सचोटीने कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती - उपनगराध्यक्ष करण ससाणे.
बेलापूर बुद्रुक सेवा सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ९३३ सभासदांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी पंधरा किलो साखर, पंधरा टक्के लाभांश आणि मिठाई तसेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनसचे वितरण शुभारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर होते.
यावेळी बोलताना गुजर म्हणाले की,बऱ्याचदा चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याने गैरकारभारामुळे सहकार क्षेत्र बदनाम होताना दिसते.मात्र बेलापूर सोसायटीने सभासदांच्या विश्वासाशी प्रामाणिक राहुन कारभार केल्यामुळे आज संस्था विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे.या क्षेत्रात विश्वास जागवून तो वृद्धिंगत करण्याची गरज आहे.
बाजार समितीचे संचालक व संस्थेचे मार्गदर्शक सुधीर नवले यांनी संस्थेचे कामकाज आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अरूण पा. नाईक यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर पा. खंडागळे, विलास मेहेत्रे, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,आदींनी आपल्या मनोगतातून सुचना केल्या.
