बेलापुर (प्रतिनिधी )-भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय(बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने बेलापूरात ५६ वे मोफत मोतीबिंदु शिबीर संपन्न होत असुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. भागवत प्रतिष्ठाण व स्वास्तिक गृपच्या संयुक्त विद्यमाने तसेच के के बुधराणी हाँस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने दर महीन्याच्या तिसऱ्या बुधवारी मोफत मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे शिबीराची सुरुवात झाल्यापासुन दर महीन्याला खंड न पडता हे शिबीर भरविले जात असुन आनेक गोरगरीब होतकरु नागरीकांना यां शिबीराचा लाभ मिळाला असल्याचे आयोजक अभिषेक खंडागळे यांनी सांगितले बेलापुर गावात काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी आज बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५६ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी याची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी(RTPCR)रिपोर्ट सोबत आणावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Post a Comment