Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-अनेक वर्षे कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावलेले मुरकुटे पिता-पुत्र व शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काल उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर दोघांनीही फराळाचा आस्वाद घेतला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या फराळाची ‘गोड’ चर्चा शहरात सुरू झाली आहे.माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यातील राजकीय संघर्ष तालुक्याने जवळून पाहिला आहे. कार्यकर्त्यांनी त्याचा चांगलाच अनुभही घेतला आहे. ससाणे-मुरकुटे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून ससाणे-मुरकुटे यांच्यातील संघर्ष हळूहळू मावळताना पहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे या दोघांनाही बिनविरोध संचालक करण्यात महत्वाची भूमिका बजावून या नव्या मैत्रीची रेशिमगाठ बांधली. ससाणे यांच्या या दिवाळी फराळ कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही हजेरी लावली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समवेत त्यांनीही फराळाचा आस्वाद घेतला. माजी आमदार भानुदास मुरकुटे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या हजेरीची काल दिवसभर शहरात खमंग चर्चा सुरु होती. त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर फिरत होते.




श्रीरामपूर =(वार्ताहार) अलीकडे काही महिन्यापासून बेलापूर गाव व श्रीरामपूर शहरातील शांतता भंग करण्याच्या दुष्ट हेतूने काही समाजकंटक दोन धर्मात जातीय कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी व समंजस नागरिकांमुळे असे प्रकार जागीच रोकले गेल्याने शांतता ,कायदा व सु व्यवस्था आबाधित असून हे टिकविण्याची जबाबदारी प्रशासना बरोबर नागरिकां ची व पत्रकारांची असल्याने आपण हिंदू-मुस्लीम समाजात प्रेम व गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजनकेल्याचे त्यांनी सांगितले बुधवार दिनांक 10 /11 /2021

रोजी दुपारी तीन वाजता रामगड ,तालुका श्रीरामपूर या ठिकाणी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते अध्यक्षपदाची सुचना बेलापूर शाखा कार्याध्यक्ष मुसा भाई सय्यद यांनी मांड लि त्यास अनुमोदन पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद यांनी दिले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसा द यांनी केले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जि प सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक ग्रा प सदस्य मुस्ताक भाई शेख ग्रा प सदस्य आप्पा साहेब नवले बेलापूर पोलीस दूर क्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके बेलापूर येथील डॉक्टर काळे ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे दूरदर्शन प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवले सर पत्रकार देविदास देसाई पत्रकार किशोर कदम पत्रकार दिलीप दायमा पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण ,वैजापूर तालुका अध्यक्ष मोजम भाई शेख ,नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख ,पाटोदा येथील पत्रकार दादाभाऊ मोरे ,पत्रकार मुजम्मिल शेख, पत्रकार शफिक बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सोहेब शेख, बेलापूर चे माजी सरपंच भरत साळुंके ,अशोक राव गवते ,रवी सेठ खटोड ,सामाजिक कार्यकर्ते मोसिन शेख ,उंबरगाव येथील दादाभाऊ काळे, सेवानिवृत्त सी आर पी एफ मेजर मारुतराव पुजारी, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड ,पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ समीना शेख, श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी पुष्पहार देऊन पाहुण्यांचा सत्कार केला आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत आली पुढे म्हणाले महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचा विस्तार महाराष्ट्रभर होत असून पत्रकारांवर होणारे हल्ले व दाखल होणारे खोटे गुन्हे अशावेळी त्या पत्रकारास न्याय मिळून देण्याकरिता पत्रकार संघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून न्याय मिळवून देण्याचे काम सर्वत्र करीत आहे असे त्यांनी सांगितले जि प सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून पत्रकार संघाच्या विधायक कार्याबद्दल प्रशंशा केली पत्रकार संघ पूर्वी अनेक वर्षापासून ईद मिलन चा कार्यक्रम करीत आहे आज फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रकार संघाने एकात्मतेचा संदेश दिला आहे या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांनी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध असल्याचे सांगितले शेख यांनी त्यांचे वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या माध्यमातून एकात्मता अबाधित राखण्याचे काम केले असून तळागाळातील गोरगरीब जनता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहे त्यांच्या या चांगल्या कार्यास आपण प. स. सदस्य या नात्याने शुभेच्छा देतो असे ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, दूरदर्शन प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवले ,पत्रकार देविदास देसाई, पत्रकार रियाज खान पठाण, पत्रकार उस्मान भाई शेख ,पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड ,पत्रकार मन्सूर भाई पठाण आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली कार्यक्रमास पत्रकार संघाचे एजाज भाई सय्यद,  सलीम भाई शेख मुसा भाई सय्यद ,कासम भाई शेख, मोहम्मद अली शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक राव गवते, जमीर हसन यांच्यासमवेत बेलापूर व रामगड येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक राज मोहम्मद शेख यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत पठाणाने करण्यात आली.



बेलापूर:-(प्रतिनिधी  )-संस्कृतच्या अभ्यासिका सौ.विद्या कुलकर्णी व सौ.शितल गुंजाळ यांना राम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. जुने बालाजी मंदिरात हिंद सेवा मंडळाच्या खटोड कन्या विद्यालयातील संस्कृत विषयाच्या शिक्षका सौ.विद्या कुलकर्णी व शा.ज.पाटणी विद्यालयाच्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ.शितल गुंजाळ या महिला शिक्षकांनी संस्कृत भाषेला महत्व देऊन विशेष कार्य करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण केली व विविध

उपक्रमांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला त्यांच्या या कार्याचा स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.त्यांचे या सन्मानाबद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,संस्थेचे पदाधिकारी पुरुषोत्तम मुळे, अशोक उपाध्ये,अनिल देशपांडे, प्राचार्य तागड,प्राचार्य आर.व्ही.कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बेलापूर चे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,पंडित महेशजी व्यास,प्रा.आदिनाथ जोशी,प्रा.ज्ञानेश्वर गवले,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,रमेशचंद्र दायमा,प्राचार्य गोरख बारहाते,दत्तात्रय काशिद यांनी अभिनंदन केले आहे तसेच सौ.कुलकर्णी व सौ.गुंजाळ यांचे शिक्षक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संस्कृत विभागाचे संचालक रवींद्र मुळे यांनी देखील अभिनंदन केले.संस्कृत विषयाला विद्यालयीन अभ्यासक्रमात प्राधान्य दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.



बेलापूर प्रतिनिधी- गंगाधर शास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान बेलापूर बुद्रुक (.....एक सामाजिक उपक्रम) आणि पोस्ट ऑफिस बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत साळुंके बिल्डिंग आझाद मैदान ग्रामपंचायत समोर बेलापूर बुद्रुक येथे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक करणे व आधार कार्ड दुरुस्ती करणे व नवीन मतदार नोंदणी करणे साठी सदर शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने अँड. अजिंक्य साळुंके आणि अँड. मयूर साळुंके यांनी दिली आहे.

या शिबिरा बाबत माहिती देताना अँड. साळुंके म्हणाले की अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी लिंक असणे गरजेचे आहे तसेच अनेक नागरिकांच्या आधार कार्ड मध्ये नाव पत्ता यामध्ये चुका झाल्या असल्याने त्या चुका दुरुस्त होणे गरजेचे आहे यासाठी गंगाधरशास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व पोस्ट ऑफिस बेलापूर बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील शिबिराचे आयोजन केले गेले आहे.

गंगाधर शास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने यापुढेही बेलापूर व परिसरात सामाजिक कामे करण्याच्या मानस अँड. साळुंके यांनी व्यक्त केला आहे.

तरी बेलापूर आणि पंचक्रोशीतील सर्वच आणि जास्त जास्त नागरिकांनी या सदरील कॅम्पचे लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठान तर्फे श्री. पुरुषोत्तम गंगाधर साळुंके, श्री. प्रताप गंगाधर साळुंके, श्री. प्रदीप गंगाधर साळुंके, अँड. मयूर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके,प्रज्वल साळुंके, सोहम साळुंके , संजय साळुंके ,पार्थ साळुंके तसेच सर्व साळुंके परीवारातर्फे करण्यात आलेला आहे.


दि. 10/11/2021 रोजी सकाळी 09.00 ते रात्रीचे 08.00 च्या दरम्यान तेरुगंण गावात राहणारे बाळु भागा चौधरी यांच्या राहत्या घरात अज्ञात आरोपीने घराचा दरवाजा उघडुन त्यांच्या घरातील मातीच्या कोठीत ठेवलेले खालील वर्णनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले होते.

1 ) 22.000/-रुकिंमतीच्या अर्धा अर्धा तोळ्याच्या दोन नथी जु.वा.कि.अं 2) 33.000/- रु. किंमतीच्या दिड तोळा चजनाच्या चार पुतळ्या व एक पान जु.वा.किं.अं

3 )10.000/- रु किंमतीच्या अर्धा किलो वजनाचे चांदीचे एळा जु.वा. कि.अं एकुण-65.000/- रु.कि.त्यानुसार बाळु भागा चौधरी याने दिलेल्या फिर्यादी वरुन राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 189/2021 भा.द.वि. कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हाचा तपास करत असतांना गुप्तबातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदरची घरफोडी मारुती रामा कातडे, वय 25 वर्ष, रा.तेरुगंण ता. अकोले याने केली आहे. त्यानुसार मारुती रामा कातडे यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली असुन वरील वर्णनाचा चोरीस गेलेले 2.5 तोळे सोन्याचे दागिने व 500 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण 65,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल त्याचे कडुन हस्तगतं करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर मा.श्री राहुल मदने उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, नरेद्र साबळे, पोसई, नितीन खैरनार पोहवा/ 2042 भांगरे, पोना/775 देवीदास भडकवाड, पोकॉ/2584 अशोक गाढे, पोकॉ/2492 प्रविण थोरात यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोना / 775 भडकवाड करीत आहेत.


अहमदनगर -15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाचा (टाईड) पहिल्या हप्त्यापोटी 1292.10 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण 80 टक्के ग्रामपंचायत, 10 टक्के पंचायत समिती आणि 10 टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व 1318 ग्रामपंचायतींच्या वाट्याला 60 कोटी 56 लाख 88 हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.हा निधी अकोलेतील 146, संगमनेर तालुका 143, कोपरगाव 75, राहाता 50, श्रीरामपूर 52, राहुरी 83, नेवासा 114, शेवगाव 94, पाथर्डी 107, जामखेड 58, कर्जत 91, श्रीगोंदा 86, पारनेर 114, अहमदनगर 105 अशा एकूण 1318 ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये सन 2020-21 या कालावधीसाठी नगर जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 85 कोटी 39 लाख रुपये आले होते. यात 1 हजार 318 ग्रामपंचायतींना 68 कोटी 31 लाख रुपये, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 8 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी हा निधी देण्यात येतो. यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते.ही रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे. या अनुदानाचे वाटप ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात येणार आहे.पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात 50 - 50 टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे.


श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - औरंगाबाद येथील सरपंच  परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध करत संबधितांवर भा.दं.सं.नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करत गट विकास अधिकारी, तहसिलदार आणि तालुका पोलिस स्टेशन श्रीरामपूर यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे तुकाराम जाधव, रामदास जाधव, रुबाब पटेल, दादासाहेब काळे, रमेश निषेध, निलेश लहारे, हितेश ढुमणे,राजु भालदंड आदींनी तिव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,दिनांक ८


नोव्हेंबर २०२१ रोजी औरंगाबाद याठिकाणी आयोजित सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल बिभत्स व अपमाजनक तथा अवमानकारक शब्द वापरुन संवर्गाचा अवमान केलेला आहे, वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून सदर कामे करताना जनमानसांशी संपर्क व समन्वय ठेऊन अत्यंत सचोटीने व पारदर्शक पध्दतीने असंख्य अडी-अडचणींवर मात करून काम करणारा घटक आहे,असे असतानासुद्धा आमदार महोदयांनी या बाबी विचारात न घेता बेताल वक्तव्य करुन जाणिवपुर्वक जनमानसात ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा मलिन केली आहे,

या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत असून जोपर्यंत आमदार संजय शिरसाठ यांच्यावर शासन दरबारी भा.द.संहितेनुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, ते राज्यातील ग्रामसेवक संवर्गाची जाहिरपणे माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलन करीत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटना डी.एन.ई.१३६ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रमेश निबे, सचिव दादासाहेब काळे, श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष नितेश लहारे, सचिव राजु भालदंड, जि.प.कर्मचारी महासंघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रुबाब पटेल, सचिव हितेश ढुमणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुकाराम जाधव,ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास जाधव यांच्या समवेत तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सर्वश्री ए.ए.विधाटे, डी.एल.डोंगरे, पी.पी.दर्शने, एच.एस.ढुमणे, पी.यु.वाघमारे, आर.ए.भालदंड, व्ही.ई.देसाई,आर.आर.कांदळकर,व्ही.एस.मेहेत्रे, बी.एस.म्हस्के, सी.डी.तुंबारे, आर.एफ.जाधव, टी.के.जाधव, पी.व्ही.ढुमणे, आर.बी.ओहोळ, व्ही.एन.धाकतोडे, श्रीमती. एस.ए. जाधव, श्रीमती,एस.एस.शेटे, एस.डी.उंडे, पी.एन.सोनवणे, आर.व्ही.निबे, आर.आय.पटेल, एन.डी.लहारे,श्रीमती एस.डी. पोळ.समीर मणियार आदींच्या स्वक्षऱ्या आहेत.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget