Latest Post

येवला   नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी  :- पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला नगरपालिका हद्दीतील देवी खुंट नागड दरवाजा रोड येथे देवी मंदिर तर हजरत सैय्यद बाबा दर्गाह चौक   मौलाना आझाद रोड , नागड दरवाजा पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक सर्वश्री निसार शेख, मुश्ताक शेख, अमजद शेख, मलिक शेख, रईसा बानो शेख, तहेसिन बानो शेख,  राजेंद्र लोणारी, दिपक लोणारी,  मोहन शेलार,   राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, ज्येष्ठ नेते अरुण थोरात,  प्रांताधिकारी सोपान कासार, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे,  सचिन कळमकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला व.  स्वागत करण्यात आले उपस्थित होते.



श्रीरामपूर(प्रतिनिधी)-शहरातून मोठया प्रमाणात गो मास पकडल्यानंतर पोलिसांनी हजारो गोवनशीय जनावरांची कातडी जप्त केली. त्यामुळे श्रीरामपूर शहरात अवैधरित्या तसेच चोरून गोवंशीय जनावरांची कत्तल तसेच गो मास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.शहरातील वार्ड नंबर २ परीसरात असलेल्या, अहिल्यादेवी नगर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कातडी असल्या संदर्भात, पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या आदेशावरून, शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील,पोलीस नाईक अमोल जाधव ,सचिन बैसाने,पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, राहुल गायकवाड, तपास पथकाचे राहुल नरवडे, किशोर जाधव,गौतम लगड आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी दिपक धोंडीराम नरवडे यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या घराबाहेर, एम एच १५ सी के ८०१० क्रमांकाच्या एशीअर टेम्पोत, गोवंशीय जनावरांची कातडी भरतांना पोलिसांनी पकडकी, सदरची कातडी अहमदनगरयेथील एका व्यापाऱ्याच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला त्याठिकाणी, अंदाजे ३ ते ४ हजार गोवंशीय जनावरांची कातडी ताब्यात घेण्यात आली आहेत. या गोवंशीय जनावरांची कातडी लाखो रुपयांची असून, ही कातडी आली कुठून,? श्रीरामपूरात या गोवंशीय जनावरांची कत्तल झाली तर नाही ना, असे अनेक प्रश्न पोलिसांच्या या कारवाईमुळे निर्माण झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाल्याने, उशिरा पर्यंत ,गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शहर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी:  गेल्या अनेक दिवसापासून माजी सैनिक व स्थानिक सामाजिक संघटना मध्ये तात्विक वाद झाला होता तो मिटवण्यासाठी अनेक वेळा त्रिदल ने प्रयास केला. यासाठी श्रीरामपूर तालुका आमदार लहुजी कानडे यांना देखील निवेदन सादर करून तक्रार केली होती व श्रीरामपूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली होती परंतु काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा जैसे थे झाले आणि प्रकरण जास्त. जातीवादाची वळण घेऊ लागले या सर्व घटनेची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मेजर संदीप भाऊ लगड यांना कळविण्यात आले. त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून समाजास पणे वाद मिटून घ्या नाहीतर आम्ही आमच्या स्टाईल ने वाद मिटवू अशी सूचना दिली. त्यानंतर कोर कमिटी अध्यक्ष मेजर अशोक चौधरी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता मेजर आठरे एस के ,  नगर उत्तर चे अध्यक्ष मेजर शरद चव्हाण , नगर उत्तर चे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार , श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप , सैनिक सेवा संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अनिल लगड , उपाध्यक्ष मेजर संग्राम यादव , महिला अध्यक्ष छायाताई मोठे , अकोला तालुका अध्यक्ष मेजर सचिन नवले , मेजर बाळासाहेब बनकर ,  मेजर भागीरथ काका , मेजर राजू तोरणे , मेजर अजय तोरणे , तसेच सर्व महिला भगिनी , वीरमाता, वीरपत्नी ,वीर नारी, व तालुक्यातील तमाम  माजी सैनिक , यांच्या सहकार्याने व  सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संदीप मगर , त्रिदल सैनिक सेवा संघ तालुकाध्यक्ष अनिल लगड , यांच्या दोघांकडून लेखी व मोबाईलवर बाईट देऊन सामान्यपणे वाद मिटवला . त्यासाठी जिल्ह्यातून विविध जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे प्रसिद्धी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. यापुढे भविष्यात माजी सैनिकाचा अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी अशी सूचना दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.



राहुरी(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगीरी कारभारामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावर जिवघेणे खड्डे झाले असून राज्य महामार्गावर मृत्यूचा सापळा बनलाय. प्रशासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले. 

         गेल्या काही महिन्यांपासून नगर मनमाड राज्य महामार्गावर तसेच राहुरी तालूका हद्दीत मोठ मोठी खड्डे पडली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगीरी कारभारामुळे राज्य महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठ मोठी खड्डे होत आहेत. त्या खड्ड्यामुळे अपघात होऊन आज पर्यंत हजारो जण मयत झाले तर तेवढ्याच संख्येने अपंग झाले आहेत. मात्र राहुरी येथील गेंड्याच्या कातडीचे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर बॅलेनटाईन चर्च समोर असाच एक मोठा जिवघेणा खड्डा पडलाय. त्या खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. याची दखल घेत दिनांक ५ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले. सुमारे तीन तास त्यांनी खड्ड्यात उभे राहून ये जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्या पासून सावधान करत मार्ग दाखवीला. 

       सदर खड्ड्यामुळे मोठी जिवीतहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? प्रशासन कोणाचा अपघात होऊन मरणाची वाट पहात आहे का? असा सवाल गणेश पवार यांनी केलाय. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-सुजाण पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर असुन देशाच्या उभारणीत जडण घडणीत शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे असे मत प्रभारी प्राचार्या डाँ.गुंफा कोकाटे यांनी व्यक्त केले          बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापुर येथे  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती  व शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्या वेळी बोलताना डाँ.कोकाटे पुढे म्हणाल्या की तिरत्तनी सारख्या छोट्या खेड्यातील सर्वपल्ली भारताचे राष्ट्रपती होतात तर त्यांचा आदर्श ठेवून आपण प्रत्येकाने महामानवांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे.त्यांनी लिहलेली ग्रंथसंपदा वाचून चार भिंतीच्या बाहेरची शाळा ख-या अर्थाने शिकली पाहिजे.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.तसेच एक वेगळा उपक्रम म्हणून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना राखी बांधून शिक्षक दिन साजरा केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रा. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.विचारमंचावर कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर , डॉ.नवाळे, डॉ ‌बाचकर ,प्रा.गायकवाड,प्रा.शेख उपस्थित होते.अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांनी भुषविले .कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख सतिश पावसे यांनी केले. डॉ.अशोक माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अहमदनगर (प्रतिनिधी )-अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नगर तालुक्यातल्या अरणगाव शिवारात हिरा गुटखा, तंबाखू आणि दोन टेम्पोसह पंधरा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.याप्रकरणी शेख नासिर अहमद चाँदमियाँ, (वय- 44 वर्षे, रा. गाडेकर गल्ली, भिंगार, टेम्पो नं. एमएच-16-सीसी-4920 वरील चालक, 2) शेख अय्याज नसीर, (वय-39 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख, (वय-34 वर्षे, रा. नागरदेवळे, ता. नगर), सय्यद असीफ महेमूद, (वय- 42 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार), सादीक खान इमाम पठाण, (वय- 48 वर्षे, रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा, ता. नेवासा), शेख नूर अब्दुल रऊफ, (रा. मोमीन गल्ली, भिंगार (फरार) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी त्यांच्या पथकाला नगर तालुक्यातील अरणगाव शिवारामध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.शनिवारी पहाटेच्या सुमाराला दौंड मार्गावर अरणगाव चौकात दोन गाड्या थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर यामध्ये गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या.पोलिसांनी हिरा कंपनीचा गुटखा, रॉयल कंपनीची तंबाखू असा महाराष्ट्रामध्ये विक्रीला प्रतिबंध असलेला माल हस्तगत केला.या कारवाईमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनंसुद्धा जप्त करण्यात आली.याप्रकरणी कमलेश हरिदास पाथरुट (वय- 30 वर्षे, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा) यांनी फिर्याद दिली.सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, पो. ना. शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ राहूल सोळंके, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मग एफडीए करतंय काय?बेकायदा गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं खास अन्न आणि औषध प्रशासनाची निर्मिती केली आहे. या प्रशासनाची राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यालये आहेत. मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदा गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या जबाबदारीचा या विभागाला विसर पडलाय. बेकायदा गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई करण्याचं या विभागाचं काम पोलीस करताहेत. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध विभाग अर्थात एफडीए नक्की काय करतंय, असा सवाल अहमदनगरच्या नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार;श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल.श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर श्रीरामपूर,शिर्डी व बाभळेश्वर येथे वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की, आरोपी तुळशीराम वायकर याचे ४-५ वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले. या नंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले.त्यातून ही तरुणी गर्भवती झाली.आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून तिचा गर्भपात देखील केला.तसेच या प्रकाराची माहिती तुळशीराम वायकर याच्या घरी सांगण्यासाठी ही तरुणी गेली असता तिला समजले कि,तुळशीराम याचे पहिलेच लग्न झाले असून तो विवाहित आहे.यावेळी तुळशीरामच्या आईने,पत्नीने या पिडीत भावी डॅाक्टर तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. या सर्व प्रकारावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तुळशीराम ऊर्फ राजू पोपट वायकर,सईबाई वायकर,हिराबाई वायकर यांच्या विरुद्ध भादवि कलम 376 (2) (एन)313,420,417 इतर व अनुसूचित जाती-जमाती कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चालू आहे.या प्रकारामुळे पोलीस खात्यात तालुका पोलीस व शहर पोलिसात खळबळ उडाली आहे.पुढील तपास DYSP हे करीत आहे. 



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget