श्रीरामपूर (प्रतिनिधी )डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावे याकरिता संविधान लिहिले आणि त्यामुळेच न्यायालयात प्रलंबित असलेला सभापति पदाचा निर्णय माझ्या बाजूने लागला तो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करते असे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समितीचे नवोदित सभापती सौ वंदनाताई मुरकुटे यांनी केले दिनांक 7/12 /2021 रोजी सायंकाळी रामगड येथील राज मोहम्मद शेख यांच्या फर्निचरच्या दुकानासमोर श्रीरामपूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ वंदना ताई मुरकुटे व पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांच्या सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड हे होते तर सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कासम शेख यांनी केले कार्यक्रमास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद ,पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार सुरेश कांगुणे , उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज भाई सय्यद, श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी अहिरे, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख, मोहसीन शेख ,आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक असलम बिनसाद यांनी केले तर सौ वंदना ताई मुरकुटे ,अरुण पाटील नाईक ,शेख बरकत अली ,सुभाष राव गायकवाड ,अमीर जहागीरदार, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात वंदनाताई मुरकुटे या श्रामपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती झाल्याबद्दल तसेच पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांचा श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशन च्या वतीने सहकार भूषण सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आल्याने सत्कार करून सन्मानित करण्यात आले याच बरोबर कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड व पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांना पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या प्रमुख सौ वंदना ताई पुढे म्हणाल्या की माझी जडणघडण मालेगाव येथे झाली असून मी ज्या ठिकाणी राहत होते तेथे पलीकडच्या बाजूला वृंदावन चौक तर पलीकडच्या बाजूला भारत नगर चौक असे दोन्ही ठिकाण एकीकडं हिंदू लोकवस्तीचे तर दुसरीकडे मुस्लिम लोकवस्तीचे होते परंतु दोन्हीकडचे लोक एक दिलाने राहत असल्याने कदापि तणावाची परिस्थिती निर्माण झाली नव्हती आज रामगड येथे आल्यानंतर अलीकडे रामगड व पलीकडे बेलापूर येथील वातावरण पाहता मला माझ्या माहेराची आठवण होते आणि या दोन्ही गावातील हिंदू-मुस्लीम एकोपा दृढ करणे करिता आपण अटीतटीचे प्रयत्न करू तसेच माझ्याकडे कामानिमित्त गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या लोकांचे काम सभापती या नात्याने नक्कीच करणार तसेच माझ्या कार्यक्षेत्र बाहेरील काम असल्यास त्या परीने नागरिकांच्या अडचणी दुर करणे कामी मी प्रयत्न करेल अशी गवाही त्यांनी यावेळी दिली अरुण पाटील नाईक यांनी सौ वंदना ताई यांच्या विजयाबद्दल उर्दू शेर सांगून कार्यक्रमात रंग भरला बरकत आली शेख यांनी आपल्या भाषणात सौ वंदना ताई मुरकुटे यांचा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा विजय असून सध्या इतर पक्षांकडून जातीय द्वेष निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न होत असतांना आपल्याला काँग्रेस पक्षाची नितांत गरज असल्याचे सांगितले स्वर्गीय जयंत रावजी ससाने यांनी त्यांच्या हयातीत एकात्मता व जातीय सलोखा निर्माण करण्याचे काम केले आहे ते निवांत असल्यास वर्डवार्डातील कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या भागातील परिस्थितीचा व कामाचा आढावा विचारून घेत त्याचपद्धतीने वंदनाताई यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरातही लक्ष केंद्रित करून काम करावे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमा स पत्रकार सार्थक साळुंके ,अनीस भाई शेख ,मोहम्मद अली सय्यद, मोहम्मद गौरी, सलीम भाई शेख, तसेच रामगड येथील इमरान शेख, सिकंदर शेख, यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते_ _उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी मानले.
Post a Comment