Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील अनाथ मुलांची जबाबदारी बेलापुर ग्रामस्थांची असुन या आश्रमातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जि प सदस्य शरद नवले यांनी दिली              महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांनी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मिळालेला बोनस गरीबांना मदत म्हणून  देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांना मिळालेल्या बोनसचे चार हजार रुपये तसेच तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी दिलेला मदतीनिधी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्या वेळी बोलताना जि प सदस्य शरद  नवले म्हणाले की या ठिकाणी आश्रमास पत्र्याचे शेड बांधुन देण्याची मागणी असुन त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत तसेच येथील मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु या आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांचे वय अवघे १९ वर्ष असतानाही ते १४ अनाथ मुलाचा सांभाळ करत आहे ते स्वतः अनाथ असुनही अनाथाचा ते नाथ बनले आहे असेही ते म्हणाले या वेळी कृष्णानंद महाराज व सचिव ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की या आश्रमात चौदा अनाथ मुले राहत असुन त्याचा दैनंदिन व शिक्षणाचा खर्च मोठा आहे या ठिकाणी मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेच्या टाकीची गरज आहे  त्या करीता दानशुरांनी या आश्रमास मदत करावी असे अवाहन कृष्णानंद महाराजांनी केले आहे या वेळी पत्रकार देविदास देसाई तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास चेतन जाधव  पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम प्रकाश मेहेत्रे  उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रत्येक ठिकाणी शासकीय योजनेसाठी आवश्यक असणारा पुरावा म्हणजे शिधापत्रिका ,रेशनकार्ड परंतु आता यापुढे नविन रेशनकार्ड तयार करावयाचे असल्यास जातीचा दाखला दिल्याशिवाय रेशनकार्डच मिळणार नाही त्यामुळे रेशनकार्ड मिळविण्यासाठी आगोदर जातीचा दाखला तयार ठेवावा लागणार आहे                 सर्वसामान्य नागरीकासाठी रेशनकार्ड म्हणजेच शिधापत्रिका ही जिवनाचा अविभाज्य घटक झालेले आहे कुठल्याही शासकीय निमशासकीय काम करावयाचे असल्यास रेशनकार्ड सक्तीचे असते तेच रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना  अनेक हेलपाटे तहसील कार्यालयात मारावे लागतात अनेक प्रकारचे दाखले जोडावे लागतात रेशनकार्ड मिळविणारी व्यक्ती थकून जाते त्यातच आता रेशनकार्ड काढण्यासाठी इतर कागद पत्रासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे एस सी ,एस टी ,ओ बी सी ,एन टी तसेच इतर मागास जातीमधील नागरीकांना जातीचा दाखला जोडल्याशिवाय रेशनकार्ड मिळणारच नाही जातीचा दाखला मिळविण्यासाठी असणाऱ्या जाचक अटीमुळे अनेकांनी तो दाखला काढण्याचा नादच सोडून दिलेला होता त्यामुळे शिक्षण घेणारे अन नोकरी करणारे तसेच राखीव जागेवर निवडणूक लढविणारे यांच्याकडेच जातीचे दाखले आढळतील बाकी नागरीक त्या गुंतागुंतीच्या भानगडीत पडलेच नाही परंतु आता सर्वांनाच नविन रेशनकार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला बंधनकारक करण्यात आला आहे शिधापत्रीका आँन लाईन करताना जातीचा दाखला नसेल तर संगणक ते कागदपत्र स्विकारणारच नाही त्यामुळे एस सी , एस टी , ओ बी सी , एन टी तसेच इतर मागासजातीमधील नागरीकांना रेशनकार्ड काढावयाचे असल्यास त्यांनी आगोदर जातीचा दाखला काढून तो नविन रेशन कार्डाच्या अर्जासोबत जोडावा लागणार आहे शासनाच्या या नविन आदेशाने जातीनिहाय जनगणना करणे सोपे जाणार असुन संबधीतांना जाती निहाय शासकीय योजनेचा लाभ मिळविणे सोपे जाणार आहे त्यामुळे नविन रेशनकार्ड काढायचे असेल तर जातीचा दाखला तयार ठेवावा लागणार आहे या शासन निर्णयामुळे बोगसगीरीला देखील आळा बसणार आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी )डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावे याकरिता संविधान लिहिले आणि त्यामुळेच न्यायालयात प्रलंबित असलेला सभापति पदाचा निर्णय माझ्या बाजूने लागला तो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करते असे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समितीचे नवोदित सभापती सौ वंदनाताई मुरकुटे यांनी केले दिनांक 7/12 /2021 रोजी सायंकाळी रामगड येथील राज मोहम्मद शेख  यांच्या फर्निचरच्या दुकानासमोर श्रीरामपूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ वंदना ताई मुरकुटे व पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांच्या सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड हे होते तर सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कासम शेख  यांनी केले कार्यक्रमास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद ,पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार सुरेश कांगुणे , उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज भाई सय्यद, श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी अहिरे, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख, मोहसीन शेख ,आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक असलम बिनसाद यांनी केले तर सौ वंदना ताई मुरकुटे ,अरुण पाटील नाईक ,शेख बरकत अली ,सुभाष राव गायकवाड ,अमीर जहागीरदार, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात वंदनाताई मुरकुटे या श्रामपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती झाल्याबद्दल तसेच पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांचा श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशन च्या वतीने सहकार भूषण सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आल्याने सत्कार करून सन्मानित करण्यात आले याच बरोबर कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड व पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांना पत्रकार संघाच्या वतीने  कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या प्रमुख सौ वंदना ताई पुढे म्हणाल्या की माझी जडणघडण मालेगाव येथे झाली असून मी ज्या ठिकाणी राहत होते तेथे पलीकडच्या बाजूला वृंदावन चौक तर पलीकडच्या बाजूला भारत नगर चौक असे दोन्ही ठिकाण एकीकडं हिंदू लोकवस्तीचे तर दुसरीकडे मुस्लिम लोकवस्तीचे होते परंतु दोन्हीकडचे लोक एक दिलाने राहत असल्याने कदापि तणावाची परिस्थिती निर्माण झाली नव्हती आज रामगड येथे आल्यानंतर अलीकडे रामगड व पलीकडे बेलापूर येथील वातावरण पाहता मला माझ्या माहेराची आठवण होते आणि या दोन्ही गावातील हिंदू-मुस्लीम एकोपा दृढ करणे करिता आपण अटीतटीचे प्रयत्न करू तसेच माझ्याकडे कामानिमित्त गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या लोकांचे काम सभापती या नात्याने नक्कीच करणार तसेच माझ्या कार्यक्षेत्र बाहेरील काम असल्यास त्या परीने नागरिकांच्या अडचणी दुर करणे कामी मी प्रयत्न करेल अशी गवाही त्यांनी यावेळी दिली अरुण पाटील नाईक यांनी सौ वंदना ताई यांच्या विजयाबद्दल उर्दू शेर सांगून कार्यक्रमात रंग भरला बरकत आली शेख यांनी आपल्या भाषणात सौ वंदना ताई मुरकुटे यांचा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा विजय असून सध्या इतर पक्षांकडून जातीय द्वेष निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न होत असतांना आपल्याला काँग्रेस पक्षाची नितांत गरज असल्याचे सांगितले स्वर्गीय जयंत रावजी ससाने यांनी त्यांच्या हयातीत एकात्मता व जातीय सलोखा निर्माण करण्याचे काम केले आहे ते निवांत असल्यास  वर्डवार्डातील कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या भागातील परिस्थितीचा व कामाचा आढावा विचारून घेत त्याचपद्धतीने वंदनाताई यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरातही लक्ष केंद्रित करून काम करावे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमा स पत्रकार सार्थक साळुंके ,अनीस भाई शेख ,मोहम्मद अली सय्यद, मोहम्मद गौरी, सलीम भाई शेख, तसेच रामगड येथील इमरान शेख, सिकंदर शेख, यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते_ _उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी मानले.


राहुरी प्रतिनिधी-जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना चकमा देवून पसार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कान्हू मोरे याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. आरोपी कान्हू मोरे याला राहुरी तालुक्यात पकडून त्याला बेड्या ठोकल्या. सध्या त्याला तोफखान पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून लवकरच राहुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. मोरे याला पळून जाण्यास करणारे पाथर्डी व राहुरी येथील दोघांना अटक करण्यात आली.

      राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेत कान्हू गंगाराम मोरे याच्यासह लाल्या ऊर्फ अर्जून विक्रम माळी, तौफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे यांना आरोपी करून जेरबंद करण्यात आले होते. दरम्यान कान्हू मोरे याला राहुरी येथील कोठडीत असताना कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक २८ ऑगस्ट रोजी लघूशंकेचा बहाना करून कान्हू मोरे हा पोलिसांना चकमा देवून पसार झाला होता. 

             जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, हवालदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदिप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरूड, आकाश काळे, प्रशांत राठोड, गौतम लगड आदिंचे पोलिस पथक कान्हू मोरे याचा शोध घेत होते. 

         तेव्हा पासून पोलिस पथके त्याचा शोध घेत होते. त्या नंतर कान्हू मोरे हा मध्य प्रदेश येथे बडवा जिल्ह्यात असल्याची खबर पथकाला मिळाली होती. पोलिस पथक तेथे पोहचण्याच्या आता कान्हू मोरे हा तेथून पसार झाला होता. दरम्यान कान्हू मोरे याला मदत व आसरा देणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरू मरकड राहणार निवडूंगे ता. पाथर्डी व सतिष श्रीकांत हरिश्चंद्रे राहणार धामोरी खुर्द ता. राहुरी. यांच्यावर तोफखान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. 

       कान्हू मोरे याचा शोध घेत असताना आज पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली कि, कान्हू मोरे हा राहुरी तालुक्यातील गुहा फाट्या जवळील मळगंगा मंदिर परिसरात वेशांतर करून व स्वतःचे अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाण बदलून राहत आहे. त्यानूसार पोलिस पथकाने मध्यरात्री गुहा फाटा परिसरात शोध घेऊन आरोपी कान्हू गंगाराम मोरे याच्या मुसक्या आवळून त्याला बेड्या ठोकल्या. सध्या त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. लवकरच राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येईल. अशी माहिती मिळाली आहे. 

     सदर कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक सौ. दिपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके व पोलिस पथकाने केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी-दुबई, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहून श्रीरामपूर येथे आलेल्या आणखी दहा जणांची काल तपासणी करण्यात आली आहे. या अगोदर दुबई येथून आलेल्या चौघांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.सध्या ओमायक्रॉनच्या विषाणूने जगभरात थैमान घातले असून परदेशातून भारतात येणार्‍यांचा शोध घेवून त्यांची तपासणी केली जात आहे. ओमायक्रॉनचे काही रुग्ण महाराष्ट्रातही आढळून आले असून नगर जिल्ह्यातही शिरकाव होण्याची भिती निर्माण झाल्याने बाहेर देशातून आलेल्यांचा शोध घेवून त्यांची तपासणी करण्याचे काम सुरु आहे.श्रीरामपुरात 29 नोव्हेंबर 2021 रोजी दुबईहून-मुंबई व मुंबईहून श्रीरामपुरातील वॉर्ड नं. 6 मधील एकाच कुटुंबातील चौघेजण श्रीरामपुरात आले. त्यांचा शोध घेवून तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या असून सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.काल पुन्हा परदेशातून आलेल्या लोकांचा वैद्यकीय विभागातील पथकाने शोध घेतला असता 10 जण आढळून आले आहेत. यात ऑस्ट्रेलिया येथून एकाच कुटुंबातील वॉर्ड नं. 7 मधील चौघेजण आले असून वॉर्ड नं. 3 मध्ये अमेरिकेतून एकजण आलेला असून अन्य 5 जण हे वॉर्ड नं. 1 मध्ये आलेले आहेत. काल या सर्वांची तपासणी केली. त्यांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या असून त्यांचे अहवाल आज येण्याची शक्यता आहे. या दहा जणांनाही सध्या होम आयसीयुलेशनमध्ये सुरक्षित राहण्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सुखदेव थोरात यांनी पुणे येथुन एक टेम्पो भरुन कपडे आणून ते सर्व श्रीरामपुर बेलापुर उक्कलगाव येथील गरजुंना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप केले असुन त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदाशिव थोरात हे पुणे येथील सिंहगड टेक्निकल ऐज्यूकेशन सोसायटी वडगाव गुप्ता येथील शिक्षण संस्थेत नोकरी करत आहे ते मुळचे उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील रहीवासी आहेत नोकरी करत असतानाच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली त्यांनी पुणे येथुन आपल्या संपर्कातील अनेकांना मदतीचे अवाहन केले अन त्यांची संकल्पना अनेकांना भावली चांगल्या प्रतीच्या साड्या स्वेटर

मफलर ब्लाऊज पँट शर्ट असे एक टेम्पोभर कपडे घेवुन ते श्रीरामपुरात दाखल झाले ऐकलहरे येथील आठवाडी येथील वसाहतीत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके याच्या उपस्थितीत व सामाजिक कार्यकर्ते गुलाबभाई जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा अन्सार जहागीरदार अनिस जहागीरदार अर्जुन मकासरे अनिल कोल्हे सुभाष शिंदेबबन तागड सर यांच्या हस्ते  होतकरु कुटुंबाना कपड्याचे वाटप करण्यात आले तसेच बेलापुर येथील घिसाडी बांधवांना देखील जि प सदस्य शरद नवले बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमात गादी उशी बेडशिट फ्रीज पंखा आदि सामान भेट म्हणून देण्यात आले विठ्ठल अनाथाश्रम गोखलेवाडी येथील आश्रमास देखील गादी व बेडशिट देण्यात आले अनाथ मुलांच्या वसतीगृहात देखील कपड्यांचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या सदाशिव थोरात यांनी यापूर्वीही उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील भानसगाव येथे अन्नधान्याचे वाटप केले होते कोरोना काळात तमाशा कलावंताना सांगली कराड येथे जावुन २७६ कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले होते सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीला देखील थोरात धावून गेले होते पूरग्रस्तांना धान्याचे व कपड्याचे वाटप करण्यात आले होते सेव द चाईल्ड फौंडेशनच्या माध्यमातून लहान मुलांना उपचारासाठी भरीव अशी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली होती अशा या सामाजिक कार्यकर्त्याचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे .


श्रीरामपूर प्रतिनिधी:-श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागातील मोहटा देवी मंदिर परिसरात रविवारी धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणा-या वनकर्मचारी लक्ष्मण गणपत किनकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किनकर

यांच्यासह सात जण जखमी झाले होते.लक्ष्मण गणपत किंनकर हे वनकर्मचारी म्हणून राहुरी वनपरिक्षेत्रात कार्यरत होते. मोरगेवस्ती येथे एका ठिकाणी दडलेल्या बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात बिबट्याने किनकर यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मांडीला चावा घेतला होता. सहकर्मचाऱ्याच्या प्रयत्नामुळे त्यावेळी बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. त्यांच्यावर अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु बिबट्याच्या चाव्यामुळे झालेला संसर्ग किनकर यांच्या शरीरात पसरला आणि त्यामुळे त्यांचा आज बुधवार दिनांक 8 डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली. लक्ष्मण गणपत किनकर यांना वनविभागातर्फे “वन शहीद”म्हणून गणण्यात आले आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget