येवला उपजिल्हा रूग्णालयात मिळतील उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा;कोरोनामुळे थांबलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार: पालकमंत्री छगन भुजबळ.
येवला नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला नगरपालिका हद्दीतील देवी खुंट नागड दरवाजा रोड येथे देवी मंदिर तर हजरत सैय्यद बाबा दर्गाह चौक मौलाना आझाद रोड , नागड दरवाजा पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक सर्वश्री निसार शेख, मुश्ताक शेख, अमजद शेख, मलिक शेख, रईसा बानो शेख, तहेसिन बानो शेख, राजेंद्र लोणारी, दिपक लोणारी, मोहन शेलार, राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, प्रांताधिकारी सोपान कासार, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे, सचिन कळमकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला व. स्वागत करण्यात आले उपस्थित होते.
Post a Comment