सदर विशेष लसीकरण सत्र हे काही लोकांच्या मनातील लसीविषयीची शंका, गैरसमज तसेच भीती दूर करण्याच्या उद्देशाने तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रांतधिकारी मा. अनिल पवार, तहसीलदार मा.प्रशांत पाटील,शहर काजी मौलाना अकबर अली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड उपस्थित होते. त्याचप्रमाणे कोरोना काळात उत्तम आरोग्य सेवा देणारे डॉ. मुश्ताक निजामी, डॉ. तौफिक शेख, डॉ. अदनान मुसानी, डॉ. नाजीम शेख, डॉ.आजीम शेख तसेच 'एकता' चे अध्यक्ष तौफिक शेख हे लसीकरण विषयक जनजागृतीसाठी आवर्जून उपस्थित होते.
या विशेष लसीकरण सत्रात कोव्हीशिल्ड या लसीचे 343 तर कोवॅक्सीन या लसीचे 159 असे एकूण विक्रमी 502 जणांचे लसीकरण करण्यात आले, त्यात प्रामुख्याने सुमारे 200 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला. या प्रसंगी प्रांताधिकारी पवार साहेब यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे वेग वाढविण्याचे आवाहन जनतेस केले. मौलाना अकबर अली यांनी संसर्गजन्य आजाराविरुध्द लढण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती दिली, तसेच पवित्र कुराणातील विविध उपदेशांचे दाखले देत लोकांच्या मनातील लसीविषयक गैरसमज दूर करून त्यांना लस घेण्यासाठी कळकळीची विनंती केली. अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी थोडक्यात लसीकरणाचे महत्व विशद केले. शिबिरात लोकांना लसीचे मोफत सर्टिफिकेट प्रिंट दिल्याबद्दल श्री.शादाब शेख यांचा प्रांतधिकारी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला
याप्रसंगी शासनाच्या 'हर घर दस्तक' योजनेअंतर्गत प्रमुख पाहुण्यांनी विविध ठिकाणी गृहभेटी देत स्थानिक नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी पवार साहेब व पाटील साहेब यांनी यावेळी मौलाना आझाद चौकातील विविध व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन त्यांच्या लसीचे प्रमाणपत्र स्वतः तपासले व तेथील ग्राहकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आदेश दिले. यावेळी अॅड. प्रवीण जमधडे, तसेच प्रियांका यादव या द्वयिंनी प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांचे समुपदेशन करण्याचे महत्वाचे काम पार पाडले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसन्न धुमाळ यांनी केले. प्रास्ताविक डॉ. तौफिक शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड.आरिफ शेख यांनी केले. लसीकरणाची जबाबदारी श्रीकांत थोरात, राकेश गायकवाड, जुनेद शेख, डॉ. स्वप्निल पुरनाळे,डॉ. नावेद खान, डॉ. सोहेल शेख, सि. मालती खरात, सि. त्रिभुवन यांनी पार पाडली तर शिबीर यशस्वीतेसाठी अस्लम सय्यद, इरफान शेख, फिरोज पठाण सर, आसिफ सय्यद,निशिकांत पंडीत, रिजवान खान, आफताब पठाण, मोईन मन्सूरी, इसाक शेख, इरफान कुरेशी, आरिफ तांबोळी, दादा मुलानी, साजिद सर, मतीन सर, जमीर सय्यद,फारूक मेमन,तसेच सर्व आशाताई यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment