श्रीरामपुरात आलेल्या आणखी दहा जणांची तपासणी; दुबईचे चौघेही निगेटीव्ह अमेरिका-1, ऑस्ट्रेलिया-5 तर दुबईच्या 5 जणांचा समावेश.

श्रीरामपूर प्रतिनिधी-दुबई, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहून श्रीरामपूर येथे आलेल्या आणखी दहा जणांची काल तपासणी करण्यात आली आहे. या अगोदर दुबई येथून आलेल्या चौघांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.सध्या ओमायक्रॉनच्या विषाणूने जगभरात थैमान घातले असून परदेशातून भारतात येणार्‍यांचा शोध घेवून त्यांची तपासणी केली जात आहे. ओमायक्रॉनचे काही रुग्ण महाराष्ट्रातही आढळून आले असून नगर जिल्ह्यातही शिरकाव होण्याची भिती निर्माण झाल्याने बाहेर देशातून आलेल्यांचा शोध घेवून त्यांची तपासणी करण्याचे काम सुरु आहे.श्रीरामपुरात 29 नोव्हेंबर 2021 रोजी दुबईहून-मुंबई व मुंबईहून श्रीरामपुरातील वॉर्ड नं. 6 मधील एकाच कुटुंबातील चौघेजण श्रीरामपुरात आले. त्यांचा शोध घेवून तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या असून सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.काल पुन्हा परदेशातून आलेल्या लोकांचा वैद्यकीय विभागातील पथकाने शोध घेतला असता 10 जण आढळून आले आहेत. यात ऑस्ट्रेलिया येथून एकाच कुटुंबातील वॉर्ड नं. 7 मधील चौघेजण आले असून वॉर्ड नं. 3 मध्ये अमेरिकेतून एकजण आलेला असून अन्य 5 जण हे वॉर्ड नं. 1 मध्ये आलेले आहेत. काल या सर्वांची तपासणी केली. त्यांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या असून त्यांचे अहवाल आज येण्याची शक्यता आहे. या दहा जणांनाही सध्या होम आयसीयुलेशनमध्ये सुरक्षित राहण्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget