दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.
अहमदनगर- जागतिक अपंग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार सोहळा गुरुवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले ,उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर ,अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख ,कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, महिला व बालकल्याण सभापती सौ.मीराताई शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते*
*यावेळी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिव्यांगांना आदर्श शिक्षक पुरस्कार व सभागृह मिळण्याची विनंती पदाधिकाऱ्यांना केली होती. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांनी संघटनेच्या मागणीवरून पद्मश्री पोपटराव पवार यांचे उपस्थितीत दरवर्षी शिक्षक दिनाला एक आदर्श पुरस्कार दिव्यांग शिक्षकाला देण्याचा व जागतिक अपंग दिनी ३ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मोफत देण्याचा व राखून ठेवण्याचा शब्द दिला होता, तो काल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाळून दरवर्षी शिक्षक दिनाला एका दिव्यांग शिक्षकाला आदर्श पुरस्कार देणार व जिल्हा परिषदेचे सभागृह जागतिक अपंग दिनी मोफत व राखून ठेवण्याचा ठराव करून.. दोन मागण्या मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे अभिनंदनाचा ठराव मंजूर केला ."बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या उक्ती प्रमाणे अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी जो शब्द सभागृहात दिला होता, तो तात्काळ दुसऱ्या दिवशी पाळून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित केला,अशी माहिती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिली.*
*या मागण्या मंजूर झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे .यापूर्वीही सर्व पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचारी संघटनेला सहानुभूतीपूर्वक सहकार्य केले आहे.राज्यात प्रथमच 39 दिव्यांग कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकाचे प्रमोशन दिले, त्याप्रमाणे 180 प्राथमिक शिक्षकांचे वाहन भत्त्यांचे प्रस्ताव फरकास मंजूर केले, याबद्दलही संघटनेच्या बैठकीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली*
*यावेळी संघटनेचे मार्गदर्शक दत्तात्रय जपे, राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे, राजू आव्हाड, पोपट धामणे, राजेंद्र औटी ,रमेश शिंदे, उद्धव थोरात,बन्सी गुंड, साहेबराव मले, श्रीकांत दळवी, संजय बोरसे,गजानन मुंडलिक,अमोल चन्ने,महिंद्रा कोळी, दादासाहेब गव्हाणे, अजय लगड,चरणसिंग काकरवाल, भिमराज चव्हाण,राजेंद्र ठूबे, खंडू बाचकर,किरण माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सामलेटी साईलता केंद्रप्रमुख किशोर निळे आणि केंद्रप्रमुख राजाबाई कांबळे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी बेलापूर बुद्रुक मुली शाळेचे हार्दिक अभिनंदन केले.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांची नाशिक शहराच्या सहाय्य आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. नारायण न्याहळदे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. कातकडे हे नाशिक ग्रामीणवरून बदलून आले आहेत. जाधव हेही नाशिकवरून बदलून आले आहेत.
प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. शेती पंपाची वीज बील वसूली ताबडतोब बंद करून शेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे. अशा मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या होत्या. आंदोलन सुरू होऊन पंधरा मिनिटे झाली होती. पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळी दाखल होताच पोलिस फौजफाट्याने धाक दडपशाहीने कार्यकर्त्याची धरपकड सुरू केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. तर काही कार्यकर्त्यांची उचल बांगडी करून ताब्यात घेतले. यावेळी पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. यामध्ये पोलिस वाहनाची खिडकीची काच फोडण्यात आली. पोलिस प्रशासना विरोधात जबरदस्त घोषनाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, मधुकर शिंदे तसेच इतर मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा उपस्थित होता.
त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाने हे आंदोलन दडपशाहीने धुळीस मिळवले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड सुरू होती. तर प्रहार संघटना, आरपीआय व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, आरपीआयचे जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे, लहानु तमनार, एकलव्य संघटनेचे नामदेव पवार आदि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. याबाबत दुपारी उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाची कारवाई सुरू होती.