Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांना बढती मिळाली असून त्यांची नियुक्ती नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिक्षक पदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलेले आहे.तसेच नगर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांची सोलापूर शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तर नगर शहर उपविभागाचे विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाली आहे.तर पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक यांची नगर पोलीस मुख्यालयात उपअधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील 17 वर्षीय युवकाने शेवगाव पोलिसांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अदित्य भोंगळे याला शेवगाव पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या व गावठी कट्टा खरेदी विक्री प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. नंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. मंगळवारी रात्री त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणला होता. दरम्यान, मयत अदित्यची आई संगीता भोंगळे यांनी सांगितले की, माझ्या मुलाला पैशासाठी पोलीस त्रास देत होते. त्यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली. मी बचत गटाचे पैसे काढून 47 हजार रुपये पोलिसांना दिले. राहिलेले तीन हजार रुपये पोलिसांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर फोन पे व्दारे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेनंतर शेवगाव शहरातील आंबेडकरी चळवळीचे नेते, कार्यकर्ते यांनी दुपारी चार वाजता अदित्य भोंगळे याचा मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यात आणला. दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल न झाल्यास त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे घटनास्थळी आले आणि मयत अदित्यच्या आईचा इन कॅमेरा जबाव घेऊन दोषी पोलीसांवर ठोस कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यावर मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविण्यात आला.यावेळी पवन कुमार साळवे, शिवसेना तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती अ‍ॅड. आविनाश मगरे, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, माजी सभापती प्रकाश भोसले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष विजय बोरुडे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल इंगळे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊराव भोंगळे, अनिल कांबळे, वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, शेवगावचे माजी सरपंच राहुल मगरे, नगरसेवक प्रविण भारस्कर, अनिल बोरूडे, संतोष बानायत, भगवान मिसाळ, कडू मगर, राजू मगर, अरुण भोगळे, रोहीदास भोंगळे, संतोष पटवेकर आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली प्रवरा येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 

आरोपी. क्र.)1)मंगल गोरक्षनाथ गायकवाड रा. देवळाली प्रवरा

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1400/- रू किमतीची 14 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. कचरू राजेंद्र गायकवाड 

35,000/-  रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2500/- रू  किमतीची 25  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3. रमेश गायकवाड

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

1700/- रू  किमतीची 17  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4. रवि डुकरे 

24,500/-  रु. कि.चे 350 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 5.  अजय जाधव

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू  किमतीची 15  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,10,600/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे  देवळाली प्रवरा परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे देवळाली प्रवरा येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, P.N  पंकज गोसावी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, राहुल नरवडे, सुनील दिघे गौतम लगड, Lpc. पूजा पवार, अनिता गीते आदींनी केली.


श्रीरामपूर (प्रतिनिधी )-महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या नासिक जिल्हा कार्याध्यक्षपदी रंगरेज तर मालेगाव शहर उपाध्यक्ष पदी शाहिद शेख यांची निवड पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत नासिक जिल्हा कार्याध्यक्षपदी असलम रंगरेज यांची निवड करण्यात आली असून मालेगाव शहर उपाध्यक्ष पदी शाहिद शेख यांची निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली यांच्या हस्ते देण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत आली हे होते सूत्रसंचालन पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष कासम शेख यांनी केले या बैठकीस पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद ,नाशिक जिल्ह्याचे सचिव वाहाब खान पठाण, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष, सुभाष राव गायकवाड, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष ,कासम शेख,बेलापूर शहर प्रमुख ,एजाज सय्यद ,सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा आधी उपस्थित होते .यावेळी शेख बरकत आली ,कासम शेख ,सुभाष राव गायकवाड,वाहाब खान,एजाज सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख यांनी सांगितले की पत्रकार संघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील विस्तार वाढविणे करिता आपण या ठिकाणी नाशिक व मालेगाव येथील व्यक्तींची निवड करून त्यांच्यावर पत्रकार संघाची जबाबदारी व पुढील पत्रकार संघाचा विस्तार सोपविला आहे या बैठकीत काँग्रेस कमिटीच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रियाज खान पठाण यांचा तर पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सुभाष राव गायकवाड यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. बैठकीस इतर पत्रकार उपस्थित होते .आभार प्रदर्शन वाहब खान यांनी केले.

येवला.  :-    नाशिक जिल्हा विशेष.  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी विविध प्रश्नांवर लढा उभारून न्याय मिळून देण्यासाठी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा उभारण्यासाठी    गाव वॉर्ड तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता.   सदस्य नोंदणीचा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहेत.. सर्वधर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मता समाज भाईचारा जोडो अभियान.... मानवतेचा  विकास मानवता एकात्म ते चा संदेश देण्यासाठी.. सर्वसामान्य कष्टकरी. सर्व सामान्य शेतकरी शेतमजुरांच्या न्याय व हक्काच्या   हक्कासाठी  आयोजित. एका जाहीर बैठकीं च्या   कार्यक्रमाप्रसंगी   सामान्य जनतेचा बुलंद आवाज     महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष  जनसेवक.  समाज रक्षक समाज रत्न आदर्श युवा समाज भूषण पुरस्कार विजेते मा. श्री.शेरू भाई सादिक भाई मोमीन यांनी बोलताना यावेळी नमूद केले आहे    यावेळी.   कौमे खिदमत सोशल फाउंडेशन.   यांच्या वतीने.  शेरूभाई. मोमीन यांचा.  मान्यवरा च्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ह. भ. प. भाष्कर महाराज दराडे शाम राव पवार तात्यासाहेब गिडगे पाटील    सोमनाथ काका रोकडे अविनाश गिरीगोसावी समीर भाई सय्यद रमजान शेख   युनूस बाबा शेख.   सुलतान बाबा शेख.  मुक्तार बाबा देशमुख.   परवेझ अहमद शेख.अर्बाज कुरेशी हुसेन भाई कुरेशी  मोबीन  खान मुलतानी एकबाल अन्सारी   जमील भाई पटेल दादाभाई तांबोळी असलम मनियार रईस शेख कयूम भाई शेख इब्राहीम चाचा आत्तार    सिद्धीक अन्सारी आदम मोमीन आश्रफ मोमीन अल्ताफ पठाण गोकुळभाई पवार   अकील शेख सुफी मो. हनीफ बाबा शेख अकील मुकादम.ज्ञानेश्वर जोगदंड.  ज्ञानेश्वर. उगले  संजय संत अहमद खान संतोष गायकवाड संदीप पगारे आकाश उबाळे सचिन साबळे बापूसाहेब रोठे सुरेश दादा कटके योगेश कटके अंबादास कटके दिनकर कटके गुलाब कमोदकर नवनाथ कमोदकर अकबर अन्सारी  अ. हमीद बाबा अन्सारी फैसल खान यावेळी प्रास्ताविक सय्यद लियाकत अली यांनी केले  व आभार प्रदर्शन पाशु भाई पटेल यांनी केले  यांच्यासह कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

श्रीरामपुर : जगभरात कोरोनाचे संकट ओढविल्याने, मागील २ वर्षांपासून कोणतेही धार्मिक सण उत्सव, जनतेला साजरा करता आले नाहीत. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे, शासनाने अनेक निर्बंध सैल केल्याने, यंदाच्या वर्षी विविध सण उत्सव, आता शासन नियमांच्या आधीन राहून साजरी करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव आला असून. येत्या ३ दिवसांनी गणेशोत्सवास सुरवात होणार आहे,मात्र दुसरीकडे कोरोनाची तिसरी लाट देखील डोके वर काढत असल्याने, प्रशासनासमोर या तिसऱ्या लाटेचा सामना करायचं मोठं आवाहन देखील उभे आहे. या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी यंदाचा गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, तसेच नागरिकांनी कोण कोणत्या नियमांचे पालन करावे यासंदर्भात चर्चा करण्यात आली, यावेळी उपस्थित गणेश भक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी तसेच उपस्थित नागरिक व आधिका-यांना, योग्य त्या सूचना देण्यात आल्या, ज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन, आलेल्या भक्तांना सॅनिटायझर तसेच शारिरीक अंतर राखणे बंधनकारक राहणार असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेण्याच्या सूचना देत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना जनजागृती संदर्भात सामाजिक उपक्रम घ्यावेत अशी सूचना , पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या. यावेळी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे,तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आदींसह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


येवला   नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी  :- पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला नगरपालिका हद्दीतील देवी खुंट नागड दरवाजा रोड येथे देवी मंदिर तर हजरत सैय्यद बाबा दर्गाह चौक   मौलाना आझाद रोड , नागड दरवाजा पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक सर्वश्री निसार शेख, मुश्ताक शेख, अमजद शेख, मलिक शेख, रईसा बानो शेख, तहेसिन बानो शेख,  राजेंद्र लोणारी, दिपक लोणारी,  मोहन शेलार,   राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, ज्येष्ठ नेते अरुण थोरात,  प्रांताधिकारी सोपान कासार, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे,  सचिन कळमकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला व.  स्वागत करण्यात आले उपस्थित होते.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget