Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या भागांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या भागातील कॉलन्यांमध्ये बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे पेट्रोल चोरून नेण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या महिनाभरात शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्ही सध्या तपास करा, शोधा, मग आमच्याकडे या, अशी उत्तरे दिली जातात. वॉर्ड नंबर 2 मध्ये तर एका महिलेने आपल्या घरासमोरून चोरीला गेलेली गाडी स्वतः शोधून काढली आणि श्रेय मात्र पोलिसांनी घेतले अशीही चर्चा आहे.माजी आ. स्व. जयंत ससाणे यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक सुभाष तोरणे यांची दुचाकी अशीच चोरीला गेली. तिचा अद्याप तपास लागलेला नाही. पत्रकार अनिल पांडे यांच्या दुचाकी चोरीचाही तपास लागला नाही. वॉर्ड नंबर 7 मध्ये एका घरासमोरून गेलेली दुचाकी सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असताना चोरटे अद्याप सापडलेले नाहीत.

दुसरीकडे मिल्लतनगरमध्ये असलम बिनसाद तसेच गुलाबभाई शेख यांच्या घरासमोरील गाड्यांमधून पेट्रोल चोरीला गेले आहे. फातेमा कॉलनी, मिल्लतनगर, संजयनगर परिसरातील अनेक घरांसमोरून गाड्यांतून पेट्रोल चोरून नेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पेट्रोल चोरी करणारी मोठी टोळी श्रीरामपूरमध्ये कार्यरत असून त्याच्या जोडीला वॉर्ड नंबर दोन मधील धनगर वस्ती परिसरातील अनेक लोक पेट्रोल चोर्‍या करतात. पोलिसांनाही ते माहिती आहे. परंतु तडजोडीतून याकडे दुर्लक्ष केले जाते. यापूर्वी मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. आता पेट्रोल चोरीच्या घटना वाढत आहेत.सर्वसामान्य माणसे आपली वाहने घराबाहेर लावतात. परंतु चोरटे त्यावर डल्ला मारतात. वरून पोलीस तपास होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहराच्या सर्वच भागात पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी. चोरट्यांशी संबंध असलेल्या पोलिसांच्या तातडीने बदल्या कराव्यात. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी श्रीरामपुरात येऊन शांतता कमिटी तसेच प्रत्येक भागातील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन हे प्रश्न समजून घ्यावेत, अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत, त्यांची धर्मपत्नी मधुलिका रावत व इतर अकरा लष्करी जवानांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. बेलापुरातही ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


येथील विजयस्तंभाजवळ सीडीएस जनरल बिपिन रावत यांचेसह सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी " अमर रहे! अमर रहे! बिपिन रावत अमर रहे! " अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जि प सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई आदिंनी श्रद्धांजलीपर शब्दसुमन वाहिले. 


यावेळी माजी पोलीस पाटील शिवाजी वाबळे, पोलिस नाईक गणेश भिंगारदे, पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, शकील शेख, गणेश आढाव, बेलापूर सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक, श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष कुऱ्हे, भास्कर बंगाळ, गणेश बंगाळ,शफीक आतार बाबा शेख बापू कुऱ्हे बाळासाहेब लगे नामदेव दुधाळ डाँक्टर रविंद्र गंगवाल अन्वर सय्यद, शफिक शेख, रावसाहेब अमोलिक, मच्छिंद्र खोसे, बाळासाहेब निकम, मोहन सोमाणी, संजय गोरे, महेश ओहोळ आदी उपस्थित होते.


भारतीय लष्कराचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ बिपिन रावत यांचे त्यांच्या पत्नी सह 13 जणांचे तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले असून भारतीय सेनेचा रत्न हरपला असल्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी व्यक्त केल्या दिनांक दहा-बारा 2021 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात बिपिन रावत यांची श्रद्धांजलीपर शोकसभा घेण्यात आली यावेळी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना बरकत त अली शेख पुढे म्हणाले की गोरखा ब्रिगेडचे सी ओ ए एस बनणारे बिपिन रावत हे चौथे  अधिकारी बनवण्यापूर्वी लष्कर प्रमुख झाले ईशान्येतील दहशतवाद कमी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता म्यानमार मधील 2015 सालातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यात आले त्यात त्यांची प्रमुख भूमिका होती 2016 मधील सर्जिकल स्ट्राइक मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावली त्यांच्या विविध उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, अशी पदके देऊन गौरविण्यात आले होते त्यांच्या निधनाने भारतीय सेनेत व देशभरात दुखवटा पसरला आहे परमेश्वर त्यांच्या थोर आत्म्यास शांती देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली शेख यांनी अर्पण केली सामूहिक राष्ट्रगीताच्या स्वरात बिपिन रावत यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, सामाजिक कार्यकर्ते सरंवर अली सय्यद, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शोक सभेच्या कार्यक्रमास पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, सामाजिक कार्यकर्ते सरवर अली सय्यद, शहर काँग्रेस सरचिटणीस नजीर भाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बुऱ्हाण भाई जमादार, सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा,  पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बीके सौदागर, अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इमरान शेख, पत्रकार संघ सदस्य सार्थक साळुंके, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष सौ समीना रफिक शेख, कुमारी माहीम शेख, आदि पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते.


बेलापूर (प्रतिनिधी)- येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 'एड्स समज व गैरसमज' या विषयावर श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मीकांत करपे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी एड्स या आजाराबाबत असलेली सद्यस्थिती, व मार्गदर्शन करतांना, एड्सबाबतची भीती बचाव याचे सविस्तर विवेचन आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या. यावेळी महाराष्ट्र पोलिस सेवेत प्रविष्ट झालेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आरती खर्डे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. रुपाली उंडे, श्रीरामपूर तालुका जिल्हा रुग्णालयातील तंत्रज्ञ पुरुषोत्तम शिंदे ,

प्रा. डॉ. संजय नवाळे, प्रा. अशोक थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक माने यांनी केले. तर  प्रा.रुपाली उंडे यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील अनाथ मुलांची जबाबदारी बेलापुर ग्रामस्थांची असुन या आश्रमातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जि प सदस्य शरद नवले यांनी दिली              महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांनी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मिळालेला बोनस गरीबांना मदत म्हणून  देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांना मिळालेल्या बोनसचे चार हजार रुपये तसेच तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी दिलेला मदतीनिधी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्या वेळी बोलताना जि प सदस्य शरद  नवले म्हणाले की या ठिकाणी आश्रमास पत्र्याचे शेड बांधुन देण्याची मागणी असुन त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत तसेच येथील मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु या आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांचे वय अवघे १९ वर्ष असतानाही ते १४ अनाथ मुलाचा सांभाळ करत आहे ते स्वतः अनाथ असुनही अनाथाचा ते नाथ बनले आहे असेही ते म्हणाले या वेळी कृष्णानंद महाराज व सचिव ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की या आश्रमात चौदा अनाथ मुले राहत असुन त्याचा दैनंदिन व शिक्षणाचा खर्च मोठा आहे या ठिकाणी मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेच्या टाकीची गरज आहे  त्या करीता दानशुरांनी या आश्रमास मदत करावी असे अवाहन कृष्णानंद महाराजांनी केले आहे या वेळी पत्रकार देविदास देसाई तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास चेतन जाधव  पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम प्रकाश मेहेत्रे  उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रत्येक ठिकाणी शासकीय योजनेसाठी आवश्यक असणारा पुरावा म्हणजे शिधापत्रिका ,रेशनकार्ड परंतु आता यापुढे नविन रेशनकार्ड तयार करावयाचे असल्यास जातीचा दाखला दिल्याशिवाय रेशनकार्डच मिळणार नाही त्यामुळे रेशनकार्ड मिळविण्यासाठी आगोदर जातीचा दाखला तयार ठेवावा लागणार आहे                 सर्वसामान्य नागरीकासाठी रेशनकार्ड म्हणजेच शिधापत्रिका ही जिवनाचा अविभाज्य घटक झालेले आहे कुठल्याही शासकीय निमशासकीय काम करावयाचे असल्यास रेशनकार्ड सक्तीचे असते तेच रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना  अनेक हेलपाटे तहसील कार्यालयात मारावे लागतात अनेक प्रकारचे दाखले जोडावे लागतात रेशनकार्ड मिळविणारी व्यक्ती थकून जाते त्यातच आता रेशनकार्ड काढण्यासाठी इतर कागद पत्रासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे एस सी ,एस टी ,ओ बी सी ,एन टी तसेच इतर मागास जातीमधील नागरीकांना जातीचा दाखला जोडल्याशिवाय रेशनकार्ड मिळणारच नाही जातीचा दाखला मिळविण्यासाठी असणाऱ्या जाचक अटीमुळे अनेकांनी तो दाखला काढण्याचा नादच सोडून दिलेला होता त्यामुळे शिक्षण घेणारे अन नोकरी करणारे तसेच राखीव जागेवर निवडणूक लढविणारे यांच्याकडेच जातीचे दाखले आढळतील बाकी नागरीक त्या गुंतागुंतीच्या भानगडीत पडलेच नाही परंतु आता सर्वांनाच नविन रेशनकार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला बंधनकारक करण्यात आला आहे शिधापत्रीका आँन लाईन करताना जातीचा दाखला नसेल तर संगणक ते कागदपत्र स्विकारणारच नाही त्यामुळे एस सी , एस टी , ओ बी सी , एन टी तसेच इतर मागासजातीमधील नागरीकांना रेशनकार्ड काढावयाचे असल्यास त्यांनी आगोदर जातीचा दाखला काढून तो नविन रेशन कार्डाच्या अर्जासोबत जोडावा लागणार आहे शासनाच्या या नविन आदेशाने जातीनिहाय जनगणना करणे सोपे जाणार असुन संबधीतांना जाती निहाय शासकीय योजनेचा लाभ मिळविणे सोपे जाणार आहे त्यामुळे नविन रेशनकार्ड काढायचे असेल तर जातीचा दाखला तयार ठेवावा लागणार आहे या शासन निर्णयामुळे बोगसगीरीला देखील आळा बसणार आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी )डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावे याकरिता संविधान लिहिले आणि त्यामुळेच न्यायालयात प्रलंबित असलेला सभापति पदाचा निर्णय माझ्या बाजूने लागला तो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करते असे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समितीचे नवोदित सभापती सौ वंदनाताई मुरकुटे यांनी केले दिनांक 7/12 /2021 रोजी सायंकाळी रामगड येथील राज मोहम्मद शेख  यांच्या फर्निचरच्या दुकानासमोर श्रीरामपूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ वंदना ताई मुरकुटे व पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांच्या सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड हे होते तर सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कासम शेख  यांनी केले कार्यक्रमास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद ,पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार सुरेश कांगुणे , उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज भाई सय्यद, श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी अहिरे, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख, मोहसीन शेख ,आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक असलम बिनसाद यांनी केले तर सौ वंदना ताई मुरकुटे ,अरुण पाटील नाईक ,शेख बरकत अली ,सुभाष राव गायकवाड ,अमीर जहागीरदार, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात वंदनाताई मुरकुटे या श्रामपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती झाल्याबद्दल तसेच पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांचा श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशन च्या वतीने सहकार भूषण सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आल्याने सत्कार करून सन्मानित करण्यात आले याच बरोबर कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड व पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांना पत्रकार संघाच्या वतीने  कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या प्रमुख सौ वंदना ताई पुढे म्हणाल्या की माझी जडणघडण मालेगाव येथे झाली असून मी ज्या ठिकाणी राहत होते तेथे पलीकडच्या बाजूला वृंदावन चौक तर पलीकडच्या बाजूला भारत नगर चौक असे दोन्ही ठिकाण एकीकडं हिंदू लोकवस्तीचे तर दुसरीकडे मुस्लिम लोकवस्तीचे होते परंतु दोन्हीकडचे लोक एक दिलाने राहत असल्याने कदापि तणावाची परिस्थिती निर्माण झाली नव्हती आज रामगड येथे आल्यानंतर अलीकडे रामगड व पलीकडे बेलापूर येथील वातावरण पाहता मला माझ्या माहेराची आठवण होते आणि या दोन्ही गावातील हिंदू-मुस्लीम एकोपा दृढ करणे करिता आपण अटीतटीचे प्रयत्न करू तसेच माझ्याकडे कामानिमित्त गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या लोकांचे काम सभापती या नात्याने नक्कीच करणार तसेच माझ्या कार्यक्षेत्र बाहेरील काम असल्यास त्या परीने नागरिकांच्या अडचणी दुर करणे कामी मी प्रयत्न करेल अशी गवाही त्यांनी यावेळी दिली अरुण पाटील नाईक यांनी सौ वंदना ताई यांच्या विजयाबद्दल उर्दू शेर सांगून कार्यक्रमात रंग भरला बरकत आली शेख यांनी आपल्या भाषणात सौ वंदना ताई मुरकुटे यांचा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा विजय असून सध्या इतर पक्षांकडून जातीय द्वेष निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न होत असतांना आपल्याला काँग्रेस पक्षाची नितांत गरज असल्याचे सांगितले स्वर्गीय जयंत रावजी ससाने यांनी त्यांच्या हयातीत एकात्मता व जातीय सलोखा निर्माण करण्याचे काम केले आहे ते निवांत असल्यास  वर्डवार्डातील कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या भागातील परिस्थितीचा व कामाचा आढावा विचारून घेत त्याचपद्धतीने वंदनाताई यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरातही लक्ष केंद्रित करून काम करावे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमा स पत्रकार सार्थक साळुंके ,अनीस भाई शेख ,मोहम्मद अली सय्यद, मोहम्मद गौरी, सलीम भाई शेख, तसेच रामगड येथील इमरान शेख, सिकंदर शेख, यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते_ _उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी मानले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget