बेलापुर (प्रतिनिधी )-गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असुन नागरीकाबरोबरच तरुण पिढी तसेच विद्यार्थीही या अवैध धंद्याचे बळी ठरत आहे बेलापुर गावात मटका अन गुटखा जोरात सुरु होताच त्यातच आणखी भर पडली ती झटपट लाँटरी बिंगो गेम टायगरा गेम अशा झटपट पैशाचे अमीष दाखविणारे संगणकीय जुगार गावात सुरु झाले असुन शालेय विद्यार्थी या जुगाराचे बळी ठरत आहेत शाळेच्या नावावर पालकाकडून पैसे उकळायचे अन हे गेम खेळत बसायचे असे प्रकार गावात सुरु झाले असुन त्या दुकाना उघडण्या आगोदरच नागरीक शालेय विद्यार्थी दुकानासमोर दुकान उघडण्याची वाट पहात असतात या बाबत गावातील जागृक नागरीकाकडे काही
शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची शहनिशा केली असता त्यात सत्यता आढळून आली आहे त्या नंतर बेलापुर पोलीसांना या बाबत जाब विचारण्यात आला असता त्यांनी कानावर हात ठेवले मात्र वरीष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे सांगीतल्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले असुन हे आवैध धंदे तातडीने बंद करावे अशी मागणी पालकांनी केली आहे या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले आहे
Post a Comment