बेलापूर - शिव चरित्राचे चालते बोलते व्यासपीठ, संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने इतिहासपर्वतील युगाचा अस्त झाला. शिव पंढरीचा वारकरी शिव चरणी लीन झाला अश्याच शब्दात बेलापूरकरांनी व शिवप्रेमींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.बाबासाहेब पुरंदरे हे १५ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर जिल्हा प्रचारक होते त्यामुळे बाबासाहेबांचे घनिष्ट संबंध असल्याने नगर,बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, संगमनेर अनेक जुन्या कार्यकर्त्यांची खडा ना खडा माहिती होती. त्यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यात ६० वर्षाच्या गत कालीनं आठवणींना पुरंदरे यांनी उजळा दिला होता.३ मार्च १९८४ (रंगपंचमी) रोजीच म्हणजेच सुमारे ३६ वर्षापूर्वी बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याचे अनावर कार्यासाठी बेलापूरला आले असताना त्यांना बेलापूर करांच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले होते या सन्मानपत्राचे लेखन पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे वरिष्ठ पत्रकार व बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कराव खंडागळे, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे निवेदक पत्रकार व वरिष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर गवले यांनी केले होते. ७ वर्षापूर्वी बाबासाहेब पुरंदरे हे भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानतर्फे महनीय कार्याच्या गौरवार्थ प्रस्तीष्ठेचा मानला जाणारा स्व.पंडित मदन गोपालजी व्यास पुरस्कार स्विकारण्यासाठी लोकवंध बाबासाहेब पुरंदरे दि. ०२/०३/२०१५ रोजी नगरला आले असता बेलापूरचे सुपुत्र पंडित रमाकांतजी व्यास यांच्या अहमदनगर च्या निवास्थानी जाऊन
बेलापूरकरांनी बाबासाहेबांची भेट घेतली.सुमारे ३१ वर्षापूर्वी बेलापूरकरांनी दिलेले प्रत बाबासाहेबांनी स्विकारली व सन्मानाची दुर्मिळ प्रत पाहून बाबासाहेब भारावलेग्रामास्थ्यांनी दिलेल्या सन्मानाच्या प्रतीवर स्वाक्षरी करून ही प्रत व्यवस्थित जतन करून ठेव असे विष्णुपंत डावरे यांना सांगताना गहिवरून आले होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्यालयीन प्रमुख शामजी जाजू, पंडित रामाकांतजी व्यास, विष्णुपंत डावरे, रणजीत श्रीगोड, adv. विजयराव साळुंके, सुभाष सीमानी, कंजीशेठ टाक, बाळकृष्ण दायमा, शर्माजी,सोमनाथ टाक, यावेळी आदी उपस्थित होते.
Post a Comment