भारतीय लष्कराचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ बिपिन रावत व दुर्घटनेत शहीद झालेल्यांना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली.
भारतीय लष्कराचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ बिपिन रावत यांचे त्यांच्या पत्नी सह 13 जणांचे तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले असून भारतीय सेनेचा रत्न हरपला असल्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी व्यक्त केल्या दिनांक दहा-बारा 2021 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात बिपिन रावत यांची श्रद्धांजलीपर शोकसभा घेण्यात आली यावेळी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना बरकत त अली शेख पुढे म्हणाले की गोरखा ब्रिगेडचे सी ओ ए एस बनणारे बिपिन रावत हे चौथे अधिकारी बनवण्यापूर्वी लष्कर प्रमुख झाले ईशान्येतील दहशतवाद कमी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता म्यानमार मधील 2015 सालातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यात आले त्यात त्यांची प्रमुख भूमिका होती 2016 मधील सर्जिकल स्ट्राइक मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावली त्यांच्या विविध उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, अशी पदके देऊन गौरविण्यात आले होते त्यांच्या निधनाने भारतीय सेनेत व देशभरात दुखवटा पसरला आहे परमेश्वर त्यांच्या थोर आत्म्यास शांती देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली शेख यांनी अर्पण केली सामूहिक राष्ट्रगीताच्या स्वरात बिपिन रावत यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, सामाजिक कार्यकर्ते सरंवर अली सय्यद, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शोक सभेच्या कार्यक्रमास पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, सामाजिक कार्यकर्ते सरवर अली सय्यद, शहर काँग्रेस सरचिटणीस नजीर भाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बुऱ्हाण भाई जमादार, सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा, पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बीके सौदागर, अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इमरान शेख, पत्रकार संघ सदस्य सार्थक साळुंके, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष सौ समीना रफिक शेख, कुमारी माहीम शेख, आदि पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment