Latest Post

श्रीरामपूर:- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील  कच्चे रसायन, 7800  लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 248  लिटर   व तसेच 50 किलो नवसागर , देशी दारू, तसेच 450  किलो गुळ एक टेंपो व  एक दुचाकी असा एकूण 6,43,955  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात  आले आहे . त्यानुसार,

1) श्रीकांत प्रभाकर काळे, रा कदम वस्ती  श्रीरामपूर

2)  सागर माणिक शिंदे, रा. गोंधवणी ता श्रीरामपूर

3)  भीमराव काळे रा अशोक नगर ता  श्रीरामपूर

4)   दत्तात्रेय जानकीराम मंचरे रा वैजापूर

5) दीपक वसंत शेलार रा अशोक नगर

6)  अशोक काशिनाथ शिंदे( फरार)

7) बाप्पू नागू गायकवाड ( फरार)

8) अर्जुन फुलारे ( फरार) सर्व  राहणार गोंधवणी वडारवाडा ता श्रीरामपूर   यांचेविरुध्द  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) ( क) ,( ड), (  इ) नुसार P.C.  नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन  व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  मा.गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p  संदीप मिटके, Dy s.p. नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क),P.I. कोल्हे, P.I.  हुलगे, P.I, वाजे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया काल न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून सदरचा निकाल बुधवार दि. 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली.पंचायत समितीचे सभापती पद विखे गट व काँग्रेसकडून प्रतिष्ठेचे करण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीला विषेश महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही गटाकडून निवडणूक प्रक्रियेनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला.पंचायत समितीच्या सभापती संगिता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. शिंदे यांच्या अपात्रतेसाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दि. 9 नोव्हेंबर रोजी या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याला विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.पंचायत समितीत 50 टक्क्यापेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याचे आपल्या याचिकेत नमूद केले आहे. याप्रकरणी खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मात्र मनाई केली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार, सहाय्यक तथा गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी काँग्रेसच्यावतीने वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले,व कल्याणी कानडे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. बी. काकड यांच्या मार्फत्त पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला.वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले 



श्रीरामपुर  (प्रतिनिधी )- श्रीरामपूर शहर व तालूक्यातील अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालाली आहे त्यामुळे शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठाण युवा अघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.या बाबत उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की शहर व तालुक्यात अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन दारु मटका गुटखा जुगार तर दररोज सुरुच आहेत त्यातच आता काँम्प्यूटर लाँटरीची भर पडली आहे अनेक बेरोजगार तरुण शालेय विद्यार्थी या झटपट लाँटरीचे बळी ठरत आहे शिक्षणाच्या नावाखाली आई वडीलाकडून पैसे उकळून हे गेम खेळले जात आहे या अवैध व्यवसायामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त झालेले आहेत नशेच्या अहारी गेल्यामुळे अनेकांना वेगवेगळे आजार जडले आहे या सर्व प्रकारास जबाबदार कोण? असा सवाल शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला असुन हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे  . प्रशासनाकडुन दोन दिवसात यावर कठोर कारवाई झाली नाही व शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर श्रीरामपुरातील महात्मा गांधी पुतळयाजवळ लोकशाही

मार्गाने सर्व नियमांचे पालण करून आमरण उपोषण करण्यात येईल.असेही निवेदनात म्हटले आहे.



राहाता :-मोठ्या शहरा पाठोपाठ आता राहाता शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही व्हाईटनर नशेच्या जीवघेण्या व्यसनांमध्ये तरुणाई अडकल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान करणार्‍यांना व्यसन लागले असा आपल्याकडे सहज समत आहे. अशांची संख्या प्रामुख्याने मोठी आहे. परंतु सध्या राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. प्रामुख्याने 16 ते 25 वयोगटातील तरुणांना हे व्यसन लागले आहे. राहाता तालुक्यात शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे तसेच तालुक्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.परप्रांतीय तरुण रोजगारासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या संगतीत राहून येथील तरुणांनी अनेक व्यसने लावून घेतली आहेत. यामध्ये व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी शाळेत न जाता हे व्यसन करतात. हल्ली जनरल स्टोअर्समध्ये व्हाईटनरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. काही वर्षांपूर्वी कोरॅक्स, आयोडेक्स औषध सेवन करून तरुण वर्ग व्यसनाधीन झाला होता. व्हाईटनर रुमालावर टाकून त्याचा गंध घेऊन व्यसनाचा फंडा परिसरात तरुणांच्या हाती लागला आहे. या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.राहाता शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. राहाता शहरात परराज्यातून गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी आणला जातो व तो तालुक्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी दिला जातो. शहरात अवैधरित्या गुटखा विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात असताना पोलीस प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. अनेकदा पोलिसांनी होलसेल गुटखा विक्री करणार्‍यांना रंगेहाथ पकडले, परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.राहाता शहरात बस स्थानक, व्यापारी संकुल, नगरपरिषद बगीच्या, कातनाला, पाण्याच्या टाकी परिसर, पिंपळस खटकळी कॅनॉल रोड या ठिकाणी अनेक तरुण

रात्रीच्यावेळी व्हाईटनर, मद्यपान, धूम्रपान अशा विविध नशा करताना दिसतात. शिर्डीत काही वर्षापूर्वी व्हाईटनरची नशा करणार्‍या मुलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी तात्पुरती कारवाई करून काही काळ या नशेबाज तरुणांवर अंकुश ठेवला होता. परंतु पुन्हा नशा करणार्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयात मुलांना प्रबोधन करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे. राहाता तालुक्यात बेकायदा मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गावठी दारूची विक्री रहिवासी परिसरात राजरोसपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. बेकायदा मद्यविक्रीला एक प्रकारचा परवाना मिळवायचे चित्र आहे. बेकायदा मद्यविक्रीमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. पोलीस प्रशासनाने या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असुन नागरीकाबरोबरच तरुण पिढी तसेच विद्यार्थीही या अवैध धंद्याचे बळी  ठरत आहे        बेलापुर गावात मटका अन गुटखा जोरात सुरु होताच त्यातच आणखी भर पडली ती झटपट लाँटरी बिंगो गेम टायगरा गेम अशा झटपट पैशाचे अमीष दाखविणारे संगणकीय जुगार गावात सुरु झाले असुन शालेय विद्यार्थी या जुगाराचे बळी ठरत आहेत शाळेच्या नावावर पालकाकडून पैसे उकळायचे अन हे गेम खेळत बसायचे असे प्रकार गावात सुरु झाले असुन त्या दुकाना उघडण्या आगोदरच नागरीक शालेय विद्यार्थी दुकानासमोर दुकान उघडण्याची वाट पहात असतात या बाबत गावातील जागृक नागरीकाकडे काही

शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची शहनिशा केली असता त्यात सत्यता आढळून आली आहे त्या नंतर बेलापुर पोलीसांना या बाबत जाब विचारण्यात आला असता त्यांनी कानावर हात ठेवले मात्र वरीष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे सांगीतल्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले असुन हे आवैध धंदे तातडीने बंद करावे अशी मागणी पालकांनी केली आहे या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले आहे


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय(बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने बेलापूरात ५६ वे मोफत मोतीबिंदु शिबीर संपन्न होत असुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. भागवत प्रतिष्ठाण व स्वास्तिक गृपच्या  संयुक्त विद्यमाने तसेच के के बुधराणी हाँस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने दर महीन्याच्या तिसऱ्या बुधवारी मोफत मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे  शिबीराची सुरुवात झाल्यापासुन दर महीन्याला खंड न पडता हे शिबीर भरविले जात असुन आनेक गोरगरीब होतकरु नागरीकांना यां शिबीराचा लाभ मिळाला असल्याचे आयोजक अभिषेक खंडागळे यांनी सांगितले बेलापुर गावात काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी आज बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५६ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी याची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी(RTPCR)रिपोर्ट सोबत आणावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. 


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय(बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने बेलापूरात ५६ वे मोफत मोतीबिंदु शिबीर संपन्न होत असुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे                                        भागवत प्रतिष्ठाण व स्वास्तिक गृपच्या  संयुक्त विद्यमाने तसेच के के बुधराणी हाँस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने दर महीन्याच्या तिसऱ्या बुधवारी मोफत मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे  शिबीराची सुरुवात झाल्यापासुन दर महीन्याला खंड न पडता हे शिबीर भरविले जात असुन आनेक गोरगरीब होतकरु नागरीकांना यां शिबीराचा लाभ मिळाला असल्याचे आयोजक अभिषेक खंडागळे यांनी सांगितले बेलापुर गावात काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी उद्या बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५६ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी याची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी(RTPCR)रिपोर्ट सोबत आणावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget