करण ससाणे यांचे प्रशासकिय अधिकारी अनिल पवार यांना निवेदन, माजी पदाधिकार्‍यांना नगरपालिकेच्या साधनांचा वापरास करावा मज्जाव.

श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत संपली असून नगरपालिकेचे काही माजी पदाधिकारी पदाचा गैरवापर करताना आढळून येत आहे. त्यांचा हस्तक्षेप त्वरीत बंद करावा, या मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रशासकिय अधिकारी अनिल पवार यांना दिले आहे.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेष संदर्भ क्रमांक 1 अन्वये अंतर्भूत केलेल्या 317 (3) कलम मधील तरतुदीनुसार श्रीरामपूर नगरपालिकेची मुदत संपली असल्याने श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार यापूर्वी कार्यरत असलेल्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने माजी पदाधिकार्‍यांना जसे की नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या दालनासमोर नावाच्या पाट्या त्वरित काढून घेण्यात याव्यात.आजही माजी नगराध्यक्षा यांचे स्वीय सहाय्यक व इतर कार्यकर्ते हे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. नगरपालिका कर्मचार्‍यांना धमकावत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कारभारावर गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून सदर व्यक्तींना नगरपालिका आवारात मज्जाव करण्यात यावा. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांचे दालन तसेच समिती हॉल व जनरल मिटींग हॉल बंद करण्यात यावे. अशा आशयाचे विनंती निवेदन प्रशासकिय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छललारे, श्रीनिवासन बिहाणी, दिलीप नागरे,हाजी मुजफ्फर शेख, मनोज लबडे, श्रीमती भारती परदेशी, मिराताई रोटे, आशाताई रासकर यांच्या सह्या आहेत.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget