श्रीरामपुर : जगभरात कोरोनाचे संकट ओढविल्याने, मागील २ वर्षांपासून कोणतेही धार्मिक सण उत्सव, जनतेला साजरा करता आले नाहीत. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे, शासनाने अनेक निर्बंध सैल केल्याने, यंदाच्या वर्षी विविध सण उत्सव, आता शासन नियमांच्या आधीन राहून साजरी करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव आला असून. येत्या ३ दिवसांनी गणेशोत्सवास सुरवात होणार आहे,मात्र दुसरीकडे कोरोनाची तिसरी लाट देखील डोके वर काढत असल्याने, प्रशासनासमोर या तिसऱ्या लाटेचा सामना करायचं मोठं आवाहन देखील उभे आहे. या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी यंदाचा गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, तसेच नागरिकांनी कोण कोणत्या नियमांचे पालन करावे यासंदर्भात चर्चा करण्यात आली, यावेळी उपस्थित गणेश भक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी तसेच उपस्थित नागरिक व आधिका-यांना, योग्य त्या सूचना देण्यात आल्या, ज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन, आलेल्या भक्तांना सॅनिटायझर तसेच शारिरीक अंतर राखणे बंधनकारक राहणार असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेण्याच्या सूचना देत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना जनजागृती संदर्भात सामाजिक उपक्रम घ्यावेत अशी सूचना , पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या. यावेळी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे,तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आदींसह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Post a Comment