बेलापुर बु !! ग्रामपंचायतीच्या काळातील विद्युत कामातील गैरव्यवहार भोवला ? जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता निलंबीत.

बेलापूर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायतीने १४ वा वित्त आयोग व दलीत वस्ती योजनेच्या निधीतून केलेल्या कामात ४० लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता बी. बी. चौधर यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केलीआहे.बेलापूर बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने २०१५ ते २०२० या काळात १४ वा वित्त आयोग,दलित वस्ती सुधार योजना आदी योजनांच्या निधी मधून लाईटची कामे केली होती. याकामांवर अंदाजे ४० लाख रुपये एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात आली होती. सदरील कामात भ्रष्टाचार झालेला असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती.तसेच जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडी सभेत हा विषय मांडून याबाबत चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला होता.या अनुषंगाने शासकीय तंत्रनिकेतन,अहमदनगर यांच्या वतीने तांत्रिक तपासणी व चौकशी करण्यात आली.चौकशी अधिकाऱ्यांनी बेलापूर गावास भेट देऊन समक्ष पाहणी करत चौकशी केली.या चौकशीत झालेले काम व नमूद केलेले काम यांत मोठी तफावत आढळून आली.तसेच मोजमाप पुस्तकात नोंदणी केलेली बल्ब,वापरलेले पोल यात मोठी तफावत आढळली.या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.तसेच श्री.चौधर यांनी कामाचे अंदाजपत्रके,मोजमाप पुस्तिका व इतर कागदपत्रे तपासणी कामी हजर केली नाहीत.यावरून या कामात गैरव्यवहार झालेला दिसत असल्याने श्री.चौधर यांच्यावर  जिल्हा परिषद सेवा(शिस्त व अपील)च्या तरतुदीनुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली असून याबाबतचे आदेश जिल्हा परिषद संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत.यामुळे गावात खळबळ झाली असून सन २०१५ ते सन २०२१ याकाळात लाईटच्या कामात मोठा  गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याची चर्चा आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget