अवैध धंदे बंद करण्याची शिवप्रहार संघटनेची मागणी.
श्रीरामपुर (प्रतिनिधी )- श्रीरामपूर शहर व तालूक्यातील अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालाली आहे त्यामुळे शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठाण युवा अघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.या बाबत उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की शहर व तालुक्यात अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन दारु मटका गुटखा जुगार तर दररोज सुरुच आहेत त्यातच आता काँम्प्यूटर लाँटरीची भर पडली आहे अनेक बेरोजगार तरुण शालेय विद्यार्थी या झटपट लाँटरीचे बळी ठरत आहे शिक्षणाच्या नावाखाली आई वडीलाकडून पैसे उकळून हे गेम खेळले जात आहे या अवैध व्यवसायामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त झालेले आहेत नशेच्या अहारी गेल्यामुळे अनेकांना वेगवेगळे आजार जडले आहे या सर्व प्रकारास जबाबदार कोण? असा सवाल शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला असुन हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे . प्रशासनाकडुन दोन दिवसात यावर कठोर कारवाई झाली नाही व शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर श्रीरामपुरातील महात्मा गांधी पुतळयाजवळ लोकशाही
मार्गाने सर्व नियमांचे पालण करून आमरण उपोषण करण्यात येईल.असेही निवेदनात म्हटले आहे.