Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असुन नागरीकाबरोबरच तरुण पिढी तसेच विद्यार्थीही या अवैध धंद्याचे बळी  ठरत आहे        बेलापुर गावात मटका अन गुटखा जोरात सुरु होताच त्यातच आणखी भर पडली ती झटपट लाँटरी बिंगो गेम टायगरा गेम अशा झटपट पैशाचे अमीष दाखविणारे संगणकीय जुगार गावात सुरु झाले असुन शालेय विद्यार्थी या जुगाराचे बळी ठरत आहेत शाळेच्या नावावर पालकाकडून पैसे उकळायचे अन हे गेम खेळत बसायचे असे प्रकार गावात सुरु झाले असुन त्या दुकाना उघडण्या आगोदरच नागरीक शालेय विद्यार्थी दुकानासमोर दुकान उघडण्याची वाट पहात असतात या बाबत गावातील जागृक नागरीकाकडे काही

शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची शहनिशा केली असता त्यात सत्यता आढळून आली आहे त्या नंतर बेलापुर पोलीसांना या बाबत जाब विचारण्यात आला असता त्यांनी कानावर हात ठेवले मात्र वरीष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे सांगीतल्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले असुन हे आवैध धंदे तातडीने बंद करावे अशी मागणी पालकांनी केली आहे या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले आहे


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय(बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने बेलापूरात ५६ वे मोफत मोतीबिंदु शिबीर संपन्न होत असुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. भागवत प्रतिष्ठाण व स्वास्तिक गृपच्या  संयुक्त विद्यमाने तसेच के के बुधराणी हाँस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने दर महीन्याच्या तिसऱ्या बुधवारी मोफत मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे  शिबीराची सुरुवात झाल्यापासुन दर महीन्याला खंड न पडता हे शिबीर भरविले जात असुन आनेक गोरगरीब होतकरु नागरीकांना यां शिबीराचा लाभ मिळाला असल्याचे आयोजक अभिषेक खंडागळे यांनी सांगितले बेलापुर गावात काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी आज बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५६ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी याची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी(RTPCR)रिपोर्ट सोबत आणावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. 


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय(बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने बेलापूरात ५६ वे मोफत मोतीबिंदु शिबीर संपन्न होत असुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे                                        भागवत प्रतिष्ठाण व स्वास्तिक गृपच्या  संयुक्त विद्यमाने तसेच के के बुधराणी हाँस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने दर महीन्याच्या तिसऱ्या बुधवारी मोफत मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे  शिबीराची सुरुवात झाल्यापासुन दर महीन्याला खंड न पडता हे शिबीर भरविले जात असुन आनेक गोरगरीब होतकरु नागरीकांना यां शिबीराचा लाभ मिळाला असल्याचे आयोजक अभिषेक खंडागळे यांनी सांगितले बेलापुर गावात काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी उद्या बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५६ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी याची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी(RTPCR)रिपोर्ट सोबत आणावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बेलापूर - शिव चरित्राचे चालते बोलते व्यासपीठ, संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने इतिहासपर्वतील युगाचा अस्त झाला. शिव पंढरीचा वारकरी शिव चरणी लीन झाला अश्याच शब्दात बेलापूरकरांनी व शिवप्रेमींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.बाबासाहेब पुरंदरे हे १५ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर जिल्हा प्रचारक होते त्यामुळे बाबासाहेबांचे घनिष्ट संबंध असल्याने नगर,बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, संगमनेर अनेक जुन्या कार्यकर्त्यांची खडा ना खडा माहिती होती. त्यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यात ६० वर्षाच्या गत कालीनं आठवणींना पुरंदरे यांनी उजळा दिला होता.३ मार्च १९८४ (रंगपंचमी) रोजीच म्हणजेच सुमारे ३६ वर्षापूर्वी बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी

महाराजांच्या पुतळ्याचे अनावर कार्यासाठी बेलापूरला आले असताना त्यांना बेलापूर करांच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले होते या सन्मानपत्राचे लेखन पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे वरिष्ठ पत्रकार व बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कराव खंडागळे, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे निवेदक पत्रकार व वरिष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर गवले यांनी केले होते. ७ वर्षापूर्वी बाबासाहेब पुरंदरे हे भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानतर्फे महनीय कार्याच्या गौरवार्थ प्रस्तीष्ठेचा मानला जाणारा स्व.पंडित मदन गोपालजी व्यास पुरस्कार स्विकारण्यासाठी लोकवंध बाबासाहेब पुरंदरे दि. ०२/०३/२०१५ रोजी नगरला आले असता बेलापूरचे सुपुत्र पंडित रमाकांतजी व्यास यांच्या अहमदनगर च्या निवास्थानी जाऊन

बेलापूरकरांनी बाबासाहेबांची भेट घेतली.सुमारे ३१ वर्षापूर्वी बेलापूरकरांनी दिलेले प्रत बाबासाहेबांनी स्विकारली व सन्मानाची दुर्मिळ प्रत पाहून बाबासाहेब भारावलेग्रामास्थ्यांनी दिलेल्या सन्मानाच्या प्रतीवर स्वाक्षरी करून ही प्रत व्यवस्थित जतन करून ठेव असे विष्णुपंत डावरे यांना सांगताना गहिवरून आले होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्यालयीन प्रमुख शामजी जाजू, पंडित रामाकांतजी व्यास, विष्णुपंत डावरे, रणजीत श्रीगोड, adv. विजयराव साळुंके, सुभाष सीमानी, कंजीशेठ टाक, बाळकृष्ण दायमा, शर्माजी,सोमनाथ टाक, यावेळी आदी उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सुभाष वाघुंडे यांनी अनाथ मातापित्यासाठी वृध्दाश्रम काढुन त्यांची सेवा सुरु केली असुन त्यांच्या कार्यास समाजाने हातभार लावावा असे अवाहन अशोक कारखान्याचे संचालक आदिनाथ झुरळे यांनी केले   श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमास पत्रकार देविदास देसाई व देसाई परिवाराच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला त्या वेळी झुरळे बोलत होते या वेळी अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे  भाऊसाहेब वाघमारे देविदास देसाई  सौ प्रतिभा देसाई उपस्थित होते या वेळी माहीती देताना वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुंडे यांनी कर्ज काढुन हा वृध्दाश्रम सुरु केल्याचे सांगुन हे समाजकार्य करताना आजपर्यत आलेले अनेक हृदयद्रावक प्रसंग कथन केले त्यामुळे उपस्थित सर्वांनाच गहीवरुन आले या वेळी अशोकचे संचालक व बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनीही सुभाष वाघुंडे यांच्या समाजकार्याचा गौरव करुन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले या वेळी देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे आदिनी मनोगत व्यक्त केले या वृध्दाश्रमात पंधरा वयोवृध्द आजी आजोबा राहत असुन लोकांनी दिलेल्या लोक वर्गणीवरच हा आश्रम सुरुअसल्याचे वाघुंडे यांनी सागुंन उपस्थितांचे आभार मानले.



बेलापूरः(प्रतिनिधी )-येथील पुरातन व  पंचक्रोशीतील प्रसिध्द इंद्रबिल्वेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कनजीशेठ टाक तर सचिवपदी अँड विजयराव साळूंके  यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. इंद्रबिल्वेश्वर मदिरांच्या विश्वस्तमंडळाच्या निवडीसाठी जेष्ठ मार्गदर्शक व समाजसेवक सुवालाल लुंक्कड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती  त्या बैठकीत अध्यक्ष व सचिवासहीत उपाध्यक्ष म्हणून वसंतराव म्हसे,सहसचिव म्हणून ,कांतीलाल मुथा तर खजिनदार म्हणून  केदारनाथ मंञी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ..सदर बैठकीत सर्वश्री शरद नवले,प्रा.हंबीरराव नाईक,अभिषेक खंडागळे ,  रविन्द्र खटोड,रविंद्र कोळपकर,प्रवीण लुक्कड ,गोरख उंडे,सचिन चायल,राहुल दायमा,प्रमोद कर्डीले,महेश गोरे,शेखर चंगेडे,सुभाष देसर्डा,सुभाष सोमाणी ,विशाल वर्मा,राजेश राठी यांची विश्वस्त म्हणून सर्वानुमते निवड करण्यात  आली.तर सर्वश्री सुवालालजी लुक्कड ,रणजीतशेठ श्रीगोड, किशोर नवले,सुभाष राठी यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.   या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी नविन पदाधिकारी व विश्वस्त मंडळाला शुभेच्छा देवुन मंदिराच्या तसेच घाटाच्या सुशोभीकरण व विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.या वेळी जनसेवा पतसंस्था व लोकवर्गणीव्दारे सुमारे चाळीस लाख रुपये रक्कम मंदिराचे जिर्णोध्दार कामी खर्च झाल्याची माहिती सुवालाल लुक्कड यांनी दिली.रणजीत श्रीगोड,रविन्द्र कोळपकर व  प्रमोद कर्डीले यांनी भविष्यातील रुपरेषेबाबत माहिती दिली.मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा लवकरच संपन्न होणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष कंजीशेठ टाक यांनी दिली. अॕड.विजय साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.


बेलापूर (वार्ताहर)- राष्ट्रीय - स्वयंसेवक संघ आणि भाजपचे काम करताना गंगाधर शास्त्री साळुंके यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ प्रचारक असताना त्यांना १९५३ मध्ये दिलेल्या संदेशाचे आयुष्यभर पालन करून नव्या पिढीला एक आदर्श घालुन दिला, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी यांनी काढले.

गंगाधर बद्रीनारायण साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व बेलापूर पोस्ट ऑफिस मार्फत आयोजित आधार कार्ड लिंकिंग आणि मतदार नोंदणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी औटी बोलत होते.ते म्हणाले की, शास्त्री यांचे जवळचे नातेवाईक काँग्रेसतर्फे खासदार, आमदार, मंत्री पदावर असूनही त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही. त्यांच्याकडून संघटनेत शिस्तीत काम करण्याची शिकवण मिळाली. त्यामुळे आम्हा सर्वांना जीवनात यशस्वीपणे काम करता आले. त्यामुळे त्यांचे नेहमी स्मरण होत राहील. त्यांच्या स्मरणार्थ

साळुंके परिवाराने आयोजित केलेल्या या शिबिराचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी पं. महेश व्यास, पं. स. सदस्य अरुण पा. नाईक, उपसरपंच अभिषेक खंडागळे,माजी सरपंच भरत साळुंके,प्रा. ज्ञानेश गवले आदींची भाषणे झाली.

यावेळी सर्वश्री विश्व हिंदू परिषदेचे देविदास चव्हाण, जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समिती संचालक सुधीर नवले जनता आघाडी प्रमुख रवींद्र खटोड, बेलापूर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव साळुंके, भागवतराव साळुंके, अॅड. विजय साळुंके, माजी सरपंच भरत साळुंके, पोलीस पाटील अशोक प्रधान, पोष्ट विभागाचे अधिकारी श्री. कोल्हे, गणेश साळुंके, पं. महेश व्यास,दिलीप काळे, चंद्रशेखर डावरे, प्रभाकर ढवळे, योगेश जाधव, संजय कुलकर्णी, लक्ष्मण शिंदे, नितीन कुलकर्णी, प्रशांत मुंडलीक, महेश कुंभकर्ण, बाळू दायमा, ग्रा.पं. सदस्य मुश्ताक शेखप्रभात कु-हे,साईनाथ शिरसाठ, सुभाष शेलार आदी उपस्थित होते. या शिबिराचा दिडशे नागरिकांनी लाभ घेतला.

प्रास्ताविक अॅड. मयुर साळुंके यांनी केले. तर अॅड. अजिंक्य साळुंके यांनी आभार मानले, सुत्रसंचालन प्रदीप साळुंके यांनी, केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, पुरुषोत्तम साळुंके,प्रताप साळुंके, सोहम साळुंके, संजय साळुंके, ऋषिकेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंके मरिवाराने परिश्रम घेतले.





MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget