रीरामपूर (प्रतिनिधी इम्रान एस शेख )सन 2022 या नूतन वर्षाच्या स्वागतार्थ महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात दिनांक 1/1/2022  रोजी दुपारी चार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थित पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शेख बरकत अली महासचिव शेख फकीर महंमद इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष संदीप पवार उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद आर .शेख उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम शेख श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण श्रीरामपूर शहर सचिव इम्रान आर. शेख, बेलापूर शाखाप्रमुख मुसा सय्यद ,पत्रकार संघ सदस्य रसूल सय्यद, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सामाजिक कार्यकर्ते आमिर बेग मिर्झा, शायर सलीम भोपाली, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष समिना रफिक शेख, श्रीरामपूर शहर महिला सचिव कुमारी अश्विनी अहिरे ,पत्रकार रमेश शिरसाट, आदींनी फलक लावून बलून चा गुच्छ आकाशात सोडून नवीन वर्षाचे आनंद व्यक्त केले यावेळी रुग्ण मित्र व पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी

नागेबाबा मल्टीस्टेट बँकेने तयार केलेले दिनदर्शिका (कॅलेंडरचे )सर्व पत्रकारांना वितरण केले या नंतर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत संस्थापक अध्यक्ष शेख बरकत ,आली, तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद ,उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम शेख ,बेलापूर शाखा सचिव शफीक शेख, श्रीरामपूर शहर महिला सचिव कुमारी अश्विनी आहिरे ,श्रीरामपूर शहर सचिव इमरान आर शेख आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासम शेख यांनी केले तर प्रास्ताविक रियाज खान पठाण यांनी केले आपल्या प्रमुख भाषणात शेख बरकत अली म्हणाले की आज आपण आकाशात बलून सोडून नववर्षाचे स्वागत केले यामागील आपला हेतू असा आहे की आपला पत्रकार संघ या वर्षी गगनभेदी गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वास मला वाटत असून त्यास आपले लक्ष्य बनवून यंदा आपल्या पत्रकार संघाची वाटचाल करण्याचे आपले मानस असल्याचे त्यांनी सांगितले संघात येणाऱ्या नवोदित पत्रकारांनी स्वतःला कदापि कमी लेखू नये पत्रकार संघातील ज्येष्ठ संपादक व ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन घेऊन ते देखील परी पूर्ण होतील यासाठी आपण पत्रकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत असून याच बरोबर आपल्याला या महिन्याच्या शेवटी पत्रकार संघाच्या वतीने गत वर्षाप्रमाणे स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे परंतु कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण टाकण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या शासनाचे अधिनियम व अटी  याचा विचार करून कार्यक्रमाचे स्वरूप ठरवावे लागणार आहे यंदा आपण 14 जानेवारी रोजी जातीय सलोखा दृढ करण्याच्या उद्देशाने मकर संक्रांती निमित्त तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे असे त्यांनी सांगितले यावेळी रुग्ण मित्र व पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड यांनी सांगितले की नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे प्रत्येकाने आपले स्वास्थ्य  जोपासले पाहिजे आपल्या स्वास्था साठी दिवसातून अर्धा ते एक तास व्यायाम किंवा योगा करणे गरजेचे आहे यामुळे आपले शरीर धष्टपुष्ट राहील व्यायाम व योगा करणे करिता नागेबाबा मल्टीस्टेट बँकेच्या वतीने त्याबाबतची माहिती देणारे किट मोबाईल ॲप वर टाकले आहे ते पाहून आपण त्याचे संकलन करू शकतो नवीन वर्ष सर्व नागरिकांना आरोग्य दायी जावो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार असलम बिनसाद यांनी मानले.


श्रीरामपूर प्रतिनिधी -  शासनाच्या कोरोना लसीकरण मोहिमेस गती देण्याच्या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर व अ‍ॅड. आरिफ शेख मित्र मंडळातर्फे प्रभाग क्रं.2 येथे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी 502 लाभार्थ्यांनी लस घेऊन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

      सदर विशेष लसीकरण सत्र हे काही लोकांच्या मनातील लसीविषयीची शंका, गैरसमज तसेच भीती दूर करण्याच्या उद्देशाने तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रांतधिकारी मा. अनिल पवार, तहसीलदार मा.प्रशांत पाटील,शहर काजी मौलाना अकबर अली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड उपस्थित होते. त्याचप्रमाणे कोरोना काळात उत्तम आरोग्य सेवा देणारे डॉ. मुश्ताक निजामी, डॉ. तौफिक शेख, डॉ. अदनान मुसानी, डॉ. नाजीम शेख, डॉ.आजीम शेख तसेच 'एकता' चे  अध्यक्ष तौफिक शेख हे लसीकरण विषयक जनजागृतीसाठी आवर्जून उपस्थित होते.

     या विशेष लसीकरण सत्रात कोव्हीशिल्ड या लसीचे 343 तर कोवॅक्सीन या लसीचे 159 असे एकूण विक्रमी 502 जणांचे लसीकरण करण्यात आले, त्यात प्रामुख्याने सुमारे 200 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला. या प्रसंगी प्रांताधिकारी पवार साहेब यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे वेग वाढविण्याचे आवाहन जनतेस केले. मौलाना अकबर अली यांनी संसर्गजन्य आजाराविरुध्द लढण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती दिली, तसेच पवित्र कुराणातील विविध उपदेशांचे दाखले देत लोकांच्या मनातील लसीविषयक गैरसमज दूर करून त्यांना लस घेण्यासाठी कळकळीची विनंती केली. अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी थोडक्यात लसीकरणाचे महत्व विशद केले. शिबिरात लोकांना लसीचे मोफत सर्टिफिकेट प्रिंट दिल्याबद्दल श्री.शादाब शेख यांचा प्रांतधिकारी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला 

      याप्रसंगी शासनाच्या 'हर घर दस्तक' योजनेअंतर्गत प्रमुख पाहुण्यांनी विविध ठिकाणी गृहभेटी देत स्थानिक नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी पवार साहेब व पाटील साहेब यांनी यावेळी मौलाना आझाद चौकातील विविध व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन त्यांच्या लसीचे प्रमाणपत्र स्वतः तपासले व तेथील ग्राहकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आदेश दिले. यावेळी अ‍ॅड. प्रवीण जमधडे, तसेच प्रियांका यादव या द्वयिंनी प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांचे समुपदेशन करण्याचे महत्वाचे काम पार पाडले.

       सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री.प्रसन्न धुमाळ यांनी केले. प्रास्ताविक डॉ. तौफिक शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन अ‍ॅड.आरिफ शेख यांनी केले. लसीकरणाची जबाबदारी श्रीकांत थोरात, राकेश गायकवाड, जुनेद शेख, डॉ. स्वप्निल पुरनाळे,डॉ. नावेद खान, डॉ. सोहेल शेख, सि. मालती खरात, सि. त्रिभुवन यांनी पार पाडली तर शिबीर यशस्वीतेसाठी अस्लम सय्यद, इरफान शेख, फिरोज पठाण सर, आसिफ सय्यद,निशिकांत पंडीत, रिजवान खान, आफताब पठाण, मोईन मन्सूरी, इसाक शेख, इरफान कुरेशी, आरिफ तांबोळी, दादा मुलानी, साजिद सर, मतीन सर, जमीर सय्यद,फारूक मेमन,तसेच सर्व आशाताई यांनी विशेष परिश्रम घेतले.



श्रीरामपूर प्रतिनिधी - शहरातील शिवाजी रोड हरी कमल प्लाझा येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे कै.ओम प्रकाश गुलाटी हॉल  मध्ये  स्ट्रायकर जिमचे उद्घाटन केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा निमंत्रित तसेच मा. उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांच्या हस्ते पार पडले  त्याप्रसंगी गुलाटी बोलत होते रवींद्र गुलाटी पुढे बोलताना म्हणाले की आजची तरुण युवा पिढी कुसंगती मुळे वेगळ्या मार्गाने जात असून तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण झपाट्याने  वाढलेले दिसून येत आहे  व्यसनांमध्ये  गांजा अफीम  दारू सह इतर औषधी द्रव्य तसेच इंजेक्शनचा वापर करणाऱ्यांची संख्या  मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहणी दरम्यान निर्देशनास येत आहे ऑनलाइन औषधे प्रणाली समाजासाठी घातक ठरत असून  नशा येणाऱ्या औषध द्रवे तसेच दिवसभर गुंगीत राहण्यासाठी सिरिंज द्वारे घेण्यात येणारे इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत असल्याने अश्या नशा करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे पालकांना आपल्या तरुण मुलांना सदर व्यसनापासून दूर करण्यासाठी  व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून मोठा खर्च करून ही कुठलाही उपयोग होत नसून मुले व्यसन केंद्रात जाऊन आल्यानंतरही इंजेक्शन व्यसनाची सवय जात नसल्याने युवक व्यसनाधीन झालेले दिसून येत आहेत  या व्यसनाच्या मार्ग अत्यंत भयंकर असून  नशा येणाऱ्या औषधी द्रव्य व इंजेक्शन्स  व्यसना मुळे भविष्यात  युवकांना शरीराचे अनेक साइड इफेक्ट्स भोगावे लागणारे आहेत  युवकांच्या या व्यसनामुळे बरेच कुटूंबे अडचणीत येऊन उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहिले  आहेत अश्या नशेबाज  व्यसन करणाऱ्या कुसंगती पासून युवकांनी दूर राहण्याचे तसेच व्यायामासाठी जिम जॉईन करण्याचे आवाहन गुलाटी यांनी यावेळी केले. केमिस्ट व  ड़्गीस्ट असोसिएशन ही व्यापारी संस्था समाज सेवेशी  जोडलेली संस्था असून नेहमीच समाजसेवेत अग्रेसर आहे शहरातील युवकांना विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना या जिम च्या माध्यमातून तसेच *नशा विरोधी प्रबोधनातून* चांगला लाभ मिळणार असल्याचे सांगून केमिस्ट असोसिएशनचे हे स्तुत्य समाजसेवेचे उपक्रम असल्याचे केमिस्ट असोसिएशनचे झोनल अध्यक्ष श्री शशांक रासकर यांनी  यावेळी सांगितले.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत केमिस्ट असोसिएशन चे नाशिक झोन अध्यक्ष श्री शशांक रासकर, सुजित राऊत .ओम नारंग, जालिंदर भवर   बाळासाहेब  धीरंगे, राकेश सहानी निलेश परदेशी  स्ट्रायकर जिमचे संचालक व ट्रेनर तेजस शेलार  ओम धनगे, ॲड.अजय धाकतोडे,गणेश ससाणे,अर्जुन तिरमखे आदी उपस्थित होते शेवटी तेजस शेलार यांनी आभार मानले.


अहमदनगर प्रतिनिधी - गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून प्रभारी असलेल्या नगर शहर पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार अनिल कातकडे यांनी स्वीकारला आहे. शहरातील वाढत्या चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळी चोरीच्या घटनांबरोबर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची उकल करण्यात आलेले अपयश त्याचबरोबर पोलीस ठाण्यात वाढती गटबाजी रोखण्याचे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यासमोर आहे.शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी कातकडे यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक ते उपअधीक्षक पदोन्नतीनंतर त्यांची नगर शहरासाठी नियुक्ती झाली आहे. पोलीस ठाण्यातील कामाचा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्याचा उपयोग शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलीस ठाण्यासाठी ते करतील, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर शहरातील चोरीच्या घटना, घरफोड्या, सावेडी उपनगरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.दुसरीकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तसेच शहरातील अवैध बायोडिझेल, कत्तलखाने, जुगार, दारूविक्री, गुटखा विक्री या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानिक पोलीस ठाण्याला आदेश देत किंवा स्वत: पथक स्थापन करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यापुढे आहे. चोर्‍या आणि अवैध धंद्यांबरोबर तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग, अत्याचार अशा गुन्ह्यांत देखील वाढ झाली आहे. यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या दाखल गुन्ह्यांच्या तपासाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यासमोर आहे.


अहमदनगर प्रतिनिधी - करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना हद्दीत कारवाई करण्यात येत आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.ओमिक्रॉन आणि कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक प्रतिबंध लागू केले आहेत. याबाबतची नियमावलीही जाहीर झाली आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही प्रभारी अधिकार्‍यांना आपापल्या हद्दीत या नियमावलीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे तोफखाना पोलिसांची सकाळ-संध्याकाळ कारवाई सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून दंड वसूल केला जात आहे.शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात तोफखाना पोलिसांनी रविवारी सकाळपासून नाकेबंदी करीत विनामास्क वाहनचालकांना अडवून दंड वसूल केला. गेले दोन ते तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवसांत सुमारे 53 हजारांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.



श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत संपली असून नगरपालिकेचे काही माजी पदाधिकारी पदाचा गैरवापर करताना आढळून येत आहे. त्यांचा हस्तक्षेप त्वरीत बंद करावा, या मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रशासकिय अधिकारी अनिल पवार यांना दिले आहे.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेष संदर्भ क्रमांक 1 अन्वये अंतर्भूत केलेल्या 317 (3) कलम मधील तरतुदीनुसार श्रीरामपूर नगरपालिकेची मुदत संपली असल्याने श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार यापूर्वी कार्यरत असलेल्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने माजी पदाधिकार्‍यांना जसे की नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या दालनासमोर नावाच्या पाट्या त्वरित काढून घेण्यात याव्यात.आजही माजी नगराध्यक्षा यांचे स्वीय सहाय्यक व इतर कार्यकर्ते हे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. नगरपालिका कर्मचार्‍यांना धमकावत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कारभारावर गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून सदर व्यक्तींना नगरपालिका आवारात मज्जाव करण्यात यावा. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांचे दालन तसेच समिती हॉल व जनरल मिटींग हॉल बंद करण्यात यावे. अशा आशयाचे विनंती निवेदन प्रशासकिय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छललारे, श्रीनिवासन बिहाणी, दिलीप नागरे,हाजी मुजफ्फर शेख, मनोज लबडे, श्रीमती भारती परदेशी, मिराताई रोटे, आशाताई रासकर यांच्या सह्या आहेत.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget