Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी)-समाजाशी एकरूप होवून सामाजिक बांधिलकी ठेवून कोणत्याही क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीचा सत्कार व सन्मान केल्याने काम करणार्‍या व्यक्तीला उर्जा,प्रोत्साहन व पाठबळ मिळाल्याने समाज्याचे अधिकाधिक काम त्यांच्या हातुन घडत असते असे प्रतिपादन कृषी-उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती आण्णासाहेब शिंदे यांनी गळनिंब विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले.अध्यक्षस्थानी प्रवरा सह.बॅंकेचे व्हा.चेअरमन बापूसाहेब वडितके होते. यावेळी पद्मभूषन बाळासाहेब विखे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सदस्य पदी लक्ष्मण रामजी चिंधे यांची तर कामगार तलाठी श्री.वायखिंडे यांची मंडलाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल नवीन कामगार तलाठी म्हणून रूजू झाल्याबद्दल सौ.नाईक मॅडम,वस्तीशाळेच्या उपमुख्यध्यापिका सौ.अंत्रे मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्यामुळे तसेच पंचायत समितीच्या बचत गटाच्या गट प्रमुखपदी सौ.ज्योती कोर्‍हाळे,तसेच कृषी सहाय्यक श्री.पाटील साहेब,दिपक बेलकर,संतोष पारखे,संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्र्ट मुंबई श्रीरामपूर संघटकपदी पत्रकार संदिप शेरमाळे यांची निवड झाल्याने तसेच कुरणपूर विविध कार्य.सेवा संस्थेच्या व्हा.चेअरमन पदी पुंजाहरी चिंधे यांची निवड झाल्याने,विकास तुपे हे फॅशन हेअर कटींग मध्ये उत्तीर्ण झाल्याने यावेळी सत्कार कण्यात आले. यावेळी पुणे विद्यापीठचे मा.सिनेट सदस्य प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर,आण्णासाहेब कडनोर,इंजि.सोहम चिंधे,संजय कुदनर,डाॅ.सुनिल चिंधे,आदींची भाषणे झाली.   यावेळी मुळा प्रवरा वीज संस्थेचे मा.संचालक जिजाबा वडितके, संस्थेचे चेअरमन केशव चिंधे,सोपानराव गवळी,पोपटराव हाळनोर,देवराम बाचकर,कैलास मारकड,विष्णू चिंधे,पंढरीनाथ भोसले,रामदास भोसले,केरूनाना शिंदे,तबाजी जाटे,ग्रा.पं.सदस्य संजय शिंदे,संजय बाहूले,दिपक जाटे,विष्णू कुदनर,आण्णासाहेब वडितके,प्रकाश जाटे,गणेश शिंदे,शिवाजी कोर्‍हाळे,सुरेश पिलगर,संदिप शेंडगे,मुरलिशेठ वधवानी,सागर चिंधे,संदिप कचरे,संस्थेचे सचिव हनुमान चिंधे,आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन संस्थेचे व्हा.चेअरमन बापू वडितके यांनी तर आभार विष्णू चिंधे यांनी मांडले.


अहमदनगर-पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यामध्ये अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठी धडाकेबाज कारवाई केलीय. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा अवैध दारुसाठा उध्वस्त करण्यात आलाय.

एलसीबीचे पो. नि. कटके यांच्या पथकातल्या पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक संदीप पवार, संतोष लोंढे, पो. काँ. जालिंदर माने, कमलेश पाथरुट, राहूल सोळुंके, सागर सुलाने आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. दि. १ आणि २ आक्टोबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पो. नि. कटके यांना अवैध दारुसाठ्याविषयीची माहिती मिळाली होती. या कारवाईत सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये संतोष मधुकर साळवे, अनिल सिताराम विधाटे, पंडा रामभाऊ खांडवे, दत्तात्रय तिकोले, नितीन मारुती साळवे, संभाजी विठ्ठल गव्हाणे या गुन्हेगारांचा समावेश आहे.



अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) शहरातील मुख्य भागामधील कोतवाली पोलीस स्टेशन मधिल रेकॉर्डवरील गुन्हेगार रात्री एक वाजता हत्यारा सह कोतवाली पोलिसांनी अटक केली . दि .०२ / १० / २०२१ रोजी रात्री २३/३० ते दि .०३ / १० / २०२१ रोजी ०१ / ०० वाजे पावेतो कोतवाली पोलीस स्टेशन हाददीमध्ये कोंबीग अॅपरेशन चालु असतांना पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना बातमी मिळाली की अहमदनगर शहरात मार्केट यार्ड भागता महात्मा फुले चौकात एक इसम हा त्याचे हातात तलवार धरून नागरीकांवर दहशत माजविज आहे व तेथील नागरीक घाबरुन गेले आहेत अशी बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी हि पोसई / जी टी इंगळे , पोना / १ ९ ०० विष्णु भागवत , पोना / १४६४ अभय कदम , पोना / ५०० नितीन गाडगे पोकॉ / १५७२ प्रमोद लहारे , पोकॉ / १७ ९ ६ सुमीत गवळी , पोकॉ / १ ९ १ ९ दिपक रोहकले . पोकॉ / सुशील वाघेला अश्याना सांगीतल्याने त्यांनी लागलीच मार्केट यार्ड भागात जावुन सदर इसमास दोन पंचा सह त्याचे हातातील तलवारी सह ताब्यात घेण्यात आले असून त्याचे कडे त्याचे नाव गावा बाबत विचार पुस केली असता त्याने त्याचे नाव दिपक सुरेश बेऱ्हाडे वय २३ वर्ष रा- सारस नगर मार्केट यार्ड त्रिमूर्ती चौक असे असल्याचे सांगीतले त्यास तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवुन येवून त्याचे विरुध्द गुर नं । ७२८ / २०२१ आर्म अॅक्ट ४.२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन व एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे करण्यात आला आहे त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन व एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . ०१ ) गु.र.ना ५८ ९ / २०२० भा द वि कलम ३ ९ २ , कोतवाली पोस्टे . ०२ ) गुर नं १५ ९ ० / २०१ ९ भा द वि कलम ३ ९ २ कोतवाली पोस्टे . ०३ ) गुरनं ५१५/२०१८ भा द वि कलम ३ ९ २,२०१,३४ एम आय डी सी पोस्टे ०४ ) गुरनं ३३६ / २०१ ९ भा द वि कलम ३७ ९ प्रमाणे सदरची कारवाई ही मा . पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो .. अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सो.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे . पुढील कारवाई कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.


श्रीरामपूर ( वार्ताहर ) पञकारीता क्षेञात हल्ली  घुसखोरी वाढली असल्यामुळे  खरी पञकारीता करणाऱ्या पञकारांची अनेकदा कुचंबना होत आहे. तरी देखील  पञकार पञकारीतेचा दर्जा सांभाळण्याचा  प्रामाणिक प्रयत्न  करत असुन त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना बांधील राहील असे प्रतिपादन संपादक व पञकार सेवा सेवा संघ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष किसनराव हासे यांनी केले                             संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या श्रीरामपुर तालुका कार्यकारीणीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या वेळी जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे, राज्य समन्वयक नरेंद्र लचके, जेष्ठ पञकार बद्रीनाथ वढणे,  तालुका कार्याध्यक्ष देविदास देसाई, तालुकाध्यक्ष  संदिप जगताप उपाध्यक्ष चंद्रकांत लांडगे, हरीभाऊ बिडवे आदि प्रमुख उपस्थित होते.    संपादक व पञकार सेवा संघाच्या श्रीरामपुर तालुका कार्यकारीणीची बैठक शासकिय विश्राम गृह येथे काल शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पञकारांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष हासे म्हणाले कि, पञकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी ही एकमेव पञकारांची संघटना राज्यात काम करीत आहे. ग्रामिण पञकारांना न्याय मिळण्यासाठी शासनावर दबाव टाकण्याचे सामर्थ्य केवळ याच संघटनेत आहे.  युट्युब व पीडीएफ पञकारीता बेकायदेशीरपणे सुरु आहे. ही पञकारीता क्षेञासाठी धोक्याची घंटा आहे. प्रामाणिकपणे पञकारीता करणाऱ्या पञकारांची त्यामुळे गळचेपी होत आहे. पञकारीता क्षेञ वाचवायचे असेल तर त्यासाठी या पञकारांवर बंदी घालणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घेतला असुन अशी बेकायदेशीर पञकारीता करणारांना येत्या काळात चाप बसणार आहे. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न केले जाणार आहेत. आपली संघटना ग्रामिण पञकारांना बळ देणारी संघटना आहे. संघटनेतील प्रत्येक पञकार हा वाघासारखा असला पाहीजे.उर्जा, दर्जा व राजा या ञिसुञीवर संघटनेचा पञकार तयार झाल्यास संघटनेतील पञकारांचे भविष्य उज्वल होण्यास वेळ लागणार नाही असे सांगुन ते म्हणाले कि, ग्रामिण पञकारांना संरक्षण, आधिस्विकृती व कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवुन देण्यासाठी मानधन व पेन्शन योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने संघटन अधिक मजबुत करा असा सल्लाही हासे यांनी यावेळी दिला.   यावेळी जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे म्हणाले कि, पञकारीता क्षेञ भरकटत आसताना खऱ्या पञकारांना न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी संघटना राज्यभर काम करीत आहे. जिल्यात प्रत्येक तालुक्यात शाखा सुरु करण्यात येत आहेत. शासनाच्या विविध सवलती ग्रामिण पञकारांना मिळवुन देण्यासाठी राज्य अध्यक्षांचा लढा गेली अकरा वर्षे सुरु आहे. त्यासाठी जिल्ह्यात मजबुत संघटन केले जात आहे. आपल्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आंम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी राज्य समन्वयक नरेंद्र लचके, जेष्ठ पञकार बद्रिनाथ वढणे,  तालुका कार्याध्यक्ष देविदास देसाई यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नुतन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. निवड झालेल्या नुतन पदाधिकार्यांना ओळखपञ देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पञकार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुञसंचलन नरेंद्र लचके यांनी केले तर आभार संदिप जगताप यांनी केले.यावेळी पत्रकार चंद्रकांत लांडगे, बापूसाहेब कोकणे, मोहन जगताप, बापूसाहेब नवले, दिलीप लोखंडे, संदीप जगताप, हरिभाऊ बिडवे, रामेश्वर आरगडे, अशोक रणनवरे, अशोक शेलार, शानवाज सय्यद, शकील शेख, किशोर कदम, सुहास शेलार, दत्तात्रय थोरात, विकास बोर्डे, अमोल बोर्डे, दिलीप तांबे, संदीप शेरमाळे, दिलीप दायमा, देविदास देसाई, बद्रीनारायण वढणे, जयेश सावंत, राजेश बोरुडे, राजेंद्र देसाई उपस्थित होते.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पहिलेच नागरीक कोरोना महामारीने  त्रस्त झालेले आहेत त्यावर शहरातील  अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई आणि साथीच्या आजाराची साथीचा फैलाऊ होऊ शकतो, श्रीरामपूर नगर पालिकेच्या मार्फत घन-कचरा ठेकेदारास दर महिन्याला तब्बल ३० लाख रुपये मोजले जातात, मात्र शहरातील अस्वच्छता जशीच्या तशीच आहे,मग इतकी मोठी रक्कम मोजूनही जर कोणताच काम होत नसेल तर नगर पालिकेने हा ठेका रद्द करुन इतर दुसऱ्यास द्यावा, जेणे करुन शहरातील स्वच्छतेने नागरीकांचे आरोग्य आबाधित राहील,मात्र नगर पालिका प्रशासनासह संबंधित काही नगरसेवक आणि विद्यमान नगराध्यक्षांना केवळ ठेकेदार पोसण्याचे कामे करुन जनतेच्या करापोटी वसूल करण्यात

आलेली रक्कम ठेकेदारांच्या घशात टाकायची असल्याचे दिसून येत आहे,मग यामध्ये संबंधित अधिकारी यांचा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा  संशय देखील बळावत आहे. शहरवासियांच्या ज्वलंत सामाजिक आरोग्याप्रश्नी तथा संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी  समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा जे जे फौंडेशनचे जोएफ जमादार हे आपल्या कार्यकर्त्यांसह नगर पालिके समोर आमरण उपोषणास बसलेले आहेत,उपोषणाचा आज तीसरा दिवस असताना संबंधित नगर सेवक, नगराध्यक्षा आणि नगर पालिका प्रशासन कोणतीच ठोस भुमिका घेण्यासाठी पुढे धजावलेले नाहीत, याचाच अर्थ असा होतो की शहरातील नागरीकांच्या सामाजिक आरोग्याप्रश्नी त्यांना काही एक घेणे-देणे राहिले नाही,त्यांना केवळ ठेकेदार पोसण्यात स्वारस्य आहे, शहरातील अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई पसरुन जरी नागरीक आजारी पडले तरी आपण मात्र सुरक्षित आहोत असा त्यांचा भास असावा,मात्र शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगर पालिका प्रशासन आणि काही संधी साधू पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत शहरातील जागरुक नागरीक आवश्य त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी उपोषणकर्ते जोयफ जमादार यांनी सांगितले आहे,

आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री जी यांच्या जयंतीनिमित्त उपोषण स्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले तथा उपोषणकर्त्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आर्पण करत देशभक्तीपर गिते देखील मंद आवाजात वाजविण्यात आल्याने आतातरी झोपी गेलेल्या नगरपालिका प्रशासनास जाग येऊन संबंधित नागरी समस्याप्रकरणी ते तात्काळ उचित निर्णय घेतील असे शहरवासियांना वाटू लागले आहे.

या उपोषणास आमदार लहू कनडे, उपनगराध्यक्ष, करण ससाणे, कामगार नेते नागेशभाई सावंत, केतन खोरे,सचिन गुजर,ज्ञानेश्वर मुरकुटे, कॉंगेस शहराध्यक्ष संजय छल्लारे,मुन्ना पठान, रितेश ऐडके हनीफ पठान, विठ्ठल गोराणे,फिरोज पठान, चरन त्रिभुवन, शिवा साठे, फैय्याज बागवान, सागर दुपाटी, नगरसेवक रवि गुलाटी, नाजिर पिंजारी,प्रभाकर,जाकिर शाह, रईस शेख,कॉंगेस पक्ष,आम आदमी पार्टी,भारतीय लहुजी सेना,प्रहार जनशक्ति,R P I,भिम गर्जना सामाजिक संघटना,वंचित बहुजन आघाडी, मुसलिम ओबीसी, ऑर्गनाइजेशन,आदींनी आपला पाठिंबा दर्शविला असुन जमादार यांच्यासोबत,आसिफ तांबोळी, अय्युब पठान,ज़करिया सैय्यद, अरबाज़ कुरैशी,अमन शेख, साद पठान, शाहिद शेख, फैज़ान काज़ी, तौफीक शेख,अतीक पठान,उपोषणास बसलेले आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकुण १२ गावे येत असुन या १२ गावात आत्तापर्यत २११५७ नागरीकांना कोवीड लसीकरण करण्यात आले असल्याची माहीती आरोग्याधिकारी डाँक्टर देविदास चोखर यांनी दिली आहे                                          लसीकरणा बाबत माहीती देताना डाँक्टर देविदास चोखर यांनी सांगितले की सुरुवातीला कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण केले जात होते लसीकरणा दरम्यान गोंधळ होवु नये म्हणून टोकन पध्दत सुरु केली बेलापुर गावात सुरु झालेली टोकन पध्दत नंतर  जिल्ह्यात सुरु झाली टोकण पध्दतीमुळे आपापसात होणारी वादावादी कमी झाली सुरुवातीला लस घेण्याकरीता नागरीकात भितीचे वातावरण होते लसीकरण केल्यावर त्रास होतो या गैरसमजामुळे नागरीक लस घेत नव्हते परंतु हा गैरसमज दुर झाल्यावर नागरीक स्वेच्छेने लसीकरण केंद्रावर येवु लागले बेलापुर केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावोगाव जावुन लसीकरण करण्यास सुरुवात केली या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला नंतर वाडौया वस्त्यावर जावुन लसीकरण सुरु केले जे नागरीक वयोवृध्द आहेत बेडवर आहेत अशा नागरीकांना घरी जावुन लसीकरण दिले जात आहे हेल्थ वर्कर यांना पहीला डोस ९२ नागरीकांना तर दुसरिरा डोस ६३ नागरीकांना देण्यात आलाफ्रंट लाईन वर्कर यांना पहीला डोस ११९३ नागरीकांना दिला तर दुसरा डोस १०१८नागरीकांना दिला  १८ ते ४४ दरम्यानच्या नागरीकांना पहीला डोस ८८७४ नागरीकांना देण्यात आला तर दुसरा डोस ४४४नागरीकांना देण्यात आला ४५ ते ६० वयोगटातील नागरीकांना पहीला डोस ४५२२ नागरीकांना देण्यात आला तर दुसरा डोस २०३३नागरीकांना देण्यात आला ६० वर्षावरील नागरीकासाठी पहीला डोस ३०७९ नागरीकांना दिला तर दुसरा डोस १७०९ नागरीकांना असे एकुण २११५७ नागरीकांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे या कामाकरीता दोन वैद्यकीय अधिकारी पाच समुदाय अधिकारी सहा आरोग्य सेवीका तीन आरोग्या सेवक दोन सुपरवायजर दोन आशा सुपरवायजर व तीस आशा वर्कर या सर्वाच्या योगदानामुळे लसीकरण सुरळीत पारा पडत आहे या कामी जि प सदस्य शरद नवले पं स सदस्य अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड बाजार समितीचे संचालक सुधीर नवले तसेच गावातील पत्रकार यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले अशी माहीती बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डाँक्टर चोखर यांनी दिली आहे.


बेलापुर (प्रतिनिधी  )-अहमदनगर उत्तर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगांव, सोनई परिसरामध्ये रात्रीचेवेळी शेतातील वस्तीवर दरोडे टाकून मारहाण करुन लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडण्यात गुन्हे अन्वेषन शाखा अहमदनगर व श्रीरामपुर शहर पोलीसांना यश आले असुन ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या गुन्हेगाराकडून अनेक गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे  आरोपीकडून २८लाखाचा मुद्देमाल जप्त.या बाबतची पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की, दि. २३सा संप्टेंबर/२०२१ रोजी रात्री  विराज उदय खंडागळे, वय-३८ वर्षे,धंदा- शेती, रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर हे आपल्या कुटूंबासह शेतातील बंगल्यामध्ये झोपलेले असताना अनोळखी चारचोरट्यांनी त्यांचे बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करुन लहान मुलाचे गळ्यास धारदार चाकू लावून वघरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देवून घरातील सोने चांदीचे दागिणे तसेच रोख रक्कम असा एकूण २,८२,०००/-रु.किं. चा ऐवज तसेच फिर्यादी यांचे जवळच राहणारे साक्षीदार सोमनाथ भागीरथ चिंतामणी यांचे घराचा दरवाजा तोडून त्यांनामारण्याची धमकी देवून त्यांचे घरातील २५,०००/-रु. रोख रक्कम असा एकूण ३,०७,०००/-रु. किं. चा ऐवज दरोडा टाकूनचोरुन नेला होता. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पो.स्टे. येथे गुरनं. १६६९/२०२१, भादवि कलम ३९४, ४५८, ३४ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापुर्वीही श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव यापरिसरामध्ये अशा प्रकारचेदरोड्याचे गुन्हे घडलेले असल्याने मा. पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचे आदेशाने श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हेउघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, वरील नमुद गुन्हा हासलाबतपूर, ता. नेवासा येथील सराईत गुन्हेगार सचिन भोसले व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून सचिन भोसले व त्याचा साथीदार अजय मांडवे हे चोरलेले सोन्याचे दागिण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कारमधून आलेलेआहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच श्रीरामपूर शहरपो.स्टे. चे अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने सलाबतपूर येथे जावून मिळालेल्या माहितीचेआधारे आरोपींचा शोध घेत असताना सलाबतपूर ते प्रवरा संगम जाणाऱ्या  रोडवर डॉ. योगेश वरगंटवार यांचे गोठ्याचे आडोशाला एका पांढरे रंगाचे कारजवळ दोन इसम संशईतरित्या उभे असलेले दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पोलीस पथक त्यांचे दिशेने जात असतानाच त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने त्यातील एक इसम बाजूस असलेल्याउसाचे शेतामध्ये पळून गेला, त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दुसऱ्या इसमास कारसह जागीच ताब्यात घेवूनत्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांस त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, अजय अशोकमांडवे, वय- २२ वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेवून वरील नमुद गुन्ह्याबाबतव गुन्ह्यातील चोरलेल्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे लागल्याने दोन पंचासमक्ष त्याचेकारची झडती घेतली असता त्याचे कारमधून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे तसेच १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे त्यामध्ये राणीहार, गंठण, मणीमंगळसुत्र, कानातील मुंबर, अंगठ्या, चैन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ तसेच चांदीचे पायातील पैजण असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिणे तसेच स्विफ्ट कार व मोबाईल मिळून आल्याने ते पंचासमक्षजप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेल्या दागिण्याबाबत ताब्यात घेतलेला आरोपी अजय अशोक मांडवे याचेकडे कसून चौकशी केलीअसता त्याने सदरचे दागिणे हे त्याने व त्याचे साथीदार सचिन भोसले, प्रद्युम भोसले, डिच्चन भोसले, बयंग काळे, असिफ शेख, सर्व रा. सलाबतपुर, ता. नेवासा, बाबाखान भोसले, कृष्णा भोसले, रा. गोंडेगाव, ता. नेवासा, रुकुल चव्हाण, रा. शिरुर,ता. जि. पुणे, समीर उर्फ चिंग्या सय्यद, रा. मुकीदपुर, ता. नेवासा, रामसिंग भोसले, रा, गेवराई, ता. नेवासा, योगेश युवराजकाळे, रा. बिटकेवाडी, ता. कर्जत अशांनी मिळून मागील ५ ते ६ महीन्याचे कालावधीमध्ये निपाणी वडगाव, बेलापुर,बोंबलेनगर, खोकर, ता. श्रीरामपुर, शिर्डी, चांदा, सोनई, तरवळे वस्ती, हिवरे, ता. नेवासा, निमगाव, ता. शेवगाव, भिंगार अशावेगवेगळ्या ठिकाणाहून रात्रीचे वेळेस घराचे दरवाजे तोडून घरतील लोकांना मारहाण करुन चो-या करुन चोरुन आणलेअसल्याचे सांगीतल्याने आरोपीने दिलेल्या माहितीचे आधारे साथीदार आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे  प्रद्युम सुरेशभोसले, वय- १९ वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, समीर उर्फ चिंग्या राजु सय्यद, वय-२१ वर्षे, रा. मराठी शाळेजवळ,नेवासा फाटा, ता. नेवासा, रामसिंग त्रिंबक भोसले, वय-३० वर्षे, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, बाळासाहेब ऊर्फवयंग सुदमल काळे, वय-३४ वर्षे, रा. गेवराई, ता. नेवासा, योगेश युवराज काळे, वय- १९ वर्षे, रा. बिटकेवाडी, ता.कर्जत यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.नमुद ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे,स्विफ्ट कार, ७ मोबाईल व दोन मोटार सायकली असा एकूण २७,९२,५००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेलाआहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे सहा साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.गुन्हे उघडकीस आलेले आहेत.







MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget