स्वाती भोर 'श्रीरामपूर’च्या नव्या अपर पोलीस अधीक्षक,डॉ. दिपाली काळे व नगर शहरातील दोन पोलीस उपअधीक्षकांची बदली.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांना बढती मिळाली असून त्यांची नियुक्ती नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिक्षक पदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलेले आहे.तसेच नगर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांची सोलापूर शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तर नगर शहर उपविभागाचे विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाली आहे.तर पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक यांची नगर पोलीस मुख्यालयात उपअधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Post a Comment