आता नविन रेशनकार्ड काढण्यासाठी लागणार जातीचा दाखला.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रत्येक ठिकाणी शासकीय योजनेसाठी आवश्यक असणारा पुरावा म्हणजे शिधापत्रिका ,रेशनकार्ड परंतु आता यापुढे नविन रेशनकार्ड तयार करावयाचे असल्यास जातीचा दाखला दिल्याशिवाय रेशनकार्डच मिळणार नाही त्यामुळे रेशनकार्ड मिळविण्यासाठी आगोदर जातीचा दाखला तयार ठेवावा लागणार आहे                 सर्वसामान्य नागरीकासाठी रेशनकार्ड म्हणजेच शिधापत्रिका ही जिवनाचा अविभाज्य घटक झालेले आहे कुठल्याही शासकीय निमशासकीय काम करावयाचे असल्यास रेशनकार्ड सक्तीचे असते तेच रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना  अनेक हेलपाटे तहसील कार्यालयात मारावे लागतात अनेक प्रकारचे दाखले जोडावे लागतात रेशनकार्ड मिळविणारी व्यक्ती थकून जाते त्यातच आता रेशनकार्ड काढण्यासाठी इतर कागद पत्रासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे एस सी ,एस टी ,ओ बी सी ,एन टी तसेच इतर मागास जातीमधील नागरीकांना जातीचा दाखला जोडल्याशिवाय रेशनकार्ड मिळणारच नाही जातीचा दाखला मिळविण्यासाठी असणाऱ्या जाचक अटीमुळे अनेकांनी तो दाखला काढण्याचा नादच सोडून दिलेला होता त्यामुळे शिक्षण घेणारे अन नोकरी करणारे तसेच राखीव जागेवर निवडणूक लढविणारे यांच्याकडेच जातीचे दाखले आढळतील बाकी नागरीक त्या गुंतागुंतीच्या भानगडीत पडलेच नाही परंतु आता सर्वांनाच नविन रेशनकार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला बंधनकारक करण्यात आला आहे शिधापत्रीका आँन लाईन करताना जातीचा दाखला नसेल तर संगणक ते कागदपत्र स्विकारणारच नाही त्यामुळे एस सी , एस टी , ओ बी सी , एन टी तसेच इतर मागासजातीमधील नागरीकांना रेशनकार्ड काढावयाचे असल्यास त्यांनी आगोदर जातीचा दाखला काढून तो नविन रेशन कार्डाच्या अर्जासोबत जोडावा लागणार आहे शासनाच्या या नविन आदेशाने जातीनिहाय जनगणना करणे सोपे जाणार असुन संबधीतांना जाती निहाय शासकीय योजनेचा लाभ मिळविणे सोपे जाणार आहे त्यामुळे नविन रेशनकार्ड काढायचे असेल तर जातीचा दाखला तयार ठेवावा लागणार आहे या शासन निर्णयामुळे बोगसगीरीला देखील आळा बसणार आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget