श्रीरामपूर (प्रतिनिधी इम्रान एस शेख )सन 2022 या नूतन वर्षाच्या स्वागतार्थ महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात दिनांक 1/1/2022 रोजी दुपारी चार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थित पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शेख बरकत अली महासचिव शेख फकीर महंमद इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष संदीप पवार उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद आर .शेख उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम शेख श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण श्रीरामपूर शहर सचिव इम्रान आर. शेख, बेलापूर शाखाप्रमुख मुसा सय्यद ,पत्रकार संघ सदस्य रसूल सय्यद, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सामाजिक कार्यकर्ते आमिर बेग मिर्झा, शायर सलीम भोपाली, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष समिना रफिक शेख, श्रीरामपूर शहर महिला सचिव कुमारी अश्विनी अहिरे ,पत्रकार रमेश शिरसाट, आदींनी फलक लावून बलून चा गुच्छ आकाशात सोडून नवीन वर्षाचे आनंद व्यक्त केले यावेळी रुग्ण मित्र व पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी
नागेबाबा मल्टीस्टेट बँकेने तयार केलेले दिनदर्शिका (कॅलेंडरचे )सर्व पत्रकारांना वितरण केले या नंतर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत संस्थापक अध्यक्ष शेख बरकत ,आली, तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद ,उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम शेख ,बेलापूर शाखा सचिव शफीक शेख, श्रीरामपूर शहर महिला सचिव कुमारी अश्विनी आहिरे ,श्रीरामपूर शहर सचिव इमरान आर शेख आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासम शेख यांनी केले तर प्रास्ताविक रियाज खान पठाण यांनी केले आपल्या प्रमुख भाषणात शेख बरकत अली म्हणाले की आज आपण आकाशात बलून सोडून नववर्षाचे स्वागत केले यामागील आपला हेतू असा आहे की आपला पत्रकार संघ या वर्षी गगनभेदी गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटत असून त्यास आपले लक्ष्य बनवून यंदा आपल्या पत्रकार संघाची वाटचाल करण्याचे आपले मानस असल्याचे त्यांनी सांगितले संघात येणाऱ्या नवोदित पत्रकारांनी स्वतःला कदापि कमी लेखू नये पत्रकार संघातील ज्येष्ठ संपादक व ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन घेऊन ते देखील परी पूर्ण होतील यासाठी आपण पत्रकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत असून याच बरोबर आपल्याला या महिन्याच्या शेवटी पत्रकार संघाच्या वतीने गत वर्षाप्रमाणे स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे परंतु कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण टाकण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या शासनाचे अधिनियम व अटी याचा विचार करून कार्यक्रमाचे स्वरूप ठरवावे लागणार आहे यंदा आपण 14 जानेवारी रोजी जातीय सलोखा दृढ करण्याच्या उद्देशाने मकर संक्रांती निमित्त तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे असे त्यांनी सांगितले यावेळी रुग्ण मित्र व पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड यांनी सांगितले की नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे प्रत्येकाने आपले स्वास्थ्य जोपासले पाहिजे आपल्या स्वास्था साठी दिवसातून अर्धा ते एक तास व्यायाम किंवा योगा करणे गरजेचे आहे यामुळे आपले शरीर धष्टपुष्ट राहील व्यायाम व योगा करणे करिता नागेबाबा मल्टीस्टेट बँकेच्या वतीने त्याबाबतची माहिती देणारे किट मोबाईल ॲप वर टाकले आहे ते पाहून आपण त्याचे संकलन करू शकतो नवीन वर्ष सर्व नागरिकांना आरोग्य दायी जावो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार असलम बिनसाद यांनी मानले.
Post a Comment