अशोक कारखान्याच्या वतीने ऊस तोड मजुराच्या भोजनाची व्यवस्था.
बेलापुर (प्रतिनिधी )-अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन द्राक्ष डाळींब फळबागासाठी हे वातावरण नुकसानदायक असुन कांदा लागवडीवर देखील मोठा परिणाम झाला आहे साखर काराखाने सुरु झालेअसुनया पावसामुळे ऊस तोड मजुराचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे सध्या साखर कारखान्यांचा गळीत हांगाम सुरु आहे ऊस तोड करणारे मजुर गावोगावी ऊस तोडणीसाठी गेलेले आहेत त्या मजुरांनी ऊस फडाजवळच आपल्या राहुट्या उभ्या केल्या असुन अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले त्यांना चूल पेटविणेही शक्य झाले नाही ही बाब अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने या मजुराच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश शेतकी अधिकाऱ्यांना दिले बेलपिंपळगाव तसेच उक्कलगाव येथे मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली बेलपिंपळगाव येथे अशोक कारखान्याचे माजी चेअरमन दिगंबर शिंदे व माजी संचालक सखाराम कांगुणे तर उक्कलगाव येथे माजी चेअरमन रावसाहेब पा थोरात यांच्या अधिपत्याखाली श्री हरिहर केशव गोविंद महाराज मंदिर येथे भोजन बनविण्यात आले कारखान्याचे दाखविलेल्या या सहाकार्याबद्दल अनेक ऊस तोड मजुरांनी अन्नदात्यास धन्यवाद दिले आहे.
Post a Comment