राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेत कान्हू गंगाराम मोरे याच्यासह लाल्या ऊर्फ अर्जून विक्रम माळी, तौफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे यांना आरोपी करून जेरबंद करण्यात आले होते. दरम्यान कान्हू मोरे याला राहुरी येथील कोठडीत असताना कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक २८ ऑगस्ट रोजी लघूशंकेचा बहाना करून कान्हू मोरे हा पोलिसांना चकमा देवून पसार झाला होता.
जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, हवालदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदिप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरूड, आकाश काळे, प्रशांत राठोड, गौतम लगड आदिंचे पोलिस पथक कान्हू मोरे याचा शोध घेत होते.
तेव्हा पासून पोलिस पथके त्याचा शोध घेत होते. त्या नंतर कान्हू मोरे हा मध्य प्रदेश येथे बडवा जिल्ह्यात असल्याची खबर पथकाला मिळाली होती. पोलिस पथक तेथे पोहचण्याच्या आता कान्हू मोरे हा तेथून पसार झाला होता. दरम्यान कान्हू मोरे याला मदत व आसरा देणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरू मरकड राहणार निवडूंगे ता. पाथर्डी व सतिष श्रीकांत हरिश्चंद्रे राहणार धामोरी खुर्द ता. राहुरी. यांच्यावर तोफखान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
कान्हू मोरे याचा शोध घेत असताना आज पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली कि, कान्हू मोरे हा राहुरी तालुक्यातील गुहा फाट्या जवळील मळगंगा मंदिर परिसरात वेशांतर करून व स्वतःचे अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाण बदलून राहत आहे. त्यानूसार पोलिस पथकाने मध्यरात्री गुहा फाटा परिसरात शोध घेऊन आरोपी कान्हू गंगाराम मोरे याच्या मुसक्या आवळून त्याला बेड्या ठोकल्या. सध्या त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. लवकरच राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येईल. अशी माहिती मिळाली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक सौ. दिपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके व पोलिस पथकाने केली.
Post a Comment